Thursday, August 30, 2012

11:33 PM

NCERT scraps class 8 talent search exam Scholarship aspirants rue council's decision; coaching classes at the receiving end

NCERT scraps class 8 talent search exam
Scholarship aspirants rue council's decision; coaching classes at the receiving end

It's been months that lakhs of class VIII students across the country have been preparing for the National Talent Search Exam (NTSE), with many of them even sacrificing their summer vacations to keep their focus. However, they won't be able to take the prestigious talent search exam this year as National Council for Educational Research and Training (NCERT), which conducts NTSE for class 8 and class10 every year to award 1,000 scholarships, has recalled the exam for class 8 from this year on.
The class 8 students, who had been preparing hard for NTSE, are clueless a confused lot. Only until last week they were exchanging notes with each other. And this week, they have got to know about the exam being cancelled. A parent, who has enrolled her child in a renowned coaching centre known for IIT entrance exam, said, “We have already spent Rs25,000 for the NTSE classes which began in May. They have refused refund, saying that they had already covered 90% of the course.”
KJ Somaiya College, which has been coaching 50 class 8 students since 2006 (when NTSE started for class 8), is dealing with students demanding a 40% refund of the total fee of Rs4,500. Prof SP Vaidya, who coaches the children, said, “NCERT should have taken the decision well in advance to avoid discomfort to children. Also, instead of recalling class 8 exam, the NCERT should have discontinued it for class 10 as most students focus on their boards.”
This, even as www.msce.nice.in, the website of the Maharashtra State Council for Examination (MSCE) that organises the first level of NTSE, has not been updated to announce the cancellation of class 8 talent exam. While MSCE commissioner Mahavir Mane was unavailable for comment, a senior MSCE officer Manegaokar clarified, “We have posted information only about class10 exam on our website (www.mscepune.in), implying that class 8 is not included.”
Director of Examination (NTS) at NCERT, Sridhar Srivastava was unavailable for comment. Email sent to him elicited no response either. Clarifying about delay, a NCERT official said, Our proposal (to scrap NTS for class 8) was sent to MHRD in December 2011, but was approved only in July 2012.” But he refused to divulge any more.
The two levels of NTSE for class 10 would be conducted in November and next May. NTSE forms for class10 are available with the state liaison officer and on the MSCE and NCERT website for which last date is August 31.
5:50 PM

Territory Manager - Mumbai

Territory Manager - Mumbai

Greetings from CMS Info Systems Pvt. Ltd.!!!
We welcome the candidature for the above mentioned position from Ex-Servicemen (Retired Colonels / Lt. Colonels preferably from Infantry background) and candidates having good experience in the Logistics Industry. The details are as follows:
Main Activities:

  1. Overall Accountability for Territory Operations.
  2. Effectively handling Day to day Logistics operations, maintenance and route optimization
  3. Fleet Management
  4. Manpower Management
  5. Liaison with government bodies (RTO, Police and Municipal etc)
  6. Handling Employee Relations matters
  7. Provide efficient and effective customer service to achieve high customer satisfaction levels.
  8. Effectively handle process related improvements
  9. Hiring, Managing and developing a proactive professional team
Key Competencies:
  • Problem Solving
  • Working with others
  • Persuasive communication skills
  • Goal Orientation
  • Advanced level of report writing and report presentation skills
Prerequisites:
  • Formal education and degree in any stream having practical experience in fleet management and logistics functions in a highly manpower intense operations
  • Strong analytical skills
  • Excellent PC skills, especially Word, Outlook, Excel
  • Strong analytical skills
  • Good communication and influencing skills
  • Cultural awareness and sensitivity
  • Ability to be effective in a matrix structure and lead through influence
Experience: 8 - 13 Years
Education: 1. UG - Any Graduate - Any Specialization
2. PG - Any PG Course - Any Specialization, Post Graduation Not Required
Location: Navi Mumbai
Best Regards,
HR Team

Wednesday, August 29, 2012

12:27 AM

Why not earn while you learn? If you can balance work and studies, it gives a good opportunity to jumpstart your career even before graduation

Why not earn while you learn?
If you can balance work and studies, it gives a good opportunity to jumpstart your career even before graduation

How would it feel to be earning pocket money while studying? Doesn’t the idea sound great? For most students, not being dependent on their parents for funds and the resultant feeling of independence can be exhilarating to say the least. One can take friends out for special treats and celebrations or give gifts as per one’s preference without being unduly worried about the cost. Most important of all is the ability to impress someone you may have a crush on by taking them to a fancy restaurant all by yourself instead of waiting to be asked out in a group.
The icing on the cake is that one sets the foundation for a career well in advance. While fellow-students are still in the process of learning how to write their bio-data for job applications after graduation, here you already have a job in place. While others worry endlessly about what career to opt for in future, one has already jumpstarted and is way ahead of them all.
However, while many students would love to enjoy such benefits, they don’t always realize that there is a cost attached. Balancing studies along with work is not always an easy task. As a matter of fact, managing day-to-day work schedules along with studies can get quite complicated and may not be everyone’s cut of tea. It requires lot of effort and mind space to deal with two completely different things in a day. Right from getting up in the morning for the college in your ‘casual’ attire to switching to ‘formal’ apparel for work, it is a big transition that has to be done, not only in terms of appearance but behaviour as well.
While there are some students who do manage to pull this off, a lot depends upon the stage in their education when they begin and the type of work profile they have. Taking up a job for the first time in your life in a year when you have the XII board exams or final year university exams is not advisable. You will be too worried about studies to make a good impression at work and being unused to the double strain of work plus study could impact exam performance as well.
Unless if there is some amount of flexibility provided, it can have a reverse effect on your studies as well as the much-envisaged boost to social life. If the organization is too strict with interns, rather than being able to enjoy more with friends, one could well end up having to skip movies and other celebrations. Some interns have even experienced being called to work on Sundays and public holidays, which means they miss out on weekend picnics and even one-day excursions with their college friends.
Umesh Bhanushali, a SY BCom student from St. Andrew’s College, shares, “I am working since the last two years with a textile company at Goregaon. Since this is my second year of degree college, it is not quite as difficult to manage my studies along with my work. However, once I get into the third year, obviously it would make sense to concentrate more on my studies and resume the job after I graduate.. I feel that working during the initial academic years gives you a good experience for your future. Also, you earn good amount of pocket money. I attend my lectures in the morning and go to the office after that.”
Working during your academic years is not as easy as it seems to be. There are various compromise and adjustment involved in it. There are situations where you literally have to rush from your college after the lectures for the office to reach on time no matter whatever the situation is! You have to compromise on your college life, when you are actually supposed to enjoy. Not only that, but the hectic schedule can also end up putting your health down, which not only will affect your studies but also the work.
Kirti Joshi (name changed) is also an SY BCom student from another suburban college. She is currently working in a call centre and expressed, “I have been employed at a call centre at Thane since the last few months. However, now I am feeling that it is too hectic for me as I don’t get time for myself. There are various complications involved when it comes to balancing my work as well as college studies. Though I get a good salary working in a call center, it is difficult to deal with their changing shifts. Sometimes they call us for afternoon shift and sometimes for night shifts. I am considering quitting my job after completing this month and directly rejoin it after I complete my graduation.”
Not all the students get a chance to work as well as study simultaneously. There are various courses that take up all the time and do not permit any free time for a job. Then there are certain careers like chartered accountant or in the management field, where work experience becomes a must after reaching certain stage of the course for a better job opportunity. Such internships may not pay well or only expenses may be reimbursed but still students are ready to make the necessary adjustments for their future career.
There are even situations where during financial crisis in the family, a student wishing to do a particular professional course can’t afford to do it due to the high fees. The good news for such students is that part time courses are also available so they can earn during the day time and attend the course after office hours.
Certain families do want the children to get an early start when it comes to the business activities, make an effort to help and understand the business as soon as they are done with their board exams. Aniket Chheda, a FYBAF student, St. Andrew’s College, highlights, “We have our own family business here and since I am the eldest among my siblings, my father wants me to dedicate a few hours of my day to it. In exchange for these efforts, my father pays me Rs. 4000 monthly as a pocket money”.
The ‘earn while you learn’ concept has its share of pros and cons but consider when you plan to take the first step and whether you can sustain it thereafter or not. Some organizations do agree to give interns a leave of absence during the graduation year but it may not always be possible, especially in smaller companies, so think it over before taking a decision.
12:09 AM

Career options open up

Career options open up

One of the visible changes in recent years is the rising number of women professionals across industry segments. From entering the corporate corridors to being self-employed entrepreneurs, they are even increasingly stepping into hazardous professions including the police force and fire fighting, so the scope for careers has begun to balance out in their favour. Prior to the new millennium, career-oriented courses for women were quite frankly, limited. With relatively few fields like software coding, interior and jewellery designing to choose from, one really couldn’t fault them for displaying a marked lack of enthusiasm.

However, things have improved drastically since then. The boom in several industry segments had created a new demand for trained professionals. Since women fit the bill perfectly due to their temperament and tenacity, the courses specifically tailored for them have also witnessed a multiplier effect.

While women were visible in certain fields earlier, the lack of focused training programs had restricted their numbers. However, now not only are the number of institutions offering these courses on the rise, but the sheer range of options has also increased exponentially. This workforce augmentation in terms of quality and quantity has really opened up the field, encouraging women to pursue careers where their presence would have been unheard of just a few years ago.

The travel and tourism sector has witnessed a boom and women-specific training programs have quadrupled. Media is another field where the entire range from journalism to advertising and public relations is covered by the BMM course. Courses for improving diction have also witnessed a surge due to demand from call centers and BPOs. Even previously male-dominated bastions like real estate are offering more courses for women.

Sunday, August 26, 2012

10:56 PM

Vaastu expert, points out that the southeast is the home of the fire element

Vaastu viewpoint

Nitien Parmar, a Vaastu expert, points out that the southeast is the home of the fire element and the northwest is the home of the air element. Because of the interconnectedness of these two elements, fire features should only be placed in the southeast or northwest of any room, building or property. This includes kitchens, stoves, fireplaces, open flames and outdoor cooking features.
A fire feature should not be situated in the southwest or northeast quadrant of a property, building or room. A kitchen or fireplace, for example, in the southwest brings conflicts and arguments. A kitchen or fireplace in the northeast will cause whatever money you make to 'burn up' and go away. It also brings health problems, conflicts and arguments.
8:13 PM

Make Money With Your Favorite Tiny Links

Hello Friends

Now You Can Make Money Online By Posting Links In Facebook or You can Send By Mail


Create Your Account Log in to your account and make a link for any Awesome Website Like Rapidshare.com, Cnet.com, Facebook.com and many more Paste link to your adf.ly account shrink tab and click shrink now your Little link is ready and look Like This link http://adf.ly/CFvt2  and send it by mail or facebook or you can paste this in FB comment box and tell them why people click to your link.


                               SO CLICK BELOW IMAGE TO JOIN NOW:



adfly.125x125.2 Make Money With Your Favorite Tiny Links
7:52 PM

डरके आगे.. जीत है!

