Tuesday, May 12, 2015

Shivaji His Life, and Times - Book

अभ्यासकांसाठी आदर्श

प्रख्यात शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेला ‘शिवाजी, हिज लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स’ हा खंड शिवचरित्राच्या अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे.
मुघल साम्राज्यात जनतेच्या हाल-अपेष्टांना पारावार उरलेला नाही. शेतकरी, कष्टकरी नागवले जात आहेत. स्त्रियांचे शील भ्रष्ट केले जात आहे. लहान मुलांची कामगार म्हणून विक्री केली जात आहे आणि तरुणांचे जबरदस्तीने धर्मातर करून त्यांना सन्यात भरती केले जात आहे. कष्टकऱ्यांवर जुलूम झाले नाहीत तर या भूमीतून नक्कीच सोनं पिकवलं जाऊ शकतं. ज्या राज्यकर्त्यांनी तिचं संरक्षण केलं पाहिजे तेच आपापसात भांडण्यात धन्यता मानताहेत आणि त्याचा लाभ उत्तरेकडून आलेल्या मुघलांना मिळतोय. दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या मुघलांना हेच तर हवंय. त्यामुळेच सर्वत्र लुटालूट आणि ओरबाडणं सुरू आहे. हिंदुस्थानातील ही स्थिती भयावह आहे..
- डच ईस्ट इंडिया कंपनीच्या आग्रा येथील कारखान्यात कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या फ्रान्सिस्को पेल्सारेत याने त्याच्या १६२१ ते १६२७ या सहा वर्षांच्या वास्तव्यात पाहिलेल्या / अनुभवलेल्या परिस्थितीचे वर्णन हे असे आहे
***
शेकडो एकरची जमीन ओस पडलेली आहे. गावंच्या गावं उजाड झालेली आहेत. आसमंतात आक्रोश भरून राहिलेला आहे. सर्वत्र अनागोंदी आणि अनाचार माजला आहे. घोडय़ावरून रोंरावत येत शेती आणि गावं उद्ध्वस्त केली जात आहेत. जहागिरदार-मनसबदारांना दिलेली जहागिरी ते अशी लुटून घेताहेत. दिल्लीतल्या राज्यकर्त्यांना किती महसूल गोळा झाला याच्याशीच घेणेदेणे आहे. त्यामुळे कोणाचाच पायपोस कुणाशीही नाही. एकूणच परिस्थिती चिंतनीय आहे..
- फ्रेंच फिजिशियन फ्रँकॉइस बíनयर याने १६५८ ते १६६७ या दहा वर्षांच्या कालावधीत केलेलं िहदुस्थानचं निरीक्षण त्याच्या कीर्दखतावणीत हे असं उतरलं होतं. या अवलियाने दहा वर्षांच्या कालावधीत िहदुस्थानचा बऱ्यापकी भूप्रदेश पादाक्रांत केला आणि या प्रवासात त्यानं अनुभवलेल्या परिस्थितीचं वर्णनही करून ठेवलं.
***
हा एक असा काळ होता की ज्याला मराठय़ांचा प्रांत अर्थात महाराष्ट्रही अपवाद नव्हता. उत्तरेत मुघल साम्राज्य थमान घालत असताना दक्षिणेत मराठी सरदारांच्या बेदिलीमुळे आदिलशाही आणि कुतूबशाही नांदत होती. मराठी सरदारांनीही याच शाह्यांच्या पायाशी आपली निष्ठा वाहिल्याने एकंदरच परिस्थिती बिकट झाली होती.
अशाच वातावरणात शिवरायांचा जन्म झाला. शिवरायांचे बालपण, दादोजी कोंडदेवांच्या तालमीत वाढलेल्या शिवरायांनी िहदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी केलेली प्रतिज्ञा, त्यानंतर आधी आदिलशाही व नंतर मुघलांना दिलेले आव्हान, एकापेक्षा एक सरस कामगिरी करत िहदवी स्वराज्याची केलेली स्थापना, महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची बांधणी, त्यांचे प्रशासन, आग्ऱ्याहून पलायन, राज्याभिषेक आणि शिवरायांची अवतार समाप्ती.. हा सर्व इतिहास मराठी मनाला तोंडपाठ. नव्हे याच इतिहासापासून स्फूर्ती घेऊन आजवर महाराष्ट्राची वाटचाल झाली आहे. हा इतिहास आजवर अनेकदा शब्दबद्ध झाला आहे. शिवचरित्र आज अनेक भाषांमधून जगभरात पोहोचले आहे. जगाची भाषा म्हणून