Sunday, November 9, 2014

Learn Japanese language as career


शिका उगवत्या करिअरची भाषा’




careerयेत्या काही वर्षांमध्ये जपानी कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतात दाखल होणार आहेत. त्यामुळे जपानी भाषेचं ज्ञान असलेले अनुवादक आणि दुभाषा यांची गरज निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जपानी भाषातज्ज्ञ अनुप्रीता सामंत यांनी जपानी भाषेतील करिअर क्षेत्राविषयी सविस्तर माहिती दिली.

कोणत्याही देशाची केवळ भाषा शिकून उपयोग नाही. त्याचबरोबर त्या देशाची संस्कृतीही जर समजून घेतली, तर त्या विशिष्ट भाषेतील भाषांतराचे काम सोपे होते, असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जपानी भाषा शिकविणाऱ्या अनुप्रीता सामंत यांचं ठाम मत आहे. शाळा, कॉलेजच्या दिवसांपासूनच जपानी भाषेविषयी त्यांची उत्सुकता वाढत गेली. शिक्षणाला अग्रक्रम देणारे आई-वडील असल्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर घडविण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळालं. मुंबई विद्यापीठामध्ये एमकॉम केल्यानंतर अनुप्रीता यांनी कम्पुटर अॅप्लिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. शाळेमध्ये असताना डीडी चॅनेलवर लागणाऱ्या ओशिन या ‌मालिकेमुळे जपानी भाषेविषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड आवड निर्माण झाली आणि अर्थातच हे कुतूहल शमविण्यासाठी भाषेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मात्र, दरम्यानच्या काळामध्ये घेतलेल्या शिक्षणाला प्राधान्य देऊन एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये 'मोटेक्स' या कंपनीच्या माध्यमातून एका प्रोजेक्टच्या निमित्ताने त्या जपानला गेल्या. जपानमध्ये जाऊन त्यांनी तो देश जवळून अभ्यासला. ‌तेथील संस्कृती, भाषा, चालीरीती, परंपरा जाणून घेतल्या. जापनीज लँग्वेज प्रोफिशिएन्सी टेस्टची (जेएलपीटी) एन-टू लेव्हल त्यांनी पूर्ण केली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्पेशल डिप्लोमा इन ट्रान्सलेशन अँड इंटरप्रीटर पूर्ण केला. जपान फाउंडेशनची त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी जपानमध्ये जाऊनही या क्षेत्रातील अधिक ज्ञान मिळविले. नोकरी करत असतानाच हे शिक्षण घेतल्यानंतर जपानी भाषा शिकविण्यामध्ये त्यांना विशेष रस निर्माण झाला आणि अंदाजे आठ वर्षांपूर्वी जपानी भाषा शिकविण्यास त्यांनी सुरुवात केली. 'सिम्बायोसिस'मध्ये शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागामध्ये त्या रूजू झाल्या. याच काळामध्ये त्यांनी ट्रान्स्लेटर आणि इं‌टरप्रीटर म्हणून विविध प्रोजेक्टसाठी काम केलं. याशिवाय जपानी कंपन्यांच्या कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्येही त्या सहभागी होतात. 'येत्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये आणि पुण्याजवळ अनेक जपानी कंपन्या येणार आहेत. या कंपन्यांमध्ये अनुवादकांची आणि दुभाषांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. त्यामुळे या करिअरला आश्वासक भवितव्य आहे,' असं त्या म्हणतात. जपानी भाषांतराच्या क्षेत्रातही विविध गरजांनुसार काम करणाऱ्या व्यक्तींची सध्या कमतरता भासत आहे. याशिवाय रिसर्च ओरिएंटेड कामंही मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातही विविध संस्थांच्या माध्यमातून जपानी भाषा शिकविली जाते. अगदी कॉलेज स्तरापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील व्यक्ती एक विद्यार्थी म्हणून जपानी भाषेकडे आकर्षित होत आहेत. 'काही वेळा जपानी पुस्तकांचा मराठी अनुवाद करण्याच्या उद्देशानेही विद्यार्थी जपानी भाषा शिकण्यासाठी येतात,' असं निरीक्षण अनुप्रीता यांनी नोंदविलं.

जपानी भाषेचे शिक्षण घेण्यासाठी काही महत्त्वाची कौशल्यं असणं आवश्यक आहे, असंही त्या म्हणतात. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असेल आणि जपानी भाषेची, तेथील संस्कृतीची मूळापासून आवड असेल, तर या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपण होऊन पुढे येण्याची आवश्यकता आहे. अनुवादक म्हणून काम करण्यासाठी, कोणत्या क्षेत्रातील कंपनीसाठी अनुवादक म्हणून काम करावयाचे आहे, त्या क्षेत्राविषयीही माहिती हवी; तसंच संबंधित क्षेत्रातील संकल्पनांचा शब्दसंग्रह आपल्याला माहीत अस‌णं आवश्यक आहे, असंही अनुप्रीता यांनी सांगितलं. अनुवाद हा संकल्पना किंवा आशयाचा असावा, असंही अनुप्रीता स्पष्ट करतात. एखाद्या जपानी कंपनीमध्ये दुभाषा किंवा अनुवादकाचं काम करत असतानाच इतर बाहेरच्या कंपन्यांच्या प्रोजेक्टसाठीही काम करता येतं. जपानी भाषेविषयी आवड असणं, त्यात करिअर करणं आणि जपानी भाषेचं शिक्षण देणं या स्वतंत्र गोष्टी असल्याचं अनुप्रीता यांनी सांगितलं. अनुप्रीता यांनी मात्र जपानी भाषा शिक्षक म्हणूनच स्वतःचं क‌रिअर विकसित केलं. गेल्या काही वर्षांपासून विविध परकीय भाषांमधील करिअर विकसित होत आहे. त्यामध्ये जपानी भाषेतील करिअरला भवितव्य असल्याचं त्यांनी सांगितलं.Japanese language as career

career in japanese

japanese translator career

japanese career forum

french language career

language career fair

sign language career

sign language career salary

foreign language career

No comments:

Post a Comment