साहसी क्रीडाप्रकारांचा ‘चॅलेंज कोर्स’ हा शाळेत, स्टेडियमवर अथवा पार्कमध्ये उभारता येतो. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती त्यात सहभागी होऊन चित्तथरारक अनुभव घेऊ शकतात. हे साहसी क्रीडाप्रकार करताना येणारी धम्माल, गम्मत आणि साहस यातून जो विलक्षण अनुभव मिळतो, तो चार भिंतींत घेतलेल्या पुस्तकी शिक्षणातून कधीच मिळू शकत नाही!
‘बाई, मी नाऽऽ सुरुवातीला खूप घाबरले होते, पण हा ‘पॅरलल रोप’ पार केल्यावर खूप धम्माल वाटली..’ १० वर्षांची कश्मिरा आपल्या शिक्षिकेला सांगत होती. ‘सर, मला वाटलंच नव्हतं की मी ही एवढी उंच ‘रॉक वॉल’ चढू शकेन! पण मी चढलो,’ १२ वर्षांचा समित  अभिमानाने फुललेल्या चेहऱ्याने सांगत होता.. या दोघांचेही बोलणे बेतले होते ते साहसी क्रीडाप्रकारांविषयीच्या त्यांच्या प्रशिक्षणादरम्यानच्या अनुभवावर..
डोंबिवली येथील विद्यानिकेतन या शाळेत हा ‘चॅलेंज कोर्स’ उभा करण्यात आला आहे. असा कोर्स उभारणारी देशातील ही पहिलीच शाळा आहे. ‘अहो, मी उंचीला फार घाबरायचे, पण या कोर्समधील साहसी खेळांची आव्हाने पूर्ण केल्यानंतर माझी भीती साफ पळून गेली.’ चाळिशीच्या एक शिक्षिका आपल्या अनुभवाबद्दल सांगत होत्या. ‘‘मुलांना शिकवायच्या आधी आम्ही सर्व शिक्षकांनीही या ‘चॅलेंज कोर्स’चा थरारक अनुभव घेतला. सुरुवातीला या वयात आपण इतके साहस करू शकू का, याविषयी मनात साशंकता होती. पण जसजसे आम्ही वेगवेगळ्या स्तरांवरील साहसी खेळांना सामोरे जायला लागलो, तसतसा आमचा आत्मविश्वास वाढायला लागला. ‘कॉब वेब’ सुरुवातीला फारच सोपे वाटले, पण संघभावना जागृत करणारा हा साहसी खेळाचा प्रकार फारच छान आणि युनिक आहे! तो खेळताना बरंच काही शिकायला मिळतं..’’ आणखी एक तिशीची शिक्षिका सांगत होती..
एका विद्यार्थ्यांच्या आईने या चॅलेंज कोर्सवर सराव केला. ‘इतर खेळांमध्ये दुसऱ्या व्यक्तीशी किंवा संघाशी स्पर्धा असते, हार-जीत असते, जास्त किंवा कमी गुण असतात, या चॅलेंज कोर्समध्ये तसे काही नाही. हं, पण एक अत्यंत वेगळी गोष्ट यामध्ये अनुभवता येते, ती म्हणजे, आपण स्वत:च आपल्याला आव्हान देतो आणि स्वत:ला दिलेले आव्हान पूर्ण करताना आपणच आपल्याला मनोमन अधिक किंवा कमी गुण देऊ शकतो; नव्हे, ते मनोमन दिले जातात. आपोआप आत्मपरीक्षण होते,’ या शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘बर्मा ब्रिज बघितल्यावर आधी मला वाटलं की, हे काय डोंबाऱ्याच्या खेळासारखे! पण, जेव्हा जमिनीपासून २०-२५ फुटांवर आपण एका बारीक दोरीवर उभे असतो आणि आपल्या हाताच्या पंजांनी आधाराला म्हणून दोन बारीक दोऱ्या पकडलेल्या असतात, अशा वेळी आपला मेंदू आपल्या मनाला वेगळ्याच तऱ्हेने विचार करायला लावतो! मन, शरीर आणि मेंदू हे एका वेगळ्या अवस्थेत पोचतात, त्यामुळे अचूक निर्णय घेण्याची क्षमता खूप वाढते, असे लक्षात आले,’ या शाळेचे क्रीडाशिक्षक सांगत होते..
२००७ साली अमेरिकेत ‘चॅलेंज कोर्स टेक्नॉलॉजी’ या विषयावरील एक परिसंवादात मी सहभागी झालो होतो. तेव्हापासून मनात इच्छा होती की, आपल्याकडील एखाद्या शाळेत असा अभ्यासक्रम उभा करावा आणि विद्यानिकेतनच्या पंडित सरांनी ही कल्पना शाळेत प्रत्यक्षात आणली.
अत्यंत सुरक्षित वातावरणात अनेक साहसी खेळांचे प्रकार एकत्रितरीत्या जिथे उभारले जातात त्याला ‘चॅलेंज कोर्स’ असे म्हणतात. ब्रोकन ब्रिज, हॉरिझाँटल लॅडर, बर्मा ब्रिज, रॉक वॉल, रेडर ब्रिज, पॅरलल रोप्स, टायर ट्रॅव्हर्स अशा प्रकारचे साहसी खेळ वैयक्तिक कौशल्य वाढविण्याकरता असतात, तर ऑस्ट्रेलियन वॉक, टायर मॅजिक, कॉब वेब, वूझी अशा प्रकारचे साहसी खेळ हे सांघिक भावना वाढविण्यासाठी उपयोगी पडतात. ‘चॅलेंज कोर्स’ शहरामध्ये शाळेत, स्टेडियमवर अथवा पार्कमध्ये उभे केले जाऊ शकतात. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती या चॅलेंज कोर्सचा चित्तथरारक अनुभव घेऊ शकतात. धम्माल, गम्मत आणि साहस या गोष्टींमधून एक वेगळ्याच प्रकारचे प्रशिक्षण मिळविता येते की, जे क्लासरूममध्ये कधीच उपलब्ध होत नाही!’
7:50 PM

प्रवेश मिळाला; पण राहायचं कुठे?