ओळख असलेल्या इंग्रजीतूनही शिवरायांचा जीवनपट उलगडण्यात आला. त्यात आता ‘शिवाजी, हिज लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स’ या खंडाची भर पडली आहे. प्रख्यात शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हा खंड साकार झाला आहे. तब्बल तीन दशकांच्या सखोल संशोधनानंतर निर्माण झालेला हा ९०० पानांचा खंड शिवचरित्राच्या अभ्यासकांसाठी एक आदर्श ठरावा. केवळ शिवकालीन इतिहासच नव्हे तर शिवरायांच्या जन्मापूर्वीची िहदुस्थानातील परिस्थिती कशी होती, मुघलांचे प्रशासन कसे होते अशा अनेक विषयांवर लेखकाने संपूर्ण खंडात तपशीलवार माहिती दिली आहे. आणि त्यासाठी ऐतिहासिक दस्तऐवज, पत्रव्यवहारांच्या प्रती, संदर्भ यांची जोडही देण्यात आली आहे.
या खंडात केवळ शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्या काळातली परिस्थिती याचेच वर्णन नाही. तर त्या काळातल्या परिस्थितीमुळे शिवरायांची झालेली जडणघडण आणि त्यातून त्यांची बनलेली वैचारिक बठक यांचाही सांगोपांग परामर्श घेण्यात आला आहे. शिवरायांनी केवळ िहदवी स्वराज्याची स्थापनाच केली नाही तर भारतीयांमध्ये राष्ट्रवादाचे स्फुिल्लग चेतवण्यासही ते कारणीभूत ठरले.
गजानन भास्कर मेहेंदळे यांनी पुणे विद्यापीठातून संरक्षणशास्त्र विषयात एम. ए. पदवी प्राप्त केली आहे. १९७१च्या बांगलादेश युद्धात त्यांनी युद्ध वार्ताहर म्हणूनही काम केले होते. गेल्या तीस वर्षांपासून त्यांनी शिवचरित्र निर्मितीला वाहून घेतले आहे. त्यांच्या अथक संशोधनातून आणि परिश्रमातून हा खंड साकारला आहे.
मुगल, कुतुबशाही आणि आदिलशाहीतील जनजीवनाचे चित्रण, त्या त्या साम्राज्याचे प्रशासन, शेतसारा पद्धती, महसुली पद्धती, जहागिरी, त्यांच्या सन्यदलांची रचना, मनसबदारी, मंडलिक राजांचे वर्तन वगरे यांची नेटकी मांडणी मेहेंदळेंच्या सखोल अभ्यासाची प्रचीती तर देतेच शिवाय प्रत्येक पानाच्या अखेरीस असलेली तळटीप, त्याचे संदर्भ, नकाशे यांतूनही खंडावर घेतलेल्या मेहनतीचे दर्शन घडवते. इस्लामिक राजवटीत सुरुवातीच्या काळात समाजात प्रचंड घुसळण झाली. काहींचे सक्तीने धर्मातर करण्यात आले तर काहींनी भीतीपोटी इस्लामचा स्वीकार केला. त्यामुळे िहदूंना इस्लामिक लष्करांत प्रवेश तर मिळाला मात्र त्यांना मिळणारी वागणूक दुय्यम दर्जाचीच राहिली. इस्लामिक राजवटीने ज्या ज्या ठिकाणी प्रवेश केला त्या त्या ठिकाणी िहदूंची निर्दयी कत्तल तर झालीच शिवाय मंदिरांची नासधूस आणि मूर्तीची मोडतोडही झाली. मंदिरांचे रूपांतर मशिदींमध्ये करण्यात आले. ज्या ज्या ठिकाणी मंदिरांचे रूपांतर मशिदीत झाले त्यांची जंत्रीच काही ठिकाणी मेहेंदळेंनी सादर केली आहे. अनेक ठिकाणी िहदू महिलांचा विवाह मुस्लिमांशी लावून त्यांचे धर्मातर करण्याचेही प्रकार होत होते. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीच्या या सामाजिक स्थितीच्या वर्णनाने खंडाचा पहिला भाग व्यापला आहे. त्यात मग मुघल साम्राज्य, आदिलशाही आणि कुतूबशाही यांच्या काळातील समाजव्यवस्थेचा समावेश आहे. त्याच वेळी व्यापाराच्या निमित्ताने भारतात डेरेदाखल झालेल्या पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून येथील समाजजीवनाचे चित्रणही या पुस्तकात रेखाटण्यात आले आहे. त्याचा दाखला लेखाच्या सुरुवातीलाच देण्यात आला आहे.
