Mosquitoes suck 100 litres blood a day from citys urban areas says experts in a national conference on emerging trends in entomology

Mosquitoes suck 100 litres blood a day from city's urban areas says experts in a national conference on emerging trends in entomology

मदुराईत डासांच्या ४० प्रजाती असून ते डास दिवसाला १०० लिटर रक्त पित असल्याचे स्पष्ट झाले आहे. एमर्जिंग ट्रेंड ऑन एंटोमलॉजी या विषयावर आयोजित एका राष्ट्रीय परिषदेत हा दावा करण्यात आलाय. मदुराईतील अमेरिकन कॉलेजात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

मदुराईत डासांच्या ४० प्रजाती असून ते डास दिवसाला १०० लिटर रक्त पित असल्याचे स्पष्ट झाले आहे. एमर्जिंग ट्रेंड ऑन एंटोमलॉजी या विषयावर आयोजित एका राष्ट्रीय परिषदेत हा दावा करण्यात आलाय. मदुराईतील अमेरिकन कॉलेजात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मदुराईत जलद गतीने झालेल्या शहरीकरणामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे अमेरिकन कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. आर. सेल्वराज पांडियन यांनी म्हटले आहे. डॉ. पांडियन हे गेली ३० वर्षे डासांच्या प्रजातींचे अभ्यासक आहेत. सध्या ते पीएडी करणाऱ्या संशोधकांचे गाईड म्हणून काम पाहत आहेत. मदुराईत एडीस, आर्मिजेरस, अॅनॉफेलीस, क्युलेक्स आणि मान्सोनिया हे डास आढळतात असे डॉ. पांडियन म्हणाले.

मदुराई शहराच्या काही भागात डासांच्या काही प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. या डासांनी शहरातील परिस्थितीशी जुळवून घेत आपल्या प्रजातीचा विकास केला असल्याचेही डॉ. पांडियन यांनी सांगितले. 

हे डास कार, बस आणि ट्रेनसारख्या वाहनांद्वारे एका ठिकाणाहून दुसरीकडे, किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करतात. हे डास अन्नाशिवाय १० दिवस राहू शकतात. नव्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे प्रजनन होते. एडीस हे डास स्वच्छ पाण्यावर वाढतात, तर मॅन्सोनिया डास जलीय वनस्पतींवर वाढतात. हे डास ग्रामीण भागात राहणे पसंत करत असले, तरी शहरातील घरांमध्ये कुड्यांमध्ये रोपटे वाढण्याच्या प्रकारामुळे या डासांनी आता शहकांमध्येही आपला जम बसवला आहे. 


डॉ. पांडियन यांनी केलेल्या अभ्यासानुसार, एका व्यक्तीला एका दिवसाला सुमारे १००० डास चावतात. तर, काही भागांवर एका व्यक्तीला दिवसाला १०० डास चावतात. प्लास्टिक बॅगामुळे शहरांमधील गटारांमध्ये पाणी साचून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे गटारांमध्ये डासांची पैदास वाढली आहे. असे अमेरिकन कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभागाचे सहप्राध्यापक एम. राजेश यांनी या परिषदेत सांगितले. पर्यारवणाचा विचार करून आपण स्वच्छता राखल्यास डासांचे प्रमाण कमी होऊ शकते असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. जॉन व्हिक्टर यांनी मात्र मदुराईत दिवसाला १०० लिटर रक्त शोषतात या माहितीचा इन्कार केला आहे. हे काल्पनिक अनुमान असल्याचे डॉ. व्हिक्टर यांचे म्हणणे आहे. डासांमुळे होणारे रोग रोखायचे असल्यास डासविरोधी मोहिमांमध्ये लोकांचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली गेलेली आहे, मात्र लोक त्यावर अंमलबजावणी करताना दिसत नसल्याची खंतही डॉ. व्हिक्टर यांनी व्यक्त केली. 

No comments:

Post a Comment