Shivaji Maharaj and his Spy Head Bahirji Naik

हेरगिरीचा धांडोळा : शिवरायांचा 'तिसरा डोळा'

सुरतची लूट चालू असताना जॉर्ज ओग्झेन्दन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारी समोरच्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले.. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले.. इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अशा रीतीने बहिर्जी नाइकांबद्दल उल्लेख आहे पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत.
महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धांत मांडले गेलेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्याने तर आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधान-मंत्रीपरिषद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हटले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग, तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धांत कौटिल्य मांडतो.
युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. शिवरायांसारख्या द्रष्टय़ा राजाचे ‘गुप्तचर’ या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेरव्यवस्थेला अतिशय महत्त्व होते. या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्न राजांनी केलेले दिसतात. इंग्रज आणि फ्रेंच यांनीसुद्धा शिवरायांच्या हेरव्यवस्थेचे कौतुक केलेले आहे. शिवरायांचा ‘जाणता राजा’ असा गौरव केला जातो. शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणते’ ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेरव्यवस्थेने चोखपणे बजावलेले दिसते.
शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेरव्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय नि:संशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता यांना साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक यांनी शिवकाळात अचाट कामगिरी बजावली आहे.
बहिर्जी नाईक यांच्या पूर्वेतिहासाबद्दल इतिहासात त्रोटक संदर्भ आहेत. शिवाजीराजांनी अठरापगड जातींना कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली त्यात रामोशी जातीच्या बहिर्जी नाईक यांचा समावेश होतो. बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या-कोल्ह्य़ांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या-कोल्ह्य़ांना मारून त्यांचे शेपूट आणून देणाऱ्यास शिवरायांनी इनाम जाहीर केले तेव्हा बहिर्जी नाईक यांनीे सर्वात जास्त शेपटय़ा आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात तर शिमग्याचा खेळ पाहात असताना वेगवेगळी सोंगे वठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार मानतात. मतमतांतरे काहीही असोत पण बहिर्जी स्वराज्याच्या अत्यंत प्राथमिक अवस्थेपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित.
स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले अफजलखानाचे. शिवरायांनी ज्या धीरोदात्तपणे अफजलखानावर विजय मिळवला त्याला इतिहासात तोड नाही पण याच वेळी बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही. अफजलखान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिर्जी त्याच्या सैन्यात सामील झाले होते असे बहुतांश इतिहासकार मानतात. बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इत्थंभूत माहिती काढली. खानाचे सैन्य किती आहे, त्यात पायदळ, घोडदल, हत्ती, तोफा-दारूगोळा किती आहे, त्याच्या जवळचे लोक कोण इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इ. विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली.
इतकेच नव्हे तर खानाचा हेतू राजांस जीवे मारण्याचा आहे असा नि:संदिग्ध अहवाल बहिर्जी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली. शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही, अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावध ठेवण्याचे काम बहिर्जी यांच्या हेरखात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील ‘खाना’ने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.
पन्हाळ्याहून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्याचे श्रेय जसे बाजीप्रभू आणि शिवा काशीदकडे जाते तसेच ते बहिर्जी यांच्याकडेदेखील जाते.
शाहिस्तेखान प्रसंगातदेखील त्याच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिर्जी यांनी केले. उदा. रात्री पहारे सुस्त असतात इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासून जनानखान्यात जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केलेला आहे (हाच रस्ता महाराजांनी खानापर्यंत पोहोचण्यास वापरला पण तो बंद आहे हे ऐन वेळी समजले असते तर योजना फसण्याची शक्यता होती.). तसेच रमझानचा महिना चालू असल्यामुळे रात्री पहारे सुस्तावलेले असतात इ. तपशीलवार माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी शाहिस्तेखानावर हल्ला करायची योजना आखली आणि ती यशस्वी केली. (राजे सहिष्णू वृत्तीचे होते पण राज्यावर आलेले संकट नष्ट करण्यासाठी त्यांनी ‘रमझान महिना’ संपण्याची वाट पाहिली नाही.).