शिवाजी महाराजांचा जन्म ते त्यांची जडणघडण आणि बालपण हा या खंडातला सर्वात मोठा भाग. शिवाजी महाराजांच्या बालपणी पुणे परिसरातील परिस्थिती, त्यांचे वडील शहाजीराजे मुघलांच्या सेवेत असणे, शहाजींनी शिवाजी महाराजांची त्यांच्या वयाच्या १२ व्या वर्षीच पुणे परगण्याचा कारभार पाहण्यासाठी केलेली नियुक्ती आदींचा उल्लेख या भागात आहे. िहदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. त्यानंतर मावळ्यांची जमवाजमव. वयाच्या १८ व्या वर्षीच मुघल सत्तेला दिलेले आव्हान आणि कोंढाणा, तोरणा, राजगड व शिरवळ या गडकिल्ल्यांवर भगवा फडकवण्याची केलेली किमया याचा सारा धांडोळा या भागात घेण्यात आला आहे.
शहाजीराजेंना मगलांनी केलेली अटक व त्यांची केलेली सुटका हाही प्रसंग खंडात उद्धृत करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांवर ज्या व्यक्तिमत्त्वांचा अधिकाधिक प्रभाव होता त्या व्यक्तिमत्त्वांचा म्हणजेच जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांच्याबाबत मात्र फारसा उल्लेख नाही, हे विशेष.
स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांनी आखलेल्या मोहिमा, अफजलखानाचा वध, सुरतेची लूट, कर्नाटकची मोहीम, आग्ऱ्याहून सुटका, मुघलांच्या सेवेत असलेल्या राजपूत राजांशी असलेले शिवरायांचे संबंध, त्यांच्याशी केलेले तह वगरे तसेच इंग्रजांपासून असलेला धोका ओळखून आरमाराची त्यांनी केलेली स्थापना यांचाही सखोल अभ्यास या खंडात आढळून येतो. शिवरायांचा राज्याभिषेक, त्यांनी तयार केलेली राजमुद्रा, िहदवी स्वराज्याची प्रशासकीय यंत्रणा, महसूल पद्धती, सन्याची रचना, अष्टप्रधान मंडळ यांचीही चर्चा खंडात तपशीलवार करण्यात आली आहे.
प्रख्यात इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांच्या मते शिवचरित्र साकारताना शिवकालीन मराठी दस्तऐवजांचा आधार घेता येऊ शकत नाही. त्यासाठी त्यांनी त्या काळच्या राजवटींना जबाबदार धरले आहे. इस्लामिक राजवटीतील बहुतांश पत्रव्यवहार हा एकतर फारसी किंवा उर्दूत व्हायचा. त्यामुळे मराठी दस्तऐवज मिळणे मुश्कील असल्याचा सरकार यांचा दावा आहे. मात्र, लेखक मेहेंदळे यांनी सरकारांचा हा दावा खोडून काढताना आतापर्यंत शेकडो शिवकालीन मराठीतील दस्तऐवज प्रकाशित झाल्याचे स्पष्ट केले आहे. यावरील एक प्रकरण या खंडाचे मुख्य वैशिष्टय़ ठरावे. तसेच शिवरायांच्या जन्मतिथीवरील घोळाचाही या खंडात परामर्श घेण्यात आला आहे. तसेच सरकार यांच्यामुळे उत्तर भारतातील जनमानसांत शिवराय व मराठ्यांची प्रतिमा लुटारू अशी झाली होती, ती पुसून शिवरायांची प्रतिमा िहदवी स्वराज्य स्थापनेसाठी झटणारा एक लढवय्या नेता अशी प्रतिमा ठसवण्यात मेहेंदळे यशस्वी ठरले आहेत.
प्रख्यात इतिहासकार सर जदुनाथ सरकार व बाळकृष्ण यांच्या अनुक्रमे १९१९ आणि १९३२ मधील इंग्रजीतील शिवचरित्रानंतर प्रथमच अशा प्रकारे सखोल संशोधन करून इंग्रजीतून शिवरायांवरील खंडाची निर्मिती झाली आहे. ‘खुतूत ए शिवाजी’ या पíशयन पत्रसंग्रहातील काही पत्रांच्या छायाप्रतीही या खंडात आपल्याला पहायला मिळतात. विषयाची आकर्षक मांडणी, शिवकालीन नकाशे, तेवढीच आकर्षक छपाई आणि सहज वाचता येईल असा फॉण्ट हे सर्व या खंडाचे यूएसपी ठरावेत. शिवरायांप्रती असलेला आदर शतपटींनी वाढावणाऱ्या या खंडाची प्रत प्रत्येकाकडे असायला हवी.
शिवाजी हिज लाईफ अ‍ॅन्ड टाइम्स
लेखक: गजानन भास्कर मेहेंदळे
पृष्ठे : ९३४
किंमत : २५०० रुपये
प्रकाशन : परममित्र पब्लिकेशन्स