खेडोपाडय़ातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या जोरावर उच्च शिक्षणाचे दरवाजे किलकिले होतात खरे; पण शैक्षणिक संस्थांमधील तोकडय़ा निवासव्यवस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांपुढे राहायचे कुठे, हा यक्षप्रश्न उभा ठाकतो. हॉस्टेलमधील मर्यादित प्रवेशसंख्या, तिथल्या अपुऱ्या सोयीसुविधा, राहण्याचे इतर महागडे उपलब्ध पर्याय यामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना कुणीही वाली नाही.
दूरगावच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक गरज ठरणाऱ्या हॉस्टेलचा प्रश्न ना महाविद्यालयांना महत्त्वाचा वाटत, ना राज्यकर्त्यांना!
परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र प्रवेशाची धावपळ सुरू होते. उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात अथवा राज्यात स्थलांतर करतात. त्यात ग्रामीण भागातून मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. सध्याच्या मार्काच्या जीवघेण्या स्पध्रेमध्ये दर्जेदार महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी बराच आटापिटा करावा लागतो. बरीच धावपळ केल्यानंतर एकदा का त्या विशिष्ट महाविद्यालयात, विशिष्ट अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला तरी सर्व काही आलबेल होते, असे नाही. शिक्षणासाठी परगावातून आलेल्या विद्यार्थ्यांसमोर एक मोठी समस्या आ वासून उभी असते.. ती म्हणजे राहायचं कुठे? चित्रपटांमधून दाखवलं जाणारं हॉस्टेलचं जीवन आणि सीनिअर्सबद्दल ऐकलेल्या सुरस कथा यामुळे कधी ना कधी हॉस्टेल लाइफ अनुभवावं, ही इच्छा प्रत्येकालाच आपल्या विद्यार्थीदशेत कधी ना कधी झाली असेलच. हॉस्टेलमधल्या बऱ्या-वाईट गोष्टींचा अनुभवही प्रत्येकाला घ्यायचा असतो. त्यामुळे बाहेरगावचे विद्यार्थी त्या शहरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांपेक्षा हॉस्टेलमध्येच राहणं पसंत करतात. त्याहीपेक्षा मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये एकटं राहण्याचा अनुभव त्यांच्यासाठी खूप वेगळा असतो आणि तो त्यांना दवडायचा नसतो.
प्रत्यक्षात मात्र, असं दिसून येतं की, या महानगरांमध्ये  शतकी परंपरा वागवणारी मोठमोठी महाविद्यालये आहेत खरी, पण त्यांच्या आवारात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. महाविद्यालयांतील एकूण विद्यार्थी क्षमतेच्या फक्त १० ते २० टक्केच विद्यार्थी त्या निवासी व्यवस्थेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे उत्तमोत्तम महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळूनही अनेकदा कुठल्या ना कुठल्या कारणांपायी हॉस्टेलची सोय न झाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागते. बिकट आíथक परिस्थिती, कमी गुण, वशिलेबाजी यांमुळेही त्यांच्यावर ही वेळ ओढवते.    
मुंबई-पुण्यासारख्या काही शहरांमधील मोठय़ा महाविद्यालयांत हॉस्टेलची सोय आहे, शिवाय विद्यापीठांतही आहे. मात्र अशा हॉस्टेलच्या प्रवेशासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे, अटींची पूर्तता करणे आवश्यक ठरते. अनेकदा मुलांना अशा ठिकाणी प्रवेश न मिळाल्याने खासगी हॉस्टेल हा पर्याय उरतो. मात्र खासगी हॉस्टेलचे शुल्क जास्त असल्याने सर्वानाच ते सोयीचे होत नाही.
हॉस्टेलला प्रवेश मिळवताना विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असाही मुद्दा येतोच. जर मुला-मुलींचे हॉस्टेल असेल तर मुलींसाठी फक्त १५ टक्के जागाच राखीव असतात. मग या विद्यार्थिनींना आपली राहण्याची व्यवस्था खासगी तसेच वर्किंग वुमन हॉस्टेलमध्य करावी लागते. व्हीजेटीआयसारख्या मोठय़ा महाविद्यालयातही हजार मुली असताना हॉस्टेलमध्ये मुलींसाठी केवळ शंभर जागा उपलब्ध आहेत. पुरेशी हॉस्टेल व्यवस्था नसल्यामुळेही उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींच्या इच्छेवर आणि उत्साहावर विरजण पडते.
गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई आणि पुण्यासारख्या मोठय़ा शहरांत हॉस्टेलची मोठी कमतरता भासत आहे. पुण्यात निदान खोल्या भाडय़ाने मिळतात किंवा पेईंग गेस्ट म्हणून तरी राहता येतं, पण मुंबईमध्ये या सोयीसुद्धा विद्यार्थ्यांना अभावानेच उपलब्ध आहेत.
सरकारी महाविद्यालयांमध्ये हॉस्टेलच्या सुविधेची बव्हंशी उणीव भासत असताना खासगी महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांसाठी निवासव्यवस्था उपलब्ध असतेच, असे नाही. खासगी विद्यापीठांमध्ये हॉस्टेलची सोय असते खरी, मात्र त्यांचे दर चढे असतात. खासगी महाविद्यालयांमध्येही तीन-चार हजार विद्यार्थी शिकत असताना हॉस्टेलमध्ये फक्त ४०० ते ५०० विद्यार्थ्यांचीच सोय असते. अशा परिस्थितीत मुंबईत वडाळा, अ‍ॅन्टॉप हिल, दादर यांसारख्या भागात एका खोलीत सात-आठ विद्यार्थी कसेबसे राहत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र तिथल्या गल्लीबोळात विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेले अभ्यासाचे वातावरण मिळतेच, असे नाही. सार्वजनिक उत्सव आणि इतर कोलाहलात तिथल्या वातावरणाचा त्रासच या विद्यार्थ्यांना अधिक होतो. अशा वेळी हुशारीने, चिकाटीने पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त २५ ते ३० टक्के असते.
आपल्याकडे महाविद्यालयाचे शुल्क ठरवायला शिक्षण शुल्क समिती आहे, मात्र हॉस्टेलचे शुल्कठरवायला कोणतीच समिती नाही. अनेक ठिकाणी हॉस्टेलचा प्रवेश हा विद्यार्थ्यांची आíथक स्थिती पाहून न देता गुणवत्तेवर दिली जातात, त्यामुळे गरजू, गरीब विद्यार्थ्यांना हॉस्टेलला प्रवेश मिळत नाही. हॉस्टेल न मिळाल्यामुळे खासगी खोल्यांवर भरमसाठ भाडं देत विद्यार्थी तग धरतात.
महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना गुणवत्तेमध्ये आले तरी हॉस्टेलला प्रवेश मिळेलच, याची शाश्वती नसते. म्हणूनच एखाद्या महाविद्यालयाचे नाव ऐकून त्या शहरात पोहोचलेले विद्यार्थी राहायला जागा नसल्याने माघारी फिरतात.
परगावच्या विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था हा खरंतर अतिशय ज्वलंत मुद्दा असूनही आजमितीस सरकारने या मुद्दय़ाकडे काणाडोळा करणेच पसंत केले आहे. सरकारसमोर वारंवार हात पसरूनही काही सोय उपलब्ध होत नाही, असे अनेक महाविद्यालयांच्या वॉर्डनचे म्हणणे आहे. आपल्याकडे शासनाने ‘उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह’ ही योजना डोळ्यांसमोर
ठेवलेली दिसत नाही. तसेच काही महाविद्यालयांमध्ये पुरेशी जमीन उपलब्ध असूनही हॉस्टेल बांधण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळत नाही. हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांला निदान एक कॉट, कपाट, टेबल, खुर्ची, दिवा, पंखा, मुबलक जागा, पाणी, टॉयलेट या सुविधा
मिळायला हव्या. कपडे धुण्यासाठी वॉिशग मिशग
आणि आंघोळीच्या गरम पाण्यासाठी हीटरही लावून
देता येऊ शकतो. पण बहुतांश हॉस्टेलमध्ये या प्राथमिक गरजाही पूर्ण होताना दिसत नाहीत. त्यात भरीस भर
म्हणून इतर सर्व खर्चही विद्यार्थ्यांकडूनच वसूल केले जातात. विजेच्या आणि पाण्याच्या बिलाबाबत त्यांना लुबाडले जाते. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी झाडुवाला आणि माळीचा खर्चही विद्यार्थ्यांवरच लादला जातो. रिक्रिएशन रूम, रीिडग रूम, वेटिंग रूम, कॉम्प्युटर रूम यांसारख्या सुविधाही हॉस्टेलमध्ये उपलब्ध असतातच, असे नाही. ५०० विद्यार्थ्यांसाठी एक टीव्ही रूम असते. त्यामध्ये फक्त शंभर जणांची आसनव्यवस्था असते. इंटरनेटचा चुकीचा वापर होईल, म्हणून ते उपलब्ध करून दिले जात नाही. मात्र ती काळाची
