To study in foreign you will get scholarships
परदेशी विद्यापीठातून पीएचडी करणं, हे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. मात्र, अनेक वेळा पैशांच्या कमतरतेमुळे त्यात अडथळे येतात. अशा स्थितीत 'स्कॉलरशिप स्टडी' हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आपल्याही मनात परदेशात शिकण्याचं स्वप्न असेल, तर त्याला पंख देण्याची वेळ आली आहे. अनेक परदेशी विद्यापीठं होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन आमंत्रित करत आहेत. या स्कॉलरशिपसाठी ऑनलाइन अर्जसुद्धा करता येतो.
इंटरनॅशनल पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलरशिप
आरएमआयटी युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाकडून ही स्कॉलरशिप दिली जाते. संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी ही स्कॉलरशिप दिली जाते. यात तीन वर्षांहून अधिक कालावधीच्या ट्युशन फीचा समावेश असतो. अर्ज करताना मात्र आपल्याकडे पीएचडीची डिग्री नसायला हवी.
पात्रताः स्कॉलरशिपच्या कालावधीसाठी ऑस्ट्रेलियाच्या व्हिसा असणं गरजेचं आहे; तसंच विद्यार्थ्याचं शैक्षणिक रेकॉर्ड चांगलं असणं गरजेचं आहे.
किती स्कॉलरशिप : ७५
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑक्टोबर
वेबसाइट : www.rmit.edu.au
लंडनच्या किंग्ज कॉलेजची स्कॉलरशिप
लंडन येथील किंग्ज कॉलेजकडून पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप दिली जाते. इतिहास विषयातील पीएचडीसाठी ही स्कॉलरशिप असून, ती केवळ भारतीय विद्यार्थ्यांसाठीच आहे. इतर देशांत असलेले अनिवासी भारतीयसुद्धा या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात.
पात्रताः किंग्ज कॉलेजकडून (लंडन) अॅडमिशनसाठी परवानगी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाईल. स्कॉलरशिपचा कालावधी तीन वर्षांचा असेल.
किती स्कॉलरशिप : २
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०१५
वेबसाइट : www.kcl.ac.uk
No comments:
Post a Comment