साप्ताहिक राशिभविष्य
Weekly Horoscope - 9 nov to 15 Nov
अरविंद
९ ते १५ नोव्हेंबर २०१४
-
मेष
विरोध तीव्र होईल
गुरू, शनी, राहू यांचा असहकार बुधवारच्या शुक्र राश्यांतरापासून तीव्र आणि व्यापक होणे शक्य आहे. सप्तमात बुध, शुक्र, भाग्यांत मंगळ यांचा उपयोग हुशारीने कार्यप्रांतात संरक्षण करण्यास होऊ शकेल. तरीही शनिवापर्यंत बेसावध राहू नका.
शासकीय नियम, व्यावहारिक शिस्त, आरोग्याची पथ्य सांभाळून, संरक्षण मजबूत करता येईल. कार्यपद्धतीत गुप्तता, जिभेवर साखर, कृतीत नम्रता, व्यवहार यशमार्गाकडे घेऊन जाऊ शकतील.
दिनांक : ९, १०, ११, १५ शुभ काळ.
महिलांना : समस्यांच्या गर्दीतून मार्ग शोधावे लागतील.
-
वृषभ
अनुकूलता उत्साह देईल
प्रगतीच्या वेगाने सुटणाऱ्या समीकरणात गुरू, राहू, शनी यांची अनुकूलता महत्त्वाची आहे. बुधवारच्या शुक्र राश्यांतरातून नवा उत्साह निर्माण होईल आणि व्यापार, राजकारण, कलाप्रांत, शिक्षणक्षेत्र या प्रांतांत वृषभ व्यक्तींचा प्रभाव प्रस्थापित होत राहील.
अष्टमातील मंगळातून निर्माण होणाऱ्या शत्रूंची शक्ती मंगळ, हर्षल केंद्र योगामुळे घातपातापर्यंत पोहोचू शकते. सतर्कता, संरक्षण हाच त्यावर यशमार्ग राहील. प्रार्थना सहकार्य करील.
दिनांक : १० ते १४ हुशारीने प्रगती.
महिलांना : सत्कारणी परिश्रमाचा आनंद मिळेल. पुढे चला.
-
मिथुन
परिश्रमातील कृती यश देईल
राशी कुंडलीत गुरू, मंगळ शुभ परिणामांचे आहे. पंचमातील बुध, शुक्र त्यात नवा आनंद निर्माण करतील. त्याचा लाभ महत्त्वाच्या कार्यप्रांतात मिळवता येईल. अधिकारातून शक्ती वाढेल. नवे व्यापारी सौदे, पैसा देतील. मंगलकार्याची चर्चा सफल होईल. समाज सन्मान देईल.
दूरचे प्रवास होतील. यामध्ये शनी राहूचे परिणाम आरोग्य आणि परिवारातील प्रश्न यातून अडचणी आणतात. परीक्षणातून अचूक कृती हाच मार्ग यश मिळवून देईल.
दिनांक : १० ते १४ शुभ काळ.
महिलांना : कल्पकता कार्यभाग साधण्यास उपयुक्त ठरेल.
-
कर्क
कार्यचित्र आकर्षक
राशीस्थानी गुरू, पराक्रमी राहू, पंचमात शनी, प्रसन्न असलेला बुध, शुक्र, कर्क व्यक्तींचं व्यवहारातील कार्यचित्र आकर्षक करणारी ग्रहस्थिती.
काही घटना तर दीर्घकाळ स्मरणात राहू शकतील. त्यात प्रबल होणारी प्रतिष्ठा, ठरणारे मंगलकार्य, दूरचे प्रवास, नवे परिचय, अभिनव, कला, उपक्रम आणि परिवारातील सुरुवातीच्या समस्या यांचा समावेश त्यात राहील. षष्ठात मंगळ असेपर्यंत प्रकृती मात्र सांभाळा.
दिनांक : १२ ते १५ शुभ काळ.