शाहिस्तेखानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सुमारे २०००० सैन्याचा महाराजांनी पुरता धुव्वा उडवला आणि त्याला बिनशर्त शरणागती घेण्यास भाग पाडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्याचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहून माहिती काढत होते. खान बोरघाट मार्गाने कोकणात जाईल असा अंदाज होता, पण खानाने ऐनवेळी उंबरखिंडीचा मार्ग निवडला. राजांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले सैन्य आधीच उंबरखिंडीत आणि आसपासच्या जंगलात पेरून ठेवले. खानाचे सैन्य खिंडीच्या मध्यावर येताच आघाडी आणि पिछाडीची नाकाबंदी करून खानाचा पूर्ण पराभव केला. बहिर्जी यांनी दिलेल्या अचूक आणि योग्य वेळी दिलेल्या माहितीचा यात निश्चितच मोठा वाटा होता.
तीच गत सुरतेच्या लुटीची. सुरत बदसुरत करून राजांनी औरंगजेबाचे नाक कापले. सुरतची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमांपेक्षा वेगळी अशासाठी ठरते की महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतील परमुलखात काढलेली ही पहिलीच मोहीम होती. आधीच्या सर्व प्रसंगात शत्रू स्वराज्यात आला होता. त्यामुळे मोहिमेची व्यवस्थित आखणी होणे आणि राजगडापासून सुमारे १५० कोस दूर असलेल्या सुरतेची संपूर्ण माहिती मिळणे अत्यावश्यक होते. सुरत हे मुघलांचे एक मोठे व्यापारी ठाणे होते त्यामुळे बाहेरून कुमक मिळण्याआधी मोहीम पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणूनच या लुटीची योजना ३-४ महिने आधीपासून सुरू होती. या योजनेचा एक भाग म्हणून बहिर्जी सुरतेत दाखल झाले.
बहिर्जी नाईक भिकाऱ्याच्या वेशात सुरतभर फिरत होते. या फिरस्तीत सुरतेच्या संरक्षण सज्जतेबरोबरच, संपत्तीच्या ठावठिकाणांची अचूक माहिती बहिर्जी यांनी संकलित केली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी इनायतखानास (सुरतचा सुभेदार ) जे निर्वाणीचे पत्र दिले त्यात हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासीम इ. धनिकांची नावेच दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजीस आपली नावेदेखील माहीत आहेत हे जेव्हा या लोकांस कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. शिवाजी महाराजांनी या लुटी दरम्यान दानशूर व्यक्ती, मिशनरी यांना उपद्रव केला नाही केवळ उन्मत्त धनिक लुटले आणि केवळ तीन दिवसांत सुरत मोहीम यशस्वी केली त्यात बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा मोठा वाटा आहे.
आग्य््रााहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि रोमहर्षक प्रसंग मानला जातो. औरंगजेबासारख्या क्रूर शत्रूच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे ७०० मैल लांब असलेल्या स्वराज्यात शिवाजीराजे सुखरूप परत आले. या प्रसंगात बहिर्जी यांच्या इंटेलिजन्सची जोड मिळाली नसती तर इतिहास काही वेगळा झाला असता.
शिवाजीस नवीन हवेलीत पाठवून तेथे त्याचा खून करण्याचा औरंगजेबाचा आदेश असल्याचे बहिर्जी यांनी कळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी जलद हालचाल केली. या संपूर्ण योजनेत बहिर्जी यांचा सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होणे शक्य नव्हते. शत्रूस गुंगारा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी परतीचा प्रवास उलट दिशेने सुरू केला त्यानुसार ते प्रथम मथुरेला गेले. तेथून अलाहाबाद-बुंदेलखंड-खानदेश-गोंडवन-गोवळकोंडा असा कठीण वेडावाकडा प्रवास करून ते राजगडावर येऊन पोहोचले. हा मार्ग निश्चित करताना आणि प्रत्यक्ष प्रवासात बहिर्जी यांचे हेर खाते राजांच्या अवतीभवती असणार आणि त्यांनी पुढचा मार्ग सुखरूप असल्याची ग्वाही दिल्यानंतर राजांचे मार्गक्रमण होत असणार हे निश्चित.
शिवरायांचे संपूर्ण जीवन धकाधकीने आणि रोमहर्षक प्रसंगांनी भरलेले आहे. जेथे फक्त पराजय शक्य आहे अशा प्रसंगात शिवाजी महाराजांनी विजय मिळवलेला आहे. शिवाजी महाराजांनी बहुतांश लढाया युक्तीने लढलेल्या असून लढाईपूर्वी शत्रूची संपूर्ण माहिती मिळवण्यावर भर दिला आणि त्यानुसार आपली व्यूहरचना केली.