गरज आहे, हे फारसे कुणी लक्षात घेत नाही.
पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये टॉवरच्या टॉवर उभे केले जातात, मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची मात्र वानवाच आहे. जागेच्या कमतरतेमुळे पूर्वी जिथे हॉस्टेलमध्ये दोन विद्यार्थी राहायचे, तिथे आता तीन-चार विद्यार्थी दाटीवाटीने राहतात.     (पान १ वरून)    मुंबई आता प्रमाणाबाहेर वाढली आहे. त्यामुळे बदलापूर, पनवेल, विरार ही स्थानके जरी मुंबई परिसरात येत असली तरी प्रवासाच्या दृष्टीने फारच गरसोयीची आहेत. पण ती अडचण लक्षात न घेता या परिसरांतील विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश नाकारण्यात येतो. आयआयटी हॉस्टेलसारखी सुसज्ज व्यवस्था इतरत्र मात्र दुर्मीळच म्हणावी लागेल.
हॉस्टेलचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तेथील भोजनव्यवस्था म्हणजेच मेस. अनेक सरकारी किंवा खासगी हॉस्टेल्समध्ये भोजनव्यवस्थेची परिस्थिती आणीबाणीची असते. अशा वेळी हे विद्यार्थी डबेवाल्यांकडून डबे मागवतात. हॉस्टेलमधील भोजनव्यवस्था नीट असावी, यासाठी  नियमावली तयार होण्याची आवश्यकता असल्याचेही वॉर्डनचे म्हणणे आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये मेस नसते, त्यामुळे विद्यार्थी बाहेर जेवतात. तब्येत बिघडल्याने थेट अभ्यासावर परिणाम होतो, खर्च वाढतो. खाण्या-पिण्याच्या वयात मुलांच्या जेवणाची आबाळ होते, म्हणून पालकही नेहमी चिंतेत असतात आणि बरेचदा हॉस्टेलना न पाठवण्याचेही हे महत्त्वाचे कारण बनते. 
हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांपुढे उभ्या ठाकलेल्या आव्हानांचे स्वरूप वेगळे असते. ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांमध्ये सुसंवादाचा मोठा प्रश्न असतो. अनेकदा मागासवर्गीय मुलांना याचा खूप त्रास होतो. मुंबईमध्ये वरळी, गोरेगाव येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स आहेत. तिथे राहण्याचा भत्ताही मिळतो, पण व्यवस्था सुमार दर्जाची आहे. अशा वातावरणात नीट अभ्यास होत नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकणातून आलेल्या विद्यार्थ्यांना शहरी वातावरणाशी रुळायला वेळ लागतो.
तालुका आणि जिल्हा स्तरावर मागासवर्गीय मुलामुलींसाठी नवीन शंभर शासकीय वसतिगृहे तसेच सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी १००० क्षमतेची प्रत्येकी एक अशी एकूण सहा नवीन शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास राज्य शासनाने ऑगस्ट २००६ मध्ये मान्यता दिली होती. त्यानुसार तालुका स्तरावर मुलांसाठी ६० आणि मुलींसाठी ४० अशी एकूण शंभर नवीन शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात येणार होती.  मुंबई-पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी प्रत्येकी १००० मुलांच्या क्षमतेची एकूण सहा (२५० क्षमतेची प्रत्येकी ४ अशी एकूण २४) नवीन वसतिगृहे सुरू करण्यात येतील. ज्या तालुका किंवा जिल्ह्यांमध्ये मुला/मुलींच्या शासकीय वसतिगृहाची आवश्यकता आहे तेथे अशी वसतिगृहे सुरू करण्यात येतील. २००१ ची जनगणना लक्षात घेऊन ज्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त आहे, अशा तालुक्यात किमान एक वसतिगृह सुरू करण्यात येईल, अशा घोषणा शासनातर्फे करण्यात आल्या होत्या, मात्र त्या आजही कागदावरच असल्याचे दिसते. त्याची शंभर टक्के अंमलबजावणी झालेली दिसत नाही. प्रारंभी ही नवीन शासकीय वसतिगृहे भाडय़ाच्या इमारतीत सुरू करण्यात येतील. त्यासाठी २२ कोटी ३० लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. पसे मिळाले तर जमीन उपलब्ध होत नाही आणि जिथे जमीन आहे तिथे बांधकामासाठी पसे नाहीत, असा टोलवाटोलवीचा खेळ राज्यभर सुरू आहे. हॉस्टेलच्या कामांची कासवगतीची वाटचाल पाहता एकूण उपलब्ध निधीपकी पन्नास टक्क्यांहून अधिक निधी दरवर्षी लॅप्स (सरकारी भाषेत व्ययगत) होण्याची शक्यता असते. त्यामुळे तरतूद होऊनसुद्धा हॉस्टेल्सना मूर्त रूप आल्याचे पाहावयास मिळत नाही आणि विद्यार्थ्यांची फरफट सुरूच आहे.
आताशा परिस्थितीत सुधार होत असला तरी हॉस्टेलमधील वातावरण गढूळ असेल तर विद्यार्थ्यांचे हाल होतात. अभ्यासावरून त्यांचे लक्ष उडते. शहरी वातावरणातील नवलाईत गुंगून जातात. निरनिराळे शौक जडतात.
काही वर्षांपूर्वी हॉस्टेल म्हटले की डोळ्यांसमोर रॅगिंगचे प्रकार उभे राहायचे. अलीकडे मात्र  सरकारने, शिक्षण मंडळाने याबाबत घेतलेल्या कडक निर्णयांमुळे हे प्रमाण आटोक्यात आले आहे. तरीही, नव्या शहरात, नव्या महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीलाच तिथे कसे राहायचे, काय करायचे याबाबतचे मार्गदर्शन मुलांना कोणी करत नाही. हॉस्टेलमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांशी याबाबत सुसंवाद साधायला हवा. यावर उपाय म्हणजे मुलांना हॉस्टेलमध्ये विविध उपक्रम राबवले तर मुले इतर चुकीच्या गोष्टींपासून दूर राहतील.  आयएमएमसारख्या संस्थांमध्ये सीनिअर विद्यार्थी ज्युनिअर्सना रात्री दोन वाजेपर्यंत शिकवतात, परीक्षेच्या काळात मदत करतात, पुस्तके पुरवितात, पण इतर ठिकाणी असे वातावरण दिसत नाही. खरेतर महाविद्यालयांच्या प्राचार्यानीही हॉस्टेलमध्ये लक्ष द्यायला हवे, पण तसे होताना दिसत नाही. महाविद्यालयांमधील हॉस्टेलमध्ये २४ तास विद्यार्थी एकत्र आहेत, याचा उपयोग करून घ्यायला हवा. त्यांच्यातूनच कॉलेजसाठी नेतृत्व तयार करता येऊ शकते. मात्र तसे प्रयत्न होताना अभावानेच दिसतात.
नापास होऊनही वर्षांनुवष्रे हॉस्टेलमधील खोल्या अडवून बसलेल्या विद्यार्थ्यांना अटकाव करता यावा, यासाठी मुंबई विद्यापीठाने अलीकडे हॉस्टेल प्रवेशाचे नियम कडक केले आहेत. ज्यामध्ये महाविद्यालयामध्ये वरचेवर दांडय़ा मारणाऱ्या विद्यार्थ्यांवरही हॉस्टेल सोडण्याची वेळ येऊ शकते. याचे कारण की, विद्यार्थ्यांना त्यांचा अटेंडन्स रेकॉर्ड हॉस्टेलच्या वॉर्डनला द्यावा लागणार आहे. रेकॉर्ड समाधानकारक नसेल, तर विद्यार्थ्यांला हॉस्टेलमधून काढून टाकण्याचे अधिकार वॉर्डनला देण्यात आले आहेत. मात्र वरील सर्व गोष्टींची सगळीकडेच काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. 
विद्यार्थ्यांसाठी जिवाभावाचा ठरणारा हॉस्टेलचा प्रश्न विद्यार्थी संघटनांना उचलता येऊ शकेल, पण त्याबाबत कोणत्याच विद्यार्थी संघटनेने आक्रमक पावले उचलली आहेत, असे दिसत नाही. ‘आम्ही विद्यापीठांना आमच्या मागण्यांची निवेदने देऊनसुद्धा विद्यापीठ कारवाई करत नाहीत,’ असे विद्यार्थी संघटनांचे यावर म्हणणे आहे. ‘विद्यार्थी संघटनांना आत येऊ दिले तर राजकीय हस्तक्षेप व्हायला सुरुवात होईल, असा सूर महाविद्यालये आळवताना दिसतात. 
आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उच्च शिक्षणासाठी मोठय़ा शहरांपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना निवासासाठी हॉस्टेल ही एक प्राथमिक गरजच भासत असते. मात्र आजमितीस ही व्यवस्था दुर्लक्षितच राहिली आहे आणि त्याचा मोठा फटका विद्यार्थीवर्गाला बसत आहे. या यंत्रणेशी संबंधित असलेल्या सर्वानीच याबाबत त्वरित पावले उचलण्याची नितान्त आवश्यकता आहे.    विद्यापीठाची हॉस्टेल्स आणि प्रवेशक्षमता
इंटरनॅशनल स्टुडंट हॉस्टेल, चर्चगेट    - १२३
यूआयसीटी मुलींचं वसतिगृह, माटुंगा    - ३३
जगन्नाथ शंकरशेट हॉल, सांताक्रूझ    - १७२
कर्मवीर भाऊराव पाटील बॉईज हॉस्टेल,    - ८०
सांताक्रूझ  
महर्षी धोंडो केशव कर्वे गर्ल्स हॉस्टेल,    - ५०
सांताक्रूझ  
पंडिता रमाबाई गर्ल्स हॉस्टेल, सांताक्रूझ    - १६
सावित्रीबाई फुले गर्ल्स हॉस्टेल, सांताक्रूझ    - ७७
7:47 PM