Ideal for practice

Bhaskar noted sivacaritrakara Gajanan Mehendale of skilled lekhanituna concrete in Shivaji, His Life and Times of the source volume is an important document for scholars.

The rest of the people do not revolutionaries paravara Mughal Empire. Farmers are being laborer nagavale. Women's character is being corrupted. Is being sold for children Workers and youth are being forcibly recruited Sanyal them dharmatara. Kastakaryam not force this on the ground, of course can be pikavalam gold. Bhandanyata among the rulers manataheta bliss that should protect her from the north, and its benefits are getting the Mughals. This Mughals who sits on the board of the trading Delhi. Therefore there is arson and start orabadanam. Hindusthanatila situation is alarming ..
- Working as an employee of the Dutch East India Company factory in Agra Francisco pelsareta of his six-year stay in 1621 and 1627 saw / experienced is that it describes a situation
***
Hundreds ACRE land is lying desolate. The villages are desolate villages of. Environment has been filled with outrage. There is chaos and incest goat. Agriculture and villages are being destroyed ghodayavaruna ronravata coming. Jahagiradara-manasabadaranna jagir given to the away ghetaheta. How much revenue is collected by the rulers in Delhi yacyasica Thackeray. It does nothing payaposa anyone. The overall situation is of concern ..
- In 1658, it was the French physician phramkoisa B í nayara that the main battle is kirdakhatavanita ihadusthanacam impaired his study of the ten-year period of 1667. The ten-year period ihadusthanaca baryapaki avaliyane or overrun terrain and experienced in the journey he kept describing paristhiticam.
***
This province marathayanca who was a long course was no exception, Maharashtra. Adilshahi and the captains of the US south north kutubasahi enjoyed bedilimule Thaman while looking into the Mughal Empire. Sahyam's feet was difficult ekandaraca your loyalty vahilyane the captains of the US.
Shivaji was born in the same environment. Shivaji childhood, Dadoji kondadevam's trained well the promise made to establish higher Shivaji ihadavi independence, then before Adilshahi and Mughals challenge, established by Rule ihadavi doing more than one glue, Maharashtra fort-forts structure, their administration, agryahuna escape, coronation and Shivaji Avatar expiration .. all this history by heart Marathi mind. Taking inspiration from the history of the state has not been moving. This history has often been clair. This source has reached many languages ​​around the world. English as a world language was to decipher the hidden identity of Shivaji jivanapata. Among Shivaji, His Life and Times "is added to tenants. Bhaskar noted sivacaritrakara Gajanan Mehendale skill lekhanituna the volume of the concrete. After nearly three decades of in-depth research is the creation of source volume 9 of 00 leaves a standard practice for the resolution. Not only the history of Shivaji Shivaji prenatal ihadusthanatila situation, the author on topics such as how many have Mughals administration gave detailed information about the entire continent. And historical documents, patravyavaharam over, there is a reference to the jodahi.
Shivaji's life and the only continent that is not described yaceca condition hungry. If the circumstances of the day, and the formation of Shivaji Maharaj made it their ideological bathaka which has been taken in consultation thoroughly. But not only ihadavi Rule sthapanaca Shivaji Indians nationalism sphuillaga cetavanyasahi that caused.