बहिर्जी आणि त्यांचे हेर स्वमुलखात आणि परमुलखातदेखील साधू, बैरागी, भिकारी, सोंगाडे, जादूगार अशा वेशात फिरत असत आणि इत्थंभूत माहिती घेत असत. या हेरांचे नजरबाज, हेजीब असे उल्लेख अस्सल कागदपत्रात आढळतात. महाराजांच्या दूरवर पसरलेल्या सैन्यात आणि गडकिल्ल्यांवर माहितीची देवाण-घेवाण करणे आणि त्यांत समन्वय साधणे हे काम बहिर्जी नाईक यांच्या यंत्रणेने साध्य केले. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक रोमहर्षक विजयाचा पाया बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याने घातला असे म्हणल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही आणि असे म्हटल्याने कोणावर अन्यायही होणार नाही. शिवाजी महाराजांनीदेखील त्यांचे महत्त्व ओळखून हेरखाते प्रबळ करण्यावर भर दिला. अष्टप्रधान मंडळात हेरखात्याला स्वतंत्र स्थान देण्यात आलेले नव्हते तरी बहिर्जी यांना सरदारकीचा दर्जा दिला आणि हेरखात्यास साधनसामग्री आणि द्रव्याची चिंता भासू दिली नाही. बहिर्जी यांच्या नेतृत्वाखाली साधारण ३००० हेर कार्यरत होते असे इतिहासकार मानतात. हे हेरखाते इतके सक्षम होते की समकालीन इतिहास फंद फितुरीने भरलेला असूनदेखील शिवाजी महाराजांना मात्र संपूर्ण कारकिर्दीत एकदाही दगा फटका झालेला आढळून येत नाही.
इतक्या जुन्या काळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचे संकलन, विश्लेषण इतक्या अचूकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे. इतिहास अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवतो तसाच हाही प्रश्न इतिहासाने अनुत्तरित ठेवला आहे. बहिर्जी नाईक यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाची’ एक अद्ययावत यंत्रणा निर्माण केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहिर्जी नाईक आणि त्यांची यंत्रणा ही त्या काळातील सर्वश्रेष्ठ हेरयंत्रणा होती हे निर्विवाद सिद्ध होते. आज आपणास आदिलशहाचा हेर कोण होता? औरंगजेबाचा हेर कोण होता असे विचारले तर ते आपल्याला माहीत नसते इतिहास संशोधक त्यांची नावे कदाचित सांगू शकतील पण हेच शिवाजी महाराजांचा हेर कोण असे विचारल्यावर पटकन आपल्यासमोर नाव येते ते ‘बहिर्जी नाईक’.
गुप्तचर मग ते कोणत्याही काळातील असोत त्यांना ग्लॅमर नसते. कारण ते हातात नंगी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाहीत किंवा रोमहर्षक लढाया जिंकत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण त्या पराक्रमाचे साक्षीदार नसतात. सेनानी लढाईत लढतात पण गुप्तचरांना शांततेच्या काळातदेखील लढावे लागते. ही लढाई बहुतेक वेळा संयम आणि बुद्धी यांची असते. सोंग घेणे, वेषांतर करणे सोपे असते पण ते सोंग वठवणे कठीण काम असते त्यासाठी जे सोंग आपण वठवणार आहोत त्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. गुप्तचरांच्या कामात प्रतिस्पध्र्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणे अपेक्षित असते. वरील सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी नाईक हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते हे मान्य करावे लागेल.
बहिर्जी आणि त्यांच्या हेर व्यवस्थेची आताच्या हेरव्यवस्थांशी तुलना करताच येणार नाही. ‘रॉ’बरोबर त्याची तुलना करणे हास्यास्पद ठरेल. ‘आयएसआय’, ‘सीआयए’शी त्याची तुलना करणे बेजबाबदारपणाचे ठरेल. मोसादशी त्याची तुलना करता येईल पण ती उलटय़ा बाजूने करावी लागेल म्हणजे- मोसाद म्हणजे इस्राइलचे बहिर्जी असे म्हटल्यास ते जास्त चपखल ठरेल.