सौंदर्याची साधना

गेल्या एक-दोन दशकांपासून शहरी भागातील  युवावर्ग ज्या प्रकारचे करिअर निवडतो, त्यात मोठे आणि वेगाने बदल होताना दिसतात. अगदी आता-आतापर्यंत करिअर निवडण्यासाठी त्यातून मिळणारे उत्पन्न, स्थिरता, समाजात असणारा मान हे निकष होते. आज मात्र त्यात बदल होताना दिसतात.
करिअर वा शिक्षणक्रम म्हणून मान्यता पावलेल्या अशा नाविन्यपूर्ण करिअरमध्ये फॅशन व सौंदर्यसाधना या दोन व्यवसायांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या दोन्ही क्षेत्रातील मागणी आणि त्या तुलनेत संधी आणि पर्यायही वाढले आहेत. यामुळे या क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी अद्ययावत व्यावसायिक शिक्षणाची नितान्त आवश्यकता असते. आज स्पा व ग्रूमिंगविषयी ग्राहकवर्ग उत्सुक असल्यानेही या क्षेत्रात निपुणता प्राप्त केलेल्यांना मोठी संधी उपलब्ध आहे.
आज सौंदर्यसाधनेसंबंधातील करिअर हे आर्थिकदृष्टय़ा अत्यंत उत्तम आहे. यात संधींचाही सुकाळ आहे. तसेच तिथे ग्लॅमरही प्राप्त होते. या करिअरमध्ये करिअरचे जे विविध पर्याय उपलब्ध आहेत, त्यात स्टायलिस्ट म्हणून करिअर साकारण्याची मोठी संधी मिळू शकते. त्याशिवाय केमिकल व कलर ट्रीटमेंटमध्येही तज्ज्ञ बनण्याची संधी मिळू शकते. त्यासोबत न्यूट्रिशन तज्ज्ञ, स्कीन प्रॅक्टिशनर्स, मेकअप आर्टस्टिस्ही बनता येते. त्वचा, केस आणि नखे यांची निगा आणि सौंदर्योपचाराच्या विविध संधी या करिअरमध्ये उपलब्ध होऊ शकतात. मात्र त्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळणे महत्त्वाचे ठरते. अलीकडे प्रशिक्षण घेतानाच कामाचा अनुभव घेण्याची संधीही प्राप्त होते. त्याद्वारे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो.
एफआयसीसीआय-पीडब्ल्यूसीच्या अहवालानुसार, आपल्या देशातील सौंदर्य सेवा विषयक उद्योगाचा आकार ७० अब्ज रुपये असून त्यात नजीकच्या भविष्यकाळात ३० टक्क्यांनी वाढ होईल, हेही सूचित करण्यात आले आहे. हे लक्षात घेतल्यास अनेक उत्तमोत्तम संधी प्राप्त होणाऱ्या क्षेत्रांमध्ये याचा निश्चितच समावेश होऊ शकेल. त्यामागची कारणे पुढीलप्रमाणे आहेत-
१. उत्तम कमाई : देशातील प्रमुख शहरांमधील अग्रगण्य हेअर ड्रेसर्स महिन्याकाठी लक्षावधी रुपये कमावतात. योग्य प्रशिक्षणानंतर नोकरी मिळवलेल्या नवोदित ब्युटी थेरपीस्ट वा हेअर ड्रेसरला ब्रँडेड स्पा/सलूनमध्ये दहा ते १५ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.  दोन वर्षांत हेच वेतन दुपटीहून अधिक वाढते.
२. मोठी मागणी :  पूर्वी केवळ विशेष प्रसंगाकरिताच सलून्स व ब्युटी पार्लर्समध्ये  लोक वळायचे. आता ते नियमितपणे ब्युटी क्लिनिक्स व सलून्समध्ये जाणाऱ्या विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांची संख्या अधिक आहे. यामुळे प्रशिक्षित व्यावसायिकांना उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात.
३. उगवत्या उद्योजकांकरिता उत्तम संधी : या क्षेत्रात आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करणे फारसे कठीण नसते. मात्र त्याआधी योग्य ठिकाणी आणि पुरेसे प्रशिक्षण आणि कामाचा पूर्वानुभव असणे आवश्यक ठरते.
या क्षेत्रातील उत्तम करिअर प्रस्थापित करण्यासाठी सर्वात आधी उत्तम सौंदर्य प्रशिक्षण संस्था शोधा, ज्यामध्ये चांगल्या प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असतात आणि चांगले प्रशिक्षक असतात. त्या प्रतिष्ठित संस्थेला मान्यता असणे अनिवार्य असते. त्याशिवाय, ही संस्था म्हणजे सुरक्षितता व स्वच्छतेबाबतही उत्तम असायला हवी. अशा प्रकारच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये न्यूट्रीशन, कॉस्मेटॉलॉजी, मेकअप, स्पा व हेअर असे अभ्यासक्रम उपलब्ध असतात.अशा संस्थांमध्ये कमी कालावधीचा एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापेक्षा पदविका वा पदवी पातळीवरील प्रशिक्षण घ्यावे. तरच त्यातील अद्ययावत व त्यासंबंधातील विविध कौशल्य प्राप्त होते.
आवश्यक कौशल्ये - तुमचे संवाद व सादरीकरण उत्तम हवे: उत्तमरीत्या प्रशिक्षित ब्युटी थेरपीस्ट/ कॉस्मेटॉलॉजिस्ट किंवा हेअर ड्रेसरकडे उत्तम संवाद कौशल्य असेल तर त्या संस्थेसाठी मोलाचे ठरू शकते. ते ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकतात.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसेल अशा ट्रीटमेंट/ स्टाईलची शिफारस कशी करावी, ते योग्य प्रकारे स्पष्ट करू शकतात. यामुळे ग्राहकाचा तुमच्यावरील विश्वास वाढतो. तसेच यामुळे ग्राहक निश्चितच दर महिन्याला तुमच्याकडेच येतात.
चांगल्या प्रशिक्षण संस्थेत अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळालेले योग्य प्रमाणपत्र हे या करिअरमध्ये उत्तमरीत्या बस्तान बसविण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते.
7:46 PM

नव्यांची नवलाई

कॉर्पोरेट क्षेत्रात कंपनीचा सर्वार्थाने कायापालट व्हावा, यासाठी नव्याने करण्यात येणाऱ्या नोकरभरतीमध्ये युवावर्गाचा मोठय़ा प्रमाणावर विचार केला जात आहे. नव्या कल्पनांसह दाखल होणाऱ्या या युवा कर्मचाऱ्यांकडे कॉर्पोरेट क्षेत्र मोठय़ा आशेने बघत असल्याचे दिसून येते.
यातून कंपनीतील प्रचलित व्यवस्था आमूलाग्र बदलण्याची कंपनीची मानसिकता प्रतिबिंबित होते. वाढत्या स्पर्धात्मक परिस्थितीत जुन्या-नव्यांचा संयत समन्वय साधतानाच नव्याने रुजू होणाऱ्या युवा पिढीच्या माध्यमातून कंपन्यांच्या बदलत्या गरजांचे निराकरण करण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापना करत असल्याचे दिसून येते.
नव्या पिढीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण ठरतील, अशा व्यवस्थापकांची नवी नेतृत्व फळी कंपन्यांतर्फे तयार केली जाते. याचा लाभ अर्थातच व्यवस्थापन तसेच युवा व्यवस्थापकांनाही होत असल्याचे पुढील काही उदाहरणांवरून स्पष्ट होते.
या संदर्भात नमूद करण्यासारखी बाब अशी की, काही बडय़ा कंपन्यांनी त्यांच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या माध्यमातून आणि संबंधित विभाग व्यवस्थापकांच्या पुढाकाराने नव्याने दाखल झालेल्या युवा कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा-आकाक्षांची पूर्तता करण्यासाठी विशेष व नावीन्यपूर्ण योजनांची, उपक्रमांची सुरुवात केली आहे.
एचसीएल कंपनीमध्ये नवागतांच्या क्षमता आणि कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून अशा कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची मदतच नव्हे तर मार्गदर्शनही करण्यात येते. ब्ल्यू डार्ट एक्स्प्रेस कंपनीने महानगरातील उमेदवारांच्याच मागे न लागता द्विस्तरीय वा मध्यम स्वरूपाच्या शहरी भागांतून नव्याने कर्मचारी निवडण्यास सुरुवात केली असून त्यांच्या विविध स्वरूपातील विकासाची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.
सर्वोत्तम वा प्रभावीपणे काम करणाऱ्यांना व्यवस्थापकीय पाठबळ देऊन त्यांना उल्लेखनीय काम करण्यासाठी सदोदित प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने मनुष्यबळ विकास विभागातील दोन व्यवस्थापकांची खास नेमणूक करण्यात आली आहे. एस्सार उद्योग समूहात नव्या पिढीच्या व विकसित होणाऱ्या व्यवस्थापकांच्या सोबतीला ‘जेन एस्सार की- टॅलेंट मॅनेजर’ देण्यात आला आहे. मनुष्यबळ विकास विभागातील व्यवस्थापकही अशा कर्मचाऱ्यांसह सातत्याने काम करतात. याशिवाय उल्लेखनीय स्वरूपाचे काम करणाऱ्या युवा कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यास त्याची दखल कंपनीच्या सर्वोच्च पातळीपर्यंत घेतली जाते, ही बाबही उल्लेखनीय आहे.
वर उल्लेख केलेल्या निवडक पण प्रमुख उदाहरणांद्वारे हे स्पष्ट होते की, सर्वसाधारणपणे कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रस्थापित कंपन्यांपैकी बहुसंख्याक म्हणजेच अध्र्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा मध्यमवयीन वयोगटात समावेश होतो. अशा कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कंपनीतील सर्वसाधारण सेवा काल हा नऊ ते १४ वर्षे असतो. दीर्घकालीन संदर्भात ही स्थिती समाधानकारक व कंपनी-उद्योगाच्या विकासाला पूरक नसल्यानेच व्यावसायिकदृष्टय़ा प्रस्थापित वा प्रगतिशील कंपन्या युवा कर्मचाऱ्यांना नेमण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत.
आजच्या व्यवस्थापकांपुढे दुहेरी स्वरूपाची आव्हाने आहेत. यापैकी एक आव्हान म्हणजे हुशार व कुशल सहकाऱ्यांची निवड-राखण करणे असून कंपन्यांमध्ये नव्याने रुजू होणाऱ्यांशी संवाद साधण्याचे कामही तितकेच महत्त्वाचे ठरते, अशी भावना बडय़ा समूहातील अनेक व्यवस्थापक व्यक्त करतात.
नव्याने येणाऱ्या सहकारी- उमेदवारांचा मुद्दा लॉजिस्टिक्स क्षेत्रात काम करणाऱ्या ब्ल्यू डार्ट या  कंपनीपुढे एका वेगळ्याच संदर्भात उभा आहे. त्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वयच मुळी सरासरी २५ ते २६ वर्षे असल्याने आणि याच वयोगटातील कर्मचारी  या कंपनीत बहुसंख्य स्वरूपात असल्याने अशा कर्मचाऱ्यांना अधिकाधिक कालावधीसाठी राखून ठेवणे हीच त्यांच्यापुढील समस्या ठरत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कंपनीने महानगरे वा मोठय़ा शहरांतून उमेदवारांची निवड करण्यावर भर न देता लहान शहरांच्या उमेदवारांची निवड करून अशा मध्यम स्वरूपातील शहरांमध्ये जाऊन उत्साही व जिद्दीने काम करणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यावर भर दिला असून या बदलत्या उपाययोजनेचे फायदेशीर परिणामसुद्धा दिसू लागले आहेत.
थोडक्यात सांगायचे तर सध्या कंपन्यांमध्ये नव्या अपेक्षा-कल्पनांसह येणाऱ्या युवा उमेदवारांची भावी व्यवस्थापक म्हणून निवड करण्यावर भर दिला जात आहे, मात्र अशा उमेदवारांची निवड करताना उभ्या राहणाऱ्या आव्हानांचाही त्यांना गांभार्याने विचार करावा लागत आहे.
बदलत्या स्थितीवरून असे दिसते की, केवळ अभ्यासक्रम घसघशीत मार्कानी पूर्ण केलेल्या उमेदवारांचीच निवड-नेमणूक करण्यावर कंपनी व्यवस्थापन भर देत नसून कल्पक आणि नव्या उमेदीने काम करण्याची इच्छाशक्ती असलेल्या युवावर्गाला नवी संधी देण्यासाठी कंपन्या इच्छुक आहेत.
याचे दूरगामी स्वरूपातील लाभ जाणून व्यवस्थापन क्षेत्रात नव्याने रुजू होणाऱ्यांच्या नवेपणातील नवे फायदे समजून-उमजून त्यानुसार नियोजन व कार्यवाही करणे ही काळाची गरज आहे!
7:44 PM