महिलांना : प्रपंच प्रसन्न राहील. नवीन उपक्रम सुरू कराल.
-
सिंह
भ्रमात राहू नका
गुरू, शनीसारख्या ग्रहांचा विरोध, राहू मंगळाचे सहकार्य, बुध-शुक्र युती युक्ती आणि उत्साह यांचा पुरवठा करतील. परंतु सहज यश मिळेल अशा भ्रमांत राहू नका. अरेरावी, आव्हान, आश्वासन असे प्रकारही टाळा आणि सरळ मार्गाने नम्रता ठेवून मिळणाऱ्या यशाचा, प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी उपयोग करा. नोकरीत अधिकारी सांभाळा.
व्यापारांत भागीदार आणि गिऱ्हाइक यांना नाराज करू नका. कला साहित्यात मस्ती नको. यश आणि प्रतिष्ठा यासाठी याच मार्गाचा उपयोग होईल.
दिनांक : ९, १०, ११, १४ शुभ काळ.
महिलांना : प्रलोभन आणि आश्वासन यापासून दूर राहा. कार्यभाग साधता येईल.
-
कन्या
वेग वाढेल. सावध राहा
गुरूची कृपा, बुध शुक्र अनुकूल, राहूचे सहकार्य मिळेल. पराक्रमी शनी कन्या व्यक्तींना कार्यपथावरील प्रवास वेगवान करणारी ग्रहस्थिती, फक्त अवघड वळण, अपरिचित मार्ग यासंबंधात सावध राहा.
मंगळ हर्षल केंद्रयोगाचा फटका टाळता येईल. प्रवास अधिक सरळ होईल. सामाजिक, राजकीय प्रांतांत यश मिळेल. बढती बदलीचे संभवते. उद्योगांत नवे प्रस्ताव समोर येतील. शासकीय प्रकरण निकालात काढता येतील. बुध, नेपच्यून नवपंचम योगात उपासना यश निर्दोष करते.
दिनांक : १० ते १४ शुभ काळ.
महिलांना : विवंचना संपतील. कुचंबणा दूर होईल. प्रगतीमधून श्रेष्ठत्व सिद्ध होईल.
-
तूळ
विलंबाची चिंता नको!
पुढे शनी, मागे राहू या ग्रहांमधून ठरविलेले उपक्रम, संपर्क, चर्चा, बैठकी यांमध्ये काहीतरी व्यत्यय येतच राहतात. निराश होऊ नका. प्रयत्न सुरूच ठेवा. विलंब होईल; परंतु पराक्रमी मंगळ, दशमात गुरू, अनुकूल बुध, शुक्र प्रतिष्ठा धोक्यात येईल, असे प्रसंग आपणावर येऊ देणार नाही.
विनयाने विरोधकही जवळ आणता येतील. श्रीमारुतीची उपासना, आराधना आनंद देईल.
दिनांक : १० ते १४ शुभ काळ.
महिलांना : निर्धार आणि सावधानता यातून प्रभाव निर्माण करणारे यश मिळेल.
-
वृश्चिक
सरळ मार्गानी सफलता
साडेसातीच्या शनीचे भ्रमण वृश्चिक राशीतूनच होत असल्याने चिंता आणि संशय यातून सफलता अवघड वाटते.
अचानक नवीन समस्यांचे आव्हान मंगळ-हर्षल केंद्रयोगामुळे समोर उभे राहील.
सावध राहून सरळ मार्गाने उपक्रम सुरू ठेवले तर भाग्यातील गुरू, लाभातील राहू, बुधवारच्या बुध-नेपच्यून नवपंचमयोग यांच्या सहकार्याने शनिवापर्यंत बरीच मोठी सफलता मिळवू शकाल. त्यातून आपली प्रशंसा होत राहील.
दिनांक : १२ ते १५ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्नाने प्रश्न सुटतील आणि संसार, व्यवहार यात यश मिळेल.