जेम्स बाँड असो किंवा शेरलॉक होम्स, ही दोन्ही पात्रे कल्पनेतील आहेत, परंतु साहित्य आणि दृक्श्राव्य माध्यमांच्या ताकदीमुळे ही दोन्ही पात्रे वास्तवातील वाटतात. ब्रिटिशांनी तर बेकर स्ट्रीटवर शेरलॉक होम्सचे घर वसवले आहे आणि लोक ते पाहण्यास जातात.
जेम्स बाँड किंवा शेरलॉक होम्सने पुस्तकात, सिनेमात जी कामिगरी केलेली आहे त्याहून सरस कामगिरी बहिर्जी नाईक यांनी वास्तवात करून दाखवली आहे हे इतिहासाचा अन्वयार्थ लावल्यानंतर लक्षात येते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, शिवरायांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून वावरलेले हे व्यक्तिमत्त्व आपल्या साहित्यात आणि दृक्श्राव्य माध्यमात दुर्लक्षित राहिलेले आहे. भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘बहिर्जी नाईक’ हा १९४३ सालचा सिनेमा, २-४ छोटेखानी पुस्तके, भूपाळगड (ता. तासगाव, जि. सांगली) येथील एकाकी समाधी आणि कुंभारकिन्ही धरणाला दिलेले ‘बहिर्जी नाईक सागर’ हे नाव हीच काय ती आपण या ‘सर्वोत्कृष्ट’ हेरास वाहिलेली आदरांजली.. !
बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. ‘भूपाळगडावर हेरगिरी करताना त्याचा मृत्यू झाला’, ‘लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भूपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले’ अशा आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडतात.
बहिर्जी यांच्या कारकिर्दीत त्याला एकदाच ओळखले ते जॉर्ज ओग्झेन्दन या सुरतेच्या इंग्रज वखारवाल्याने..! (शिवराज्याभिषेकाचे जे चित्र आपण पाहतो त्यात महाराजांना लवून मुजरा करणाऱ्या हेन्री ओग्झेन्दनचा हा भाऊ). पण तेसुद्धा केव्हा तर सुरतची लूट चालू असताना आणि तो वखार वाचवण्यासाठी महाराजांची विनवणी करावयास गेला तेव्हा..! महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम (बहिर्जी) आणि आपल्या वखारी समोर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले पण तोपर्यंत उशीर झाला होता, पण त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात हे नमूद केले.
२१व्या शतकात गुप्तचर यंत्रणांबद्दल जे संशोधन, जो अभ्यास झाला आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश-अपयशाचे एक महत्त्वाचे सूत्र मांडले आहे. ते सूत्र म्हणजे ‘अज्ञात राहणे’. गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो. बहिर्जी नाईक तसेच ‘अज्ञात’ राहिले. पण ते अज्ञात राहिला म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले याचे उत्तर ना इतिहासकारांपाशी आहे ना दस्तुरखुद्द इतिहासापाशी..!

Heragirica dhandola: Shivaji 'third eye'

Surat loot while the English on George ogjhendana do warehouse keeper last plea of ​​a warehouse to save your Shivaji Maharaj. When he found the resemblance bhikaryata man standing in front of Maharaj's side and he mentioned it to his ex-warehouse .. .. the British East India Company sent the report mentioned in the documents, but you will not find so bahirji naikambaddala but nothing much to mention.

Mahabharata have been set theory which lasts to this day has underlined the importance of guptacarance rajyavyavasthebabata it. Kautilyane if your 'Economics' book that the king of the state of the body or the spirit of the concept of the human body analogy, Prime mantriparisada, the brain, and the commander of the intelligence arm of the eyes and the ears rajyarupi said body. The eyes and ears more aware, there will be sharp form Kautilya principle that the state is equally safe.
Chhatrapati Shivaji Maharaj made rajyavyavastha ideal epoch making. Sivarayansarakhya drastaya king 'spy' or ignore angakade important not enter the state. That was very important Shivaji Maharaj Art heravyavasthela. All efforts are made to powerful kings or setups. Is appreciated by the British and French have broken into the Shivray heravyavasthece. Shivaji 'knowing the king' glory is that. In the case of all Shivaji 'recognizes' seems to work to keep their conscientious aptly heravyavasthene.
Credit to the nature of the material Shivaji imagined heravyavasthela absolute bahirji Naik is the. Brilliant intelligence, by the pair sahasaci samayasucakata bahirji Naik is performed acata sivakalata.