फॅशन कोरिओग्राफी

फॅशन कोरिओग्राफी म्हणजे डिझायनरच्या मनातील कल्पना प्रत्यक्ष स्टेजवर उत्तमरीत्या साकारणे. जर तुमच्याकडे असे निर्मितीक्षम मन असेल आणि फॅशनच्या ग्लॅमरस जगात वावरण्याची आवड असेल तर करिअरसाठी फॅशन कोरिओग्राफीसारखा पर्याय निवडायला हरकत नाही.
फॅशन शो म्हणजे कॅटवॉक करीत रॅम्पवर बागडणं, असं आपल्यापैकी कित्येकांना वाटत असेल. प्रत्यक्षात मात्र तो शो आणि तिथले वातावरण प्रेझेंटेबल होण्यासाठी, सादरीकरण नजरेत भरेल असे होण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. आणि त्यासाठी निर्मितीक्षम व्यक्तींची गरज असते. कोणती गोष्ट कशी, कुठे जास्त खुलून दिसेल, याचा नेमका अंदाज असावा लागतो. जर तुमच्याकडे असे निर्मितीक्षम मन असेल आणि फॅशन-ग्लॅमरसारख्या जगात वावरण्याची आवड असेल तर करिअरसाठी फॅशन कोरिओग्राफीसारखा पर्याय निवडायला हरकत नाही. फॅशन कोरिओग्राफी हे करिअर कॅटवॉक कोरिओग्राफी म्हणूनदेखील ओळखले जाते. मुळातच, फॅशनचे विश्व हे नवनिर्मितीक्षम असते. त्यामुळे येथे संधीच्या दृष्टीने मुबलक वाव असतो. इथे नुसत्याच स्पेशलायजेशनच्या संधी नसतात, तर सुपर-स्पेशलायजेशनच्या संधी उपलब्ध असतात. फक्त फॅशनेबल पेहराव तयार करणे म्हणजे फॅशन करिअर इतकाच याचा सीमित अर्थ नाही, तर यात डिझायिनगबरोबर विशिष्ट प्रकारच्या कापडांची निर्मिती, त्यापासून तयार होणारे पेहराव, तसेच ज्वेलरी, चपला-शूज, बॅग्ज् आणि इतर अ‍ॅक्सेसरीज् या सर्व गोष्टींचा त्यात विचार केला जातो. हे क्षेत्र इतके व्यापक आहे की, त्यात फॅशन कोरिओग्राफी, फॅशनसंबंधित पत्रकारिता, सौंदर्य उत्पादनांशी निगडित व्यवसाय आणि मॉडेिलग या सर्व घटकांचा त्यात समावेश होतो.
वर उल्लेखिलेल्या विविध विभागांचे अचूक ज्ञान, आवश्यक ती समज असेल तर फॅशन करिओग्राफी हे तुमच्यासाठी योग्य करिअर ठरू शकते. फॅशन करिओग्राफी म्हणजे डिझायनरच्या मनातील कल्पना प्रत्यक्ष स्टेजवर उत्तमरीत्या साकारणे.
फॅशन/कॅटवॉक कोरिओग्राफीमध्ये दिलेल्या पेहरावात मॉडेल्सने एका विशिष्ट लयीत आणि त्या पेहरावाची व्यावसायिक खुबी लोकांच्या नजरेस पडेल अशा रीतीने चालणे आवश्यक असते. त्यासाठी मॉडेल्सना तसे खास प्रशिक्षण द्यावे लागते. रॅम्पवर जेव्हा मॉडेल चालतात, तेव्हा त्यांच्या मागे डिझायनरने निवड केलेले संगीत वाजवले जाते. या संगीताच्या ठेक्यावर चालण्याच्या विविध पर्यायांचा समावेश या फॅशन कोरिओग्राफीत केलेला असतो. त्यामुळेच फॅशन/कॅटवॉक कोरिओग्राफी ही अत्यंत महत्त्वाची ठरत असते. कारण त्यामधून संपूर्ण शोची संकल्पना, त्याचे सादरीकरण होत असते. व्यासपीठीवर मॉडेल- ती अथवा तो ज्या तऱ्हेने प्रेक्षकांसमोर पेश होतात, त्यावर त्या शोचे यश-अपयश ठरलेले असते. यात एखादी जरी चूक झाल्यास अथवा गलथानपणा दिसल्यास संपूर्ण शो फ्लॉप ठरू शकतो. म्हणूनच संगीताच्या ठेक्यावर मॉडेलचे (ती किंवा तो) लयबद्ध चालणे आवश्यक असते. या चालण्यात एक ऐट असावी लागते. त्याचबरोबर परिधान केलेल्या ग्लॅमरस पेहरावाचे वैशिष्टय़ आणि त्याची व्यावसायिकता सहजतेने नजरेसमोर यावी लागते. त्यामुळेच आजकाल फॅशन शोसाठी व्यावसायिक कोरिओग्राफर्सची निवड करण्याचा ट्रेण्ड विकसित झाला आहे. शिवाय शो यशस्वी ठरण्यासाठी नेमके काय सादर करायचे, याचे त्यांना उत्तम ज्ञान असते.
फॅशन कोरिओग्राफर नेहमी फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट यांच्याबरोबर चर्चा करून, शोची संकल्पना आणि त्याची अंमलबजावणी कशा रीतीने व्हावी, याचे नियोजन करीत असतो. कारण डिझायनर हा या शोमधला महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या डिझाइनमधल्या नेमक्या कोणत्या छटा प्रेक्षकांसमोर आल्या पाहिजेत, हे त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. मोठय़ा स्वरूपाच्या फॅशन शोसाठी डिझायिनग आणि दिग्दर्शन करणे म्हणजे एखाद्या बिग बजेट चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासारखेच आहे. कारण या फॅशन शोमधून कपडय़ांच्या सौंदर्याबरोबर त्यात असलेली सृजनशीलतादेखील रॅम्पवर दिसायला हवी. डिझायनरची क्षमता रॅम्पवर पेश करण्याचे काम कोरिओग्राफरचे असते. त्यामुळेच कोरिओग्राफरला डिझायनरच्या स्टाइलचा, त्याच्याकडे असलेल्या अंगभूत कौशल्यांचा नेमका अंदाज असायला हवा. हा अंदाज असला म्हणजे शोची संकल्पना ठरवणे, त्यातून काय सादर करायचे आहे, हे निश्चित करणे सोपे जाते. कधी कधी नवीन उत्पादन बाजारात दाखल करण्याच्या निमित्तानेदेखील फॅशन शोचे आयोजन केले जाते. फॅशन वीकसारखे कार्यक्रम करताना, त्यावेळी विविध स्वरूपाचे कापड आणि त्यापासून तयार केलेले पेहराव यांवर अधिक भर असतो. त्यामुळे प्रत्येक शोचे वैशिष्टय़ लक्षात घेऊन, त्यानुसार कोरिओग्राफी सादर करावी लागते. त्यामुळे वरकरणी कोरिओग्राफी ही सहज, सोपी प्रक्रिया वाटत असली, तरी ती सातत्याने शिकत राहण्याची प्रक्रिया आहे.
या क्षेत्रातदेखील नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास होत असतो. त्यामुळे दर वेळेस नवी संकल्पना सादर करताना बरेच संशोधन करावे लागते. या संकल्पनेत तोचतोचपणा जाणवणार नाही, याची दखल घ्यावी लागते. मागच्या संकल्पनेपेक्षा नवीन संकल्पना ही पूर्णत: नवी व ताजी वाटली पाहिजे. मुळातच, फॅशन आणि स्त्रिया ही नात्याची वीण घट्ट असल्यामुळे हे स्त्रीप्रधान क्षेत्र समजले जाते. त्यामुळे रॅम्पवर वावरणाऱ्या बऱ्याच मॉडेल मॉडेिलगच्या क्षेत्रात अनेक वष्रे व्यतीत केल्यानंतर फॅशन कोरिओग्राफीकडे वळतात. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर त्यांना कोरिओग्राफीचे नेमके तंत्र अवगत होते.
फॅशन कोरिओग्राफर म्हणून तुम्हाला करिअर करायचे असेल, तर तुम्ही बारावीपर्यंतचे शिक्षण कोणत्याही विद्याशाखेतून पूर्ण करणे आवश्यक ठरते. या करिअरसाठी खास स्वरूपाचा असा अभ्यासक्रम तयार केलेला नाही. हे शिक्षण तुम्ही एखाद्या नावाजलेल्या आणि अनुभवी कोरिओग्राफरच्या हाताखाली सहाय्यक बनून घेऊ शकतात. फॅशन हा विषय घेऊन पदवी किंवा पदव्युतर शिक्षण पूर्ण केले असेल तर तुम्ही फॅशन कोरिओग्राफर म्हणून करिअर करू शकता. मुळातच या क्षेत्रामध्ये सृजनशीलतेवर भर असल्याने, तुमचे मन जेवढे निर्मितीक्षम असेल तेवढा तुम्हाला या क्षेत्रात जास्त फायदा होईल.
या क्षेत्रात निर्मितीक्षम मन घेऊन वावरताना, कोरिओग्राफरला रंग आणि स्टाइलचे उत्तम ज्ञान अवगत असायला हवे. या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून रॅम्पवर उत्तम मिलाफ साकारता यायला हवा. कोरिओग्राफरकडे संवाद साधण्याचे कौशल्य तसेच संगीताची नेमकी जाण असली पाहिजे. कोरिओग्राफरला रॅम्पवर मॉडेलकडून नेमके काय अपेक्षित आहे, हे त्यांना नीटपणे समाजावून सांगता यायला हवे. कोरिओग्राफरच्या कल्पना जेवढय़ा स्पष्ट असतील तेवढे मॉडेल्सना रॅम्पवर वावरणे सोपे जाते. फॅशन शो जितका सहज, सुंदर नि ग्लॅमरस वाटत असतो, तितका स्टेजमागे ताण अधिक असतो. कधी कधी रॅम्पवर छोटय़ाशा चुकीतून देखील मोठा गोंधळ होऊ शकतो. अशावेळी ती चूक सहजतेने सुधारण्याचे किंवा ती लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने वातावरण तयार करण्याचे प्रसंगावधानही कोरिओग्राफरला असावे लागते. या करिअरमध्ये कार्यालयीन कामासारखे ठराविक व निश्चित वेळेचे बंधन नसते. त्यामुळे कामाच्या अनियमित वेळा आणि प्रचंड तास अशा वातावरणात काम करायची तयारी या कोरिओग्राफरकडे असावी लागते.
फॅशनच्या या निर्मितीक्षम क्षेत्रात मुबलक संधी येतच असतात. डिझायनर्सपासून ते फॅशन ब्रॅण्डपर्यंत सर्वानाच शोच्या यशासाठी फॅशन कोरिओग्राफरची गरज भासते. या शोमधून होणारा लाभ लक्षात घेता अलीकडे या स्वरूपाच्या शोचे आयोजन मोठय़ा प्रमाणावर होऊ लागले आहे. त्यामुळे फॅशन कोरिओग्राफरची देखील मोठय़ा प्रमाणावर गरज भासू लागली आहे. अगदी आजकाल कॉलेज फेस्टिव्हल्सदेखील फॅशन शोशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. इतकेच नाही तर कॉर्पोरेट मनोरंजनपर कार्यक्रमांमध्येदेखील आता फॅशन शो मोठय़ा प्रमाणावर आयोजित केले जातात.
सर्वसामान्यपणे, कोणत्याही फॅशन शोचे यश हे फॅशन कोरिओग्राफरच्या मेहनतीवर अवलंबून असते. एकदा का डिझायनरने त्याच्याजवळील फॅशनेबल पेहरावांचे कलेक्शन आणि त्यासाठी वापरली जाणारी त्याची कल्पना कोरिओग्राफरसमोर मांडली की, त्यानंतर कोरिओग्राफरचे काम खऱ्या अर्थाने सुरू होते. त्यानंतर शोच्या नियोजनापासून तो शो प्रत्यक्षात साकार होईपर्यंत प्रत्येक पायरीवर कोरिओग्राफरचे काम सुरूहोते. उदा. प्रवेश करताना समोरचा देखावा कसा असायला हवा, स्टेज आणि रॅम्पचे डिझाइन कसे हवे, प्रकाशयोजना कशी हवी, दृक्श्राव्य माध्यमाचा वापर कसा करता येईल, मॉडेल्स, त्यांचा मेकअप आणि हेअरस्टाइल्स त्यांच्या पेहरावाला शोभून दिसते की नाही, या सर्व गोष्टी कोरिओग्राफरला पाहाव्या लागतात. त्याचप्रमाणे डिझायनरने डिझाइन केलेले कपडे या शोच्या वेळी प्रामुख्याने नजरेत भरतील, अशी पाश्र्वभूमी आणि प्रेक्षकांची नजर खिळून राहतील, अशी वातावरणनिर्मिती करणे हे देखील कोरिओग्राफरचे महत्त्वाचे काम आहे. 
प्रत्येक व्यक्तीची स्वतची अशी एक खास स्टाइल असते. जरी दोन व्यक्तींनी सारखे पेहराव नि सारखा मेकअप केला तरी त्या दोघांमध्ये असलेल्या स्टाइलमुळे ती दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे उठून दिसतात. त्यामुळेच कोरिओग्राफरला फॅशन शो सादर करताना त्याला एक खास स्टाइल लाभलेली असेल, हे पाहावे लागते. आणि ही स्टाइल त्याने किंवा तिने सादर केलेल्या या आगोदरच्या शोसारखी नसावी. सादरीकरणात तोचतोचपणा येणार नाही, याचे प्रामुख्याने भान फॅशन कोरिओग्राफरने ठेवावे .
फॅशन कोरिओग्राफर्सना नेहमी सृजनशील व्यावसायिक व्यक्तींच्या गटासोबत काम करावे लागते. यामध्ये डिझायनर्स, मॉडेल्स, स्टायलिस्ट आणि फोटोग्राफर्स या सर्वाचा समावेश असतो. कधी कधी कोरिओग्राफर्सही सांघिकरीत्या काम करत असतात किंवा त्यांचे वेगवेगळे समूह तयार असतात, जे कामाच्या वेळी नेहमीच त्यांना सहकार्य करायला तत्पर असतात. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांच्या गटामध्ये सहभागी होऊन, व्यावसायिक कोरिओग्राफर्सना सहाय्य करण्याच्या कामी शिकाऊ उमेदवारांना मदत करता येईल. अशा तऱ्हेने फॅशन कोरिओग्राफर म्हणून तुम्ही स्वतच्या कामाला सुरुवात करू शकाल. मग जसजसा अनुभव गाठीशी जमा होत जाईल, तसतसे तुम्हांला स्वतंत्र किंवा फ्री लान्सर कोरिओग्राफर म्हणून काम करता येईल.
फॅशन कोरिओग्राफरकडे स्वतची प्रशिक्षण संस्था किंवा कोरिओग्राफी संदर्भात प्रशिक्षण देणारी संस्था काढण्याचा देखील उत्तम पर्याय उपलब्ध असतो. शिवाय हल्ली या ना त्यानिमित्ताने फॅशन शो करण्याचे प्रमाणदेखील मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे या प्रशिक्षण संस्थांना दिवसेंदिवस चांगलीच मागणी मिळत आहे. तसेच डिझायनर्स किंवा डीलर्सना आपला ब्रॅण्ड लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी फॅशन कोरिओग्राफर्सची गरज भासत असते. त्यामुळे ही मंडळीदेखील नेहमी उत्तम कोरिओग्राफर्सच्या शोधात असतात. त्याचबरोबर मॉडेल्स तयार करणाऱ्या एखाद्या प्रशिक्षण संस्थेत सहभागी होऊन या मॉडेल्सना प्रशिक्षण देण्याच्या कामातदेखील तुम्ही सहकार्य करू शकता.
फॅशन कोरिओग्राफर हा करिअरचा उत्तम पर्याय असला, तरीही या व्यवसायाचे काही खास तोटे आहेत, ते लक्षात घेणे आवश्यक ठरते. उदा. इथल्या कामाच्या वेळा आडनिडय़ा असतात आणि कामही भरपूर करावे लागते. एकदा बजेट ठरविल्यानंतर, त्यानुसारच काम करावे लागते. आणि हे काम करीत असताना डिझायनर्स, मॉडेल्स आणि क्लायंट्सचे समाधान होईल, हे देखील पाहावे लागते.
या क्षेत्रात काम करताना मिळणारा मोबदला हा उत्तम असतो, यात शंकाच नाही. विशेष म्हणजे जसजसे तुम्ही अनुभवी होत जाता, तसतसा तुम्ही तुमच्या मागणीनुसार तुमचा मोबदला घेऊ शकता. फॅशन कोरिओग्राफी व्यवसायात जितके तुम्ही यशस्वी व्हाल तितकी तुम्ही भरघोस कमाई करू शकाल. या क्षेत्राचेच वैशिष्टय़च असे आहे की, एकदा का तुमचे नाव झाले की तुम्ही म्हणाल तितका कामाचा मोबदला मागू शकता; मात्र सुरुवातीला तुम्हाला मिळेल ती रक्कम स्वीकारून तुमचे कसब सिद्ध करावे लागते.
7:41 PM