-
धनु
प्रयत्नातून यश
साडेसाती आणि आठवा गुरू यांचे अशुभ परिणाम बुधवारच्या शुक्र राश्यांतरामुळे तीव्र होतील. त्यातून संभ्रमातून निराशा निर्माण होते. परंतु शिकस्तीचे प्रयत्न, उपक्रमांत सावधानता, श्रीमारुतीची उपासना, आराधना यांमधून नवा प्रकाश दृष्टिपथात येईल. त्यामध्ये राशिस्थानचा मंगळ उत्साह देईल.
दशमातील राहू सन्मानाने आपणास पुढे घेऊन जाईल. त्यामध्ये शब्दचक्रात मात्र गुरफटू नका.
दिनांक : १०, ११, १५ शुभ काळ.
महिलांना : निराश होऊ नका, पुढे चला, यश मिळेल.
-
मकर
तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या
मकर व्यक्तींना गुरू, शनी, राहू अशा ग्रहांचे सहकार्य मिळतच असल्याने कमी-अधिक प्रमाणात उपक्रमात यश मिळतच राहणार आहे; परंतु व्ययस्थानी मंगळ आणि गुरुवारचा मंगळ-हर्षल केंद्रयोग यांनी चालत्या गाडीला खीळ घालू नये यासाठी सतर्क राहून निरीक्षण सुरू ठेवा. संशय येताच मार्गात बदल करा. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. यश सोपे होईल. व्यापार, परिवार, प्राप्ती, प्रतिष्ठा या संबंधातील योजना पुढे सरकत राहतील. प्रार्थना प्रगतीची ठरेल.
दिनांक : ९, १२, १३, १४ शुभ काळ.
महिलांना : विचाराने निर्णय घ्या, हुशारीने कृती करा, नेत्रदीपक यश मिळविता येईल.
-
कुंभ
संयमाने पेचप्रसंग सुटतील
शनी-मंगळ सहकार्य करतील. बुध-शुक्र निर्णय कृतीच्या समन्वयासाठी उपयुक्त ठरतील. शनिवापर्यंत महत्त्वाची प्रकरण मार्गी लावता येतील.
अष्टमात राहू, नाराज गुरू, मंगळ-हर्षलचा केंद्रयोग यामधून अचानक पेचप्रसंग निर्माण होतात. कधी कधी विश्वासातील मंडळी बिथरतात.
यश संभ्रमात सापडते. सत्य आणि संयम यामधून प्रकरणांना कलाटणी देऊ शकाल. संभ्रमातून बरेचसे यश बाहेर काढता येईल. साहस, स्पर्धा नको. प्रार्थना प्रबलता निर्माण करू शकते.
दिनांक : १०, ११, १५ शुभ काळ.
महिलांना : परीक्षण, संपर्क, चर्चा यांमधून परिवारातील प्रश्न सुटतील, व्यावहारिक योजना वेग घेतील.
-
मीन
मंगळ-हर्षल अशुभ
मीन व्यक्तींना कित्येक दशकानंतर समर्थ आणि संपन्न ग्रहांचे सहकार्य मिळते. नजीकच्या काळात काही घटना कर्तृत्वाच्या नव्या नव्या बाजू प्रकाशमान करतील.
काही यश घटना दीर्घकाळ स्मरणात राहतील. यामध्ये पंचमात गुरू, सप्तमात राहू, भाग्यात शनी, दशमात मंगळ अशा ग्रहशक्तींचा समावेश राहील. मंगळ, हर्षल केंद्रयोगात नक्षलीप्रश्न तयार होतात. याचे स्मरण ठेवा. निर्धाराने पुढे चला. ईश्वराची प्रार्थना प्रगतीचे रक्षण करणारी ठरते.
दिनांक : ९, १२, १३, १४ शुभ काळ.
महिलांना : सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांना प्रतिसाद मिळेल, परिवार खूश राहील.
No comments:
Post a Comment