Bahirji Naik purvetihasabaddala are scant references to history. Shivaji atharapagada accomplishments made over the opportunity to include therein are Ramoshi breed bahirji Naik. Bahirji Naik have been added to various historians arguments in this Rule. Landagya to manage your jagir land landagya-kolhyanca-kolhyanna death and announced a reward of Shivaji who to bring their tail gave sepataya most bahirji Naik also and the various Tsonga vathavanare bahirji Naik Shivaji's eyes while watching the game simagyaca but believe they Shivaji Harel some historians Some historians believe that full. Matamatantare anything but certain whether it was from the very bahirji sivarayansobata stage of independence.
Aphajalakhanace the first major crisis on independence. Whereupon the history not beat him on dhirodattapane Shivaji aphajalakhana the same time, but no more work bahirji Naik and their herakhatyace not you. Most historians believe that it was filed after the bahirji aphajalakhana pandharapurata joined his army. Compounded by the food bahirji itthambhuta sent. What is the military field, the Army, ghodadala, elephants, how-gun ammunition, that means that the people who close food routines, etc., its habits. About bahirjinni rajamparyanta transmit reliable information.
If food is not only intended to kill the kings free: simply changed your configuration Shivaji after the vague reports bahirji. Shivaji was afraid, and not war, that's bahirji work of keeping food allergies herakhatyane lift the military unconscious. At the time of the trip also 'khanane armor and put that Sayyed Banda dangerous bahirjinni transmit that information. Is sarvasruta following history.
Panhalyahuna credited to escape safely as Shivaji Bajiprabhu and Shiva is kasidakade and it is yancyakadedekhila bahirji.
Sahistekhana prasangatadekhila bahirji work done by entering the complete removal of war accurately. Eg. This means they are lazy sleep where the night watch Khan, Road bhatarakhanya is closed from jananakhanyata raw masonry (this used to reach the road, but it is understood that at the time of Ann khanaparyanta Maharaj is off if the plan should phasanyaci.). Since this month and Ramzan night watch sustavalele etc. are. Detailed information Shivaji maharajamparyanta reaching plans to attack sahistekhana and they did succeed. (Kings had a resigned but they come to destroy the state of crisis' Ramzan month is not seen for the terminal.).
Maharaj host around 20,000 of karatalaba umbarakhindita food before them sahistekhanaca got thrashed and forced to take absolute unconditional surrender. Khan was easy to remove information from Pune to stand around and his army of spies everywhere from bahirji of food. Khan was estimated to be in the mountains will be easy, but the food is chosen route umbarakhindica last minute. After receiving this information to their military already umbarakhindita kings and put away the surrounding forest. As the middle of the field and defeated army lead pass through the blockade of food behind. It was definitely a great part of the information provided by the bahirji accurate and timely.
The last of them the same, Surat. Aurangzeb made by Surat unbeautiful cut nose. Surat campaign Maharaj had taken paramulakhata career until the first campaign of the Maharaj is so different than the other campaigns. Shivaji was the situation before the enemy. The campaign was organized and designed to get essential information from the panoramic view of the whole of the British out of 150 Kos. Surat is a great Mughals was necessary to complete the trade mission milanyaadhi relief was outside Thane. That plan was to start them or already 3-4 months. As part of this scheme bahirji the British were registered.
Bahirji Naik bhikarya of dressed suratabhara was walking. Or phirastita Surat protection sajjatebarobaraca, thavathikananci collected by means of accurate information bahirji. So the vesivaruna Shivaji inayatakhanasa Surat (Surat governors of the country) that ultra letter gave Haji Syed Baig, baharaji Bohra, etc. Haji Kasina. Dhanikanci naveca said. Write the names of your so far country know that when people know when their fear turned consternation. Shivaji Maharaj generous person between them, missionary to bring not only robbed and only three days of frantic dives in the successful campaign to Surat bahirji Naik's intelligence system is a big part.
This is considered extremely difficult to deliver agyraahuna Shivaji Maharaj and exciting events in life. About getting rid of the hand of the enemy's brutal aurangajebasarakhya 700 miles of Shivaji Shivaji came back safely away. This situation would bahirji's history would have been different had intelijansaci pair.