कावळ्याच्या गोष्टीचं रामायण!

एकदा एका कावळ्याला खूप तहान लागली. गावात कुठेही औषधालादेखील पाणी नव्हतं. कावळा कासावीस झाला होता. तेवढय़ात त्याला एक मोठी घागर दिसली. तो घागरीत डोकावला. घागरीच्या तळाशी थोडंसं पाणी होतं. कावळ्याने आजूबाजूचे दगड चोचीने त्या घागरीत घातले. दगड घातल्यावर पाणी वर आलं आणि कावळा ते पाणी पिऊन आनंदाने उडून गेला. अस्सा हा हुश्शार कावळा! चौथीतल्या काही चौकस मुलांना मी ही गोष्ट सांगितली. त्या पुढे जे रामायण घडलं, ते आम्हा साऱ्यांच्याच बुद्धीला विलक्षण चालना देणारं होतं.
कावळ्याची गोष्ट सांगून होताक्षणीच मुलांची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. गावात पाणी का नव्हतं? गावात पाणी अजिबात नव्हतं तर ते त्या घागरीत कुठून आलं? गावात पाणी नसताना कुठल्या वेडय़ा माणसाने आपल्या घागरीत असलेलं थोडंसं पाणी असं उघडय़ावर ठेवलं? कावळ्याने किती दगड पाण्यात घातले? कावळ्याला छोटे-छोटे आणि खूप दगड पाण्यात घालावे लागले असणार; मग तो दमला नाही का? घागर मातीची होती की, स्टीलची? मातीची असेल तर कावळ्याने दगड टाकताना ती फुटली नाही का? घागरीच्या तळाशी असलेलं पाणी दगड टाकून वर येत असेल तर नदी किंवा तलावांच्या तळाशी गेलेलं पाणीही मोठ्ठे दगड टाकून वर आणता येणार नाही का? तसं करता आलं तर आपल्याला कधीच पाणी कमी पडणार नाही. समुद्रात खूप मोठे दगड घालतात, मग समुद्र, पण असाच वर का येत नाही? किंवा तसा तो वर आला तर काय होईल?
एक ना दोन हजार प्रश्न! भल्याभल्यांनाही विचारात पडणारे! गावात पाऊस कमी झाला, आणि गावकऱ्यांनी नीट सांभाळून पाणी वापरलं नाही, त्यामुळे गावातलं पाणी संपलं असणार असाही एक विचार मुलांनीच मांडला. आम्ही सारे मिळून चर्चा करता करता कावळ्याच्या गोष्टीतून थेट जागतिक पातळीवरच्या पाण्याच्या प्रश्नापर्यंत पोहोचलो होतो. शेवटी कावळ्याची गोष्ट प्रयोग करून पडताळून पाहायची ठरली. प्रयोग करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार झाली. एकाने त्याच्या घरातले छोटे दगड आणायचं ठरवलं. दुसऱ्याने त्याच्या घरात नुकतेच आणलेले कुल्फी खाऊन रिकामी झालेली मातीचे छोटी मडकी आणायचं कबूल केलं. माझ्याकडे स्टीलची मोठी घागरही होती. तीही प्रयोगाच्या सामानात येऊन दाखल झाली आणि प्रयोगाचा दिवस ठरला.
प्रयोग करण्यासाठी सारे कावळे जमले. कावळ्याचा ‘रोल’ तर मुलेच करणार होती. सर्वात आधी गोष्टीबरहुकूम मोठय़ा घागरीच्या तळाशी थोडंसं पाणी घातलं. मुलं सरसावली. पाण्यात एक एक दगड घालायला लागली. पाणी वर यायचं सोडाच, दगडच भरायला लागले आणि जेमतेम पाव घागर भरेपर्यंत मुलांनी आणलेला दगडांचा साठा संपला. असं नको.. आपण प्रयोगासाठी छोटीच घागर घेऊया, मुलांनी एकच सूर लावला. कुल्फीच्या मातीच्या छोटय़ा मडक्यात तळाला घोटभर पाणी घालून परत प्रयोग सुरू झाला.
पाण्यात पहिला दगड घातला, पाणी थोडंसं वर आलेलं दिसलं. मुलांनी उत्साहाने पुढचे दगड घातले. हळूहळू पाणी खालीच राहून दगडच वर यायला लागले. पाणी दगडांच्या खाली, दगडांच्या फटींमध्येच राहिलं. पाणी कावळ्याच्या चोचीला लागेल एवढं काही वर येईना. मग आपण मुळातच घागरीत खूप कमी पाणी घातलं होतं, तेव्हा आता जरा जास्त पाणी घालून प्रयोग करून पाहूया असं ठरलं. दुसऱ्या मडक्यात जरा जास्त पाणी घालून परत तोच प्रयोग केलं. पण आपलं जैसे थे! पाणी सुरुवातीला वर यायचं, पण दगडांची संख्या वाढली की, दगडच वर येत होते आणि पाणी आपलं खालीच राहात होतं. होता होता मडक्यात आधी खूपच पाणी असेल तर काही दगड घातल्यावर ते पाणी वरती म्हणजे अगदी मडक्याच्या काठापर्यंत येईल आणि तेव्हाच ते कावळ्याला पिता येईल, असा निष्कर्ष मुलांनी काढला. त्यातच एका ‘वात्रट’ मुलाने, मडक्यात एवढं पाणी असताना खरंतर कावळ्याने त्यात दगड टाकायचीही काही गरज नव्हती, असाही शेरा मारला. तर जात्याच हुशार असणाऱ्या एकाने साधारण पाऊस पडला तर तो असाच जमिनीखालच्या भल्या मोठय़ा दगडाखाली जात असणार म्हणून खूप पाऊस पडला, तरच विहिरींमधलं पाणी आपल्याला मिळण्यापुरतं वर येत असणार, असा तर्क मांडला.
पंचतंत्रातल्या एका साध्या गोष्टीचा परामर्श घेत मुलं थेट जमिनीखालचे पाण्याचे स्रोत आणि त्यांचा पावसाच्या पाण्याशी असलेला संबंध यावर विचार करायला लागली होती. सुरुवातीला दगड टाकला की, पाण्याची पातळी वाढते, हा अनुभव त्यांना नकळतपणे आíकमिडीजचं तत्त्व शिकवून गेला होता. दगडांचं आकारमान पाण्यापेक्षाही जास्त झालं की, ते पाण्याच्या बाहेर येतात; पाणी द्रवरूप आणि वाहत असल्यामुळे ते दगडांच्या फटीत शिरतं, अशीही काही महत्त्वाची निरीक्षणं मुलांनी नोंदली होती. 
तर कावळ्याच्या गोष्टीच्या निमित्ताने काय काय घडलं?
*    मुलांनी गोष्ट नीट लक्ष देऊन ऐकली.
*    त्यामुळे त्यांच्या मनात अनेक शंका किंवा प्रश्न निर्माण झाले आणि त्यांनी ते मोकळेपणाने मांडले.
*    शंकानिरसनासाठी मुलांनी प्रयोग करून गोष्टीचा पडताळा करायचा ठरवला.
*    प्रयोग करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी मुलांनीच तयार केली आणि त्या वस्तू आपल्याच आसपास शोधल्या आणि प्रयोगशाळा नसली तरी प्रयोग करून पाहता येतो, हे मुलांनं समजलं.
*    पहिला प्रयोग अयशस्वी झाला, तर परिस्थिती बदलून तो वारंवार करून पाहावा, याचं आकलन त्यांना झालं.
*    कावळ्याने दगड टाकल्यावर पाणी वर आलं, ही घटना वाटते तशी सोपी नाही; हे त्यांना कळलं.
*    अनेक प्रयोगांच्या शेवटी मुलांनी स्वत:चे निष्कर्ष काढले आणि ते मूळ संकल्पनेपेक्षा खूपच वेगळे होते.
*    मुलांना नकळतपणे विज्ञानातल्या काही नियमांची ओळख झाली.
*    ऐकीव गोष्ट बिनदिक्कतपणे खरी समजायची नाही, तर त्यावर सारासार विचार करायचा, हे मुलांच्या लक्षात आलं.
थोडक्यात काय तर मुलांनी स्वत:च एक प्रयोग रचला, मांडला, केला आणि त्या अनुभवातून बऱ्याच काही महत्त्वाच्या इतर विचारांना चालना मिळाली. कावळ्याच्या गोष्टीतून रामायण घडलं ते असं! तेव्हा मुलांनो, पंचतंत्राचं पुस्तक उघडा, एखादी गोष्ट वाचा, त्यावर प्रयोग करता येतो का ते पाहा आणि स्वत:च शिकून शहाणे व्हा!
7:37 PM

वेळेचे व्यवस्थापन कसे कराल?

‘उद्या’ उमलणारी सर्व फुलं ‘आजच्या ’ बियांमधून जन्म घेतात..
 एक चिनी म्हण
आजच्या अत्यंत व्यग्र जीवनशैलीत वेळेचं व्यवस्थापन करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. वेळेच्या व्यवस्थापनामुळे कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करता येतो आणि त्यानुसार कामे उरकता येतात. अत्यंत घाईगर्दीच्या वेळेस अचानक उद्भवलेली महत्त्वपूर्ण कामे वेळेत पूर्ण करता येतात आणि परिस्थितीवर ताबा मिळवणे शक्य होते.
०    उत्पादनक्षमता वाढवता येते.
०    मनावरच्या ताणाची पातळी कमी करता येते.
०    कार्यालयीन कामे आणि व्यक्तिगत आयुष्यात पार पाडायच्या गोष्टी यांचा समतोल साधता येणे शक्य होते.
वेळेचे व्यवस्थापन कसे करता येईल, हे पाहूयात.

१. योजना आणि आखणी-
विचार करण्यासाठी पुरेसा वेळ देऊन जर तुम्ही जी कामे उरकायची आहेत, ती योजनाबद्ध रीतीने पार पाडलीत, तर तुमच्या वेळेचा निश्चितच सदुपयोग होतो. विचार न करता आखलेला प्लान फिस्कटण्याची शक्यताच अधिक असते. कोणत्याही गोष्टीची आखणी करताना विविध शक्यता लक्षात घेऊन ती केली तर गोंधळ उडण्याची शक्यता कमी असते.
२. उद्दिष्ट महत्त्वाचे-
तुमच्यासमोर नेहमीच एखादं उद्दिष्ट अथवा ध्येय असावं. त्यामुळे तुमच्या कामाला आणि ते साध्य करण्यासाठी तुम्ही जो वेळ देता त्याला एक दिशा प्राप्त होते. मात्र हे उद्दिष्ट सुरुवातीलाच निश्चित करावे. ते कसे, कधी आणि कितपत पूर्ण करता येईल, याचा आडाखाही आखलेला असावा. ते उद्दिष्ट तुम्हाला झेपेल, असे असावे.
३. अग्रक्रम ठरवणे-
जेव्हा ध्येय गाठण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता, त्यावेळी इटालियन अर्थतज्ज्ञ परेटो यांचा ‘८०-२०’ हा नियम वापरा. परेटो यांनी असं म्हटलंय की, ८० टक्के पुरस्कार तुम्हाला २० टक्के प्रयत्नांतून मिळू शकतात. हे अतिशय मौल्यवान २० टक्के प्रयत्न कोणते, ते समजून घेतल्यानंतर तुमचे अग्रक्रम तुम्ही ठरवू शकता. अशा तऱ्हेने तुम्हाला लाभदायक ठरतील अशा गोष्टींना आधी वेळ देणं, हे महत्त्वपूर्ण ठरतं.
 ४. कामांची यादी बनवणं-
दिवसभरात कोणकोणती कामं करायची, याची आखणी मनाशी करायला हवी. कामाची यादी आदल्या दिवशी झोपण्यापूर्वी किंवा सकाळी करता येईल. त्यामुळे कॅलेंडर किंवा कामाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेता येतं किंवा कामांची यादी करून आवश्यकतेनुसार त्यात बदलही करता येईल. या दोन्ही पद्धतींचा उपयोग गरज भासेल त्याप्रमाणेही करता येणं शक्य आहे. त्यामुळे कामाचं प्राधान्य लक्षात घेऊन एकापाठोपाठ एक काम उरकणं शक्य होतं.
 ५. लवचिकता-
कामात अनेकदा अडथळे येण्याची, बिघाड होण्याची किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधलं जाण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टी गृहीत धरून कामाची आखणी करायला हवी आणि कामाची पद्धत ठरवायला हवी. वेळेचं नियोजन करणारी तज्ज्ञ मंडळी नेहमी असं सुचवतात की, प्रत्येकानं आपल्याजवळ असलेल्या वेळापकी ५० % वेळाचंच नियोजन करावं, तशा प्रकारेच कामाची आखणी करावी. फक्त निम्म्या वेळाचंच तुम्ही वेळापत्रक बनवल्यानं तुमच्या उरलेल्या निम्म्या वेळात तुम्हाला कामात येणारे अडथळे किंवा अचानक समोर आलेली आणीबाणीची परिस्थिती यांच्याशी सामना करता येतो.
 ६. शारीरिक व मानसिक दृष्टीनं प्राइम टाइम लक्षात घ्या-
तुम्ही दिवसातल्या ज्या वेळात कामाच्या दृष्टीनं उत्साही, क्रियाशील असता, त्या वेळेत काम पूर्ण करणं उत्तम. तुम्ही पहाटेच्या वेळी काम करताना अधिक तरतरीत असता. रात्री काम करायला तुम्हाला अधिक आवडतं की, दुपारच्या वेळी तुम्हांला कामासाठी उत्साह अधिक असतो, हे जाणून घेऊन त्यावेळी काम केलं तर ते अधिक दर्जेदार आणि लवकर पूर्ण होतं. तुमच्यासाठी महत्त्वाची आणि प्रथम करायला हवीत अशी कामं करण्यासाठी वेळ देणं हा वेळेचं नियोजन करण्याचा सगळ्यात परिणामकारक मार्ग आहे.
७. योग्य गोष्टी योग्य तऱ्हेने करा-
सुप्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञ पीटर ड्रकर म्हणतात, ‘‘योग्य ती गोष्ट करणं हे गोष्टी योग्य रीतीनं करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. योग्य त्या गोष्टी केल्यानं अपेक्षित परिणाम साधला जातो. योग्य रीतीनं गोष्टी करणं म्हणजे तुमच्यातली कार्यक्षमतेनुसार कोणती गोष्ट योग्य आहे, यावर लक्ष केंद्रित करून नंतर ती योग्य रीतीने करण्यावर भर द्यायला हवा.’’
८. कामे तातडीने वा घाईत करू नका-
तातडीने केलेल्या कामाचे परिणाम अल्पकालीन असतात तर महत्त्वाच्या कामांमधून साध्य झालेले परिणाम दीर्घकालीन असतात. अशा महत्त्वपूर्ण कामाचा थेट संबंध तुमच्या अंतिम ध्येयाशी असतो. त्यामुळे तातडीने करावयाच्या कामांची संख्या कमीत कमी राखण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला तुमची महत्त्वाची आणि प्राधान्याने पूर्ण करावयाची कामं करायला पुरेसा वेळ मिळेल.
९. अनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची कला शिका-
क्षुल्लक गोष्टींना टाळण्याची आणि ज्या कामांचा तुम्हाला भावी आयुष्यावर फारसा उपयोग होणार नाही, अशा गोष्टींपासून दूर राहायला शिका. कामांच्या यादीत महत्त्वाची कामं कोणती आणि बाजूला सारता येण्यासारखी कोणती, हे तुम्ही नक्कीच ठरवू शकता आणि शक्यतो जी कामं तुम्ही एकटय़ाने करू शकता, ती कामं करण्यावर अधिक भर देणं योग्य ठरतं.
१०. कामातली चालढकल टाळा.
अनेकदा पुढय़ातलं काम पुढे ढकलण्याची किंवा टाळण्याची वृत्ती बाळगलीत, तर तुमचं काम कंटाळवाणं होतं. अशा वेळी त्या कामाचे छोटे छोटे भाग करावेत आणि एक एक भाग पूर्ण करावा किंवा मग मोठं काम करताना कंटाळा टाळण्यासाठी त्या कामाला ठराविक वेळ द्यावा. कामाचा सगळा भार एकदम पेलण्यापेक्षा एका वेळी थोडं थोडं काम पूर्ण केलंत, तर तुम्ही अशा टप्यावर पोचाल, जिथे तुम्हालाच ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची निकड भासेल.
7:35 PM

रोजगार संधी

कॉर्पोरेशन बँकेत कृषी अधिकाऱ्यांच्या १७५ जागा : उमेदवारांनी कृषी वा फलोत्पादन विषयातील पदवी कमीत कमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा- ३० वर्षे. अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० ऑगस्ट २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली कॉर्पोरेशन बँकेची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या www.corpbank.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकी पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०१२.