Gajanan Mehendale said Bhaskar M subject sanraksanasastra University of Pune. A. Degree is obtained. 1 9 71 Bangladesh's war had served as his campaign news. The last thirty years, they have taken away the source productions. This segment is helped their tireless research and parisramatuna.

Mughal, Qutubshahi and adilasahitila social life portrayal, his empire administration, setasara practices, fiscal practices, jagir their sanyadalanci system, manasabadari, layout compact the fallen behavior kings Mandalik mehendalem of intensive study realization if deteca and each page by the end of the footnote, its context, The philosophy reflects the hard work of every continent maps. The Islamic regime was huge churn in the beginning of society. If some force to accept Islam dharmatara some fear. However, they came into the Islamic laskaranta so ihadunna if she darjacica secondary treatment received. Islamic regime if those entered ihadunci ruthless slaughter where animals and destroy the temples and images of the debris. Temples were converted into mosques. Where temples were converted into mosque has presented some of their jantrica mehendalenni place. There are many places were married women ihadu karanyacehi dharmatara them Muslims. Shivaji Maharaj's birth has covered the first part of this volume Description of social status. And it Mughal Empire, including Adilshahi and kutubasahi's era society. At the same time, India has been the occasion of the trade landscape depicted in this book point of view of traders, the Dutch and the Portuguese, who at samajajivanace deredakhala. The certificate has been issued at the beginning of the article.
Shivaji Maharaj was born to a large part of their formation, and this most khandatala childhood. Shivaji Maharaj's childhood conditions in the area of ​​Pune, where his father have Mughals of service sahajiraje, sahajinni Shivaji 12th year of their age or mentioned in ensuring the appointment of the administrator to see Pune province. Pledge to establish ihadavi governments. Then gathered Mavale. At the age of 18 th year of challenge and kondhana Mughals reigned, Torna, Rajgad and siravala or gadakillyam on the tax and capture the saffron phadakavanyaci dhandola has been taken in this area.
And the arrest of their chosen events magalanni sahajirajenna exemption has been cited continent. Not to mention the effect on the personalities Shivaji Maharaj was much more, but between those individuals and the Jijamata Dadoji Konddeo, this special.
Freedom of establishment for Shivaji Maharaj that aimed campaigns, aphajalakhanaca killed, the British loot, Karnataka campaign, agryahuna getaway, Mughals service with the Rajput kings of Shivaji relationship with them by treaty fallen and the British from the risk of knowing she is found in Unit study which established them. Shivaji Maharaj, they created the signet, ihadavi Rule administrative mechanisms, methods of revenue, Sanyal system, has been discussed in detail continent also astapradhana company.
According to renowned historian Sir Jadunath US government can not be taken based on source documents sakaratana Shivkalin. He has held regimes that time. Most of the correspondence either Persian or Islamic rule, pass the same time. The government's claim that the US is so difficult to get the document. However, this claim has to override the government made it clear that the author Mehendale said the document published so far turned out to hundreds of Shivaji in Marathi. The main feature of this segment on an episode truly. Shivaji's janmatithivarila gholacahi and consultation has been taken in this continent. And that the government was in northern India janamanasanta yancyamule Marathas and Shivaji image brigand, that have proved successful Mehendale thasavanyata image to erase the image of Shivaji leader soldier governments to establish a jhatanara ihadavi.
Renowned historian Sir Jadunath government and Balkrishna 1 9 1 9 respectively of the production volume and was thus on Shivaji Maharaj English Intensive research in English for the first time after 1 9 32 source. "A khututa Shivaji 'or P í sleeping patrasangrahatila some letters of the continent gets chayapratihi look. Subject attractive layout, Shivkalin maps, normal printing and attractive font that can be easily read all this volume USP tharaveta. Sivarayamprati that everyone should respect the copy satapatinni vadhavanarya or tenants.
Shivaji His Life, Times and Manure
Author: Bhaskar Gajanan Mehendale
Pages: 9 34
Price: Rs 2,500
Release: paramamitra Publications

No comments:

Post a Comment