Write Aurangzeb order to be sent there to kill him after he told the New Haveli bahirji move quickly Shivaji Maharaj. Unless the participation of the entire scheme bahirji she could not win. Avoiding enemies started to travel in the opposite direction, according to the first Shivaji Maharaj began its return to Mathura. From अलाहाबाद-बुंदेलखंड-खानदेश-गोंडवन-गोवळकोंडा Irregular in shape and panoramic view of the difficult journey that they reached. While the journey will be very positive way and spies around the kings of the account and confirm that this will be the trajectory of kings bahirji assured that after the way they safely.
Shivaji entire life crisis and is full of exciting events. Where such a situation is possible only won Shivaji defeat. Most wars are fought diplomatically Shivaji Maharaj gave them and get the complete information ladhaipurvi according to your configuration.
Bahirji and draw their spies svamulakhata and paramulakhatadekhila, recluse, beggar, songade, and were informed that the magicians were dressed in walking itthambhuta. Najarabaja or spies, are hejiba authentic document that mentions. Maharaj widespread war and exchange-gadakillyam exchange of information and co-ordinate the work of achieving this ideal system bahirji Naik. Shivaji Maharaj's feet every exciting victory bahirji Naik and not be put herakhatyane atisayoktice been said to be their own, and thus will not be wrong to anyone. Shivaji maharajannidekhila emphasis on powerful herakhate knowing their significance. Astapradhana circle herakhatyala were not given free space when bahirji the saradarakica level, and the equipment and did not find that to worry herakhat material. Historians believe it was around 3000 under the leadership of bahirji spies working. These days, however, the whole Despite full factious phanda contemporary history of Shivaji Maharaj was not found to have been able to hit so herakhate treason face.
Not so old and in information technology with bahirji Naik's spies collection, analysis, and accurately so, how, how to win and that is cause for concern geographical knowledge of how a person wants to transmit information at the right time. History is the history of unanswered questions and he had so many have unanswered questions. Bahirji Naik 'information technology' that will not be refunded Postage have created a system update. Bahirji Naik and their system is the best in that period was the undisputed proven herayantrana. Who was the other adilasahaca you today? Aurangzeb, who was asked if the men they were able to tell if you do not know their names, but the same history researchers Shivaji spy who is asked to quickly name you 'bahirji Naik.
And they do not spy on them whether any glamor era. Because they do not challenge them with his sword drawn in his hand or not exciting winning wars. They might not be the people, because they do not witness mighty. But the power to fight the war fighter guptacaranna kalatadekhila peace. Most of the time this war is the patience and wisdom. Disguise, vesantara is easy to work hard, but for what it is you need to study closely his vathavane Song Song are vathavanara. Guptacaram work is expected to be the Master of Intellectual diverse pratispadhrya. All the above factors have to be considered the bahirji Naik agreed that this was a remarkable personality.
Bahirji spies and their system will not begin to compare heravyavasthansi now. "It would be ridiculous to compare it robarobara. ISI, siayaesi will compare its irresponsibility. Mossad will compare it to, but it would be more fit to the Israeli Mossad mhanaje Postage bahirji that need to side ulataya.
James Bond or Sherlock Holmes, both vessels have had imagined, but not new materials and media takadimule the real look of both vessels. Sherlock Holmes and the Baker Street and the British built the house to see who they are.
James Bond or Sherlock Holmes book, the film, which has been showing better performance bahirji Naik made the interpretations of history is that it is shown by the fact. But the unfortunate thing is that the Shivaji 'third eye' as vavaralele this personality is not new medium and ignore the rest of his literature. Bhalji pendharkar directed 'bahirji Naik 1 9 43 contest the cinema, 2-4 small books, bhupalagada (Tal. Tasgaon, Dist. Sangli) and at a lonely mausoleum breaking kumbharakinhi given' Sagar Naik bahirji 'What is the name of one of the' best ' Hera devoted tribute ..!
Bahirji Naik mrtyubabata concrete information is not available. 'Bhupalagada died while on espionage,' 'said bhupalagada battle injured bahirji come from Mahadev devoted his life to such a legend, but then finds the annals.
Once they recognized him in the days of the British bahirji George ogjhendana or Surat vakharavalyane ..! (Sivarajyabhisekace picture ogjhendanaca brother Henry, who salute you look at it before Maharaj). But while he was putting on and plunder Surat tesuddha when the plea of ​​a warehouse to save when Maharaj ..!

No comments:

Post a Comment