वायुदलात खेळाडूंसाठी संधी : उमेदवारांनी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी विद्यापीठ वा राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांत अव्वल स्थान प्राप्त केलेले असावे. वयोमर्यादा २१ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० ऑगस्ट २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची खेळाडूविषयक जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे अर्ज सेक्रेटरी, एअरफोर्स स्पोर्टस् कंट्रोल बोर्ड, द्वारा ४१२, एअरफोर्स स्टेशन, रेस कोर्स, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१२.

बँक नोट प्रेस, देवास येथे कुशल कामगारांच्या २१९ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून पिंट्रिंग, प्लेटमेकिंग, ऑफसेट, लेटर प्रेस, इलेक्ट्रोलेटिंग इ. विषयातील पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा- ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० ऑगस्ट २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली बँक नोट प्रेस- देवासची जाहिरात पाहावी अथवाhttp//specialtest.in/bnp2kt2  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

इंडियन ऑइल- गुजरात रिफायनरीमध्ये ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंटच्या १०१ जागा : अर्जदारांनी रसायनशास्त्रासह बीएस्सी अथवा केमिकल, पेट्रोकेमिकल, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदविका चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २६ जुलै २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ऑइलची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज चीफ ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजर, गुजरात रिफायनरी, इंडियन ऑइल, कॉर्पोरेशन, पोस्ट ऑफिस जवाहरनगर, जि. वडोदरा (गुजरात) ३९१३२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१२.

सशस्त्र सीमा बलात महिला परिचारिकांच्या ४८ जागा : अर्जदार महिला १२वी उत्तीर्ण असाव्यात, त्यांनी नर्सिगमधील पदविका उत्तीर्ण केल्यावर त्यांची नर्सिग काऊन्सिलमध्ये नोंदणी झालेली असावी व त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा- ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २६ जुलै २०१२ च्या अंकातील सीमा सुरक्षा बलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज दि डीआयजी (मेडिकल), कंपोझिट हॉस्पिटल, एसएसबी तेजपूर पोस्ट ऑफिस, सलोनिबारी, जि. सोनितपूर (असम) ७८४१०४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०१२.

ओएनजीसीमध्ये प्रशिक्षार्थीच्या ८८९ जागा : अर्जदारांनी जिऑलॉजी, जिओफिजिक, रसायनशास्त्र, प्रॉडक्शन, ड्रिलिंग, सिमेंटिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रमेंटेशन, सिव्हिल, ट्रान्स्पोर्ट, फायनान्स, एचआर, मटेरियल्स मॅनेजमेंट, मेडिकल वा सिक्युरिटी विषयातील पदवी वा पदव्युत्तर पात्रता अथवा सीए/आयसीडब्ल्यू ६० टक्के अथवा चांगल्या गुणांकांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० ऑगस्ट २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली ‘ओएनजीसी’ची जाहिरात पाहावी अथवा ओएनजीसीच्या www.ongcindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१२.

संसदेत हिंदी साहाय्यकांच्या २९ जागा : अर्जदारांनी इंग्रजीसह पदवी व हिंदीतील पदव्युत्तर पदवी, हिंदीसह पदवी व इंग्रजीतील पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी- इंग्रजी- हिंदी भाषांतरविषयक पदविका पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे. अर्जाचा नमुना व इतर तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय संसदेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज दि जॉइंट रिक्रुटमेंट सेल, रूम नं. ५२१, पार्लमेंट हाऊस अ‍ॅनेक्स, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१२.
7:32 PM

आरोग्य क्षेत्रातील वाढत्या संधी

आपल्या देशातील आरोग्य क्षेत्रातील बाजारपेठ जी दोन वर्षांपूर्वी ६० अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती, ती २०२५ सालापर्यंत १५ टक्क्य़ांनी वाढून ४८० अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होईल, असा अंदाज अलीकडेच एका पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. दर पाच वर्षांनी दुपटीने वाढणारे आरोग्य हे दुसऱ्या क्रमांकाचे रोजगारनिर्मिती क्षेत्र आहे. लोकसंख्यावाढ, रोगांचा वाढता दबाव, चलन फुगवटा, विमा संरक्षण यांसारख्या विविध घटकांमुळे या क्षेत्रात करिअरविषयक मोठय़ा संधी उपलब्ध आहेत.
या संधींचा लाभ घेण्याच्या दृष्टीने विविध विद्याशाखेतील वैद्यकीय शिक्षण अनिवार्य ठरते. या क्षेत्रात करिअरकरिता असलेल्या विविध संधी पुढीलप्रमाणे आहेत.
१. वैद्यक क्षेत्रातील पदवी शिक्षण - एमबीबीएस : ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्याची इच्छा आहे ते एमबीबीएसचा पर्याय निवडू शकतात. त्याकरिता त्यांना बारावीनंतर त्या राज्याची प्रवेश चाचणी उत्तीर्ण व्हावी लागते. हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून, तो यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर रुग्णालये, डे केअर सेंटर इ.मध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून विविध संधी उपलब्ध होतात. एमबीबीएस पूर्ण केल्यावर ते जनरल फिजिशिअन म्हणून स्वत:ची प्रॅक्टिसही सुरू करू शकतात.
२. पदव्युत्तर अभ्यासक्रम : वैद्यक क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर एखादा विद्यार्थी स्पेशलायझेशन करण्याकरिता पुढे शिकू शकतो. याकरिता दोन वर्षांचा पदविका अथवा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उदा. गायनाकॉलॉजी, ऑर्थोपेडिक्स, पेडिअ‍ॅट्रिक्स, पॅथॉलॉजी, नेफ्रोलॉजी इ. करता येते.
३. एमबीबीएसव्यतिरिक्त अन्य अभ्यासक्रम : विद्यार्थी बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी) आणि बीयूएमएस (युनानी) यांसारखे पर्याय निवडू शकतात. याही वैद्यकशास्त्रातील यशस्वी आणि परिणामकारक व विश्वासार्ह पद्धती आहेत. निवासी वैद्यकीय अधिकारी स्वत:ची प्रॅक्टिस करू शकतात किंवा स्पेशलायझेशनकरिता अभ्यास करू शकतात. याकरिता तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करावा लागतो.
४. वैद्यक क्षेत्रातील नॉन-फिजिशिअल अभ्यासक्रम : वर नमूद केल्याव्यतिरिक्त बीडीएस (डेंटल सायन्स), बी. फार्म (फार्मसी) यांसारखे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाला वाव आहे आणि एखादी व्यक्ती स्वत:ची प्रॅक्टीस सुरू करू शकते किंवा एखाद्या इस्पितळात काम करू शकते. बी. फार्म विद्यार्थ्यांना स्वत:चे फार्मसी दुकान सुरू करता येते आणि आपली व्यावसायिक संधी विस्तारता येते.
५. बायो-टेक : या दशकात जैवतंत्रज्ञान हे दुसरे क्षेत्र आश्वासक करिअर पर्याय म्हणून समोर आले आहे. हे शास्त्रीय संशोधनास प्राधान्य देणारे क्षेत्र आहे. कृषी ते उद्योग क्षेत्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये याचा उपयोग होतो. (अन्न, औषधे, रसायने, वस्त्रोद्योग इ.)
६. क्लिनिकल संशोधन : या शाखेमध्ये औषधांची सुरक्षितता आणि परिणामकारकता अभ्यासली जाते. या क्षेत्रात एखादी व्यक्ती/ पदविका अभ्यासक्रम पूर्ण करू शकते आणि आपले करिअर क्लिनिकल रिसर्च संस्थेमध्ये उभारू शकते.
७. नर्सिग केअर : ज्या लोकांना नर्सिग क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांनी नर्सिगमध्ये पदवी मिळवणे (बीएससी नर्सिग) किंवा जीएनएम (जनरल नर्सिग आणि मिडवाईफरी) अभ्यासक्रम किंवा एएनएम (ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ) पूर्ण करणे गरजेचे असते.
८. एमबीए / एमएचए : ज्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट रुग्णालयाच्या व्यवस्थान विद्याशाखेत प्रवेश करायचा आहे, त्यांनी हेल्थकेअरमध्ये एमबीए करणे किंवा एमएचए (मास्टर्स इन हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) करणे गरजेचे आहे. त्याखेरीज आरोग्य क्षेत्रातील एचआर, वित्त, माहिती-तंत्रज्ञान, मटेरिअल मॅनेजमेंट इ. विभागांसाठी या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.
९. तंत्रज्ञ : आधी एखाद्या व्यक्तीचा अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार बहुसंख्य कामगारांना कामावर ठेवले जाई; मात्र अलीकडे कामाच्या अनुभवासोबतच पदवीप्राप्त व्यावसायिकांना प्रमाणपत्र नसलेल्यांपेक्षा अधिक महत्त्व आले आहे. आगामी विचार करता परफ्युशनिस्ट, पीएफटी तंत्रज्ञ, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, कॅथ लॅब तंत्रज्ञ, सीएसएसडी (सेंट्रल स्टेराईल सप्लाय डिपार्टमेंट) तंत्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, रेडिओलॉजी तंत्रज्ञ आणि ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ इ. प्रमाणपत्रधारक व्यावसायिक नेमण्यावर अधिक भर दिलेला दिसून येत असून, आपण स्वत: विकसित केलेल्या अनुभवाच्या आधारे ते वाटचाल करतात.
बारावीनंतरही एक किंवा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम किंवा पदवी (तीन-चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम) करता येतो. परफ्युशनिस्ट कोर्स हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम असून तो पदवीनंतर करता येतो. याची गरज प्रामुख्याने ऑन-पम्प कार्डिअ‍ॅक सर्जरी करताना भासत असून पॅथॉलॉजी तंत्रज्ञ बनण्यासाठी बारावीनंतर एक/दोन वर्षांची पदविका किंवा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमधून करावा लागतो आणि हे तंत्रज्ञ पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करू शकतात. पदवीप्राप्त वैद्यकीय अधिकारी- पॅथॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली तो-ती स्वत:ची क्लिनिकल लॅबॉरेटरी सुरