Sunday, November 9, 2014

राज्यात पाटीलकीचा प्रभाव - "Patil" surname in Maharashtra




adhar

रोजच्या आयुष्यात आपण काही नावांच्या-आडनावांच्या व्यक्ती सातत्याने पाहतो. त्यातील काही नावे-आडनावे वारंवार आपल्या कानावर येतात, तर काही अगदीच कधी तरी. पण राज्यात सर्वाधिक संख्येची नावे-आडनावे कोणती याचे राज्य सरकारच्या यूआयडी इनोव्हेशन लॅबने विश्लेषण केलेय. यानुसार महाराष्ट्रात शेख आणि खान आडनावाच्या व्यक्ती सर्वाधिक आढळून आल्या. तर मराठीजनांमधील सर्वाधिक संख्येने असलेले आडनाव पाटील Patil असल्याचे समोर आलेय. तर संजय, रमेश, सुरेश ही मराठी माणसाची सर्वात आवडती नावे आहेत. आधार नोंदणी केलेल्या राज्यभरातील नागरिकांच्या माहितीचे विश्लेषण करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

राज्यातील सव्वाअकरा कोटी जनतेपैकी सुमारे पावणेनऊ कोटींहून अधिक म्हणजे ७८ टक्के नागरिकांनी आधार नोंदणी केली आहे. यातील बहुतांश व्यक्तींच्या नावांचे, आडनावांचे वैज्ञानिकदृष्ट्या आणि कम्प्युटरच्या आधारे विश्लेषण करून हे निष्कर्ष काढले आहेत. मराठीजनांमध्ये पाटील Patil (Surname) या आडनावानंतर जाधव, पवार, यादव, शिंदे, कांबळे यांचा क्रमांक लागतो. नावांचा विचार करता संजयनंतर अशोक, रमेश, सुरेश, शंकर, मोहम्मद, संतोष, प्रकाश, विजय Ashook, Ramesh, Suresh, Shankar, Mohammed, Santosh, prakash, Vijay यांचा क्रमांक लागतो.

लहान मुलांमध्ये यश, आदित्य, वैष्णवी, साक्षी Yash, Aaditya, Vaishnavi, Sakshi

यूआयडीच्या इनोव्हेशन लॅबने UID Innovation Lab वयोगटानुसारही नावांचा अभ्यास केला आहे. त्यानुसार ० ते ४ वयोगटातील नावांमध्ये मोहम्मद, यश, आदित्य, ओम, सार्थक, वेदांत Mohammad, Yash, Aaditya, Om, Sarthak, Vedant names more in Maharashtra ही नावे सर्वात आघाडीवर आहेत. मुलींच्या नावांमध्ये वैष्णवी, साक्षी, श्रावणी, अनुष्का, श्रेया, समीक्षा, मोमीन Vaishnavi, Sakshi, Shravani, Anushka, Shreya, Sameeksha, Momin ही नावे लोकप्रिय आहेत.

No comments:

Post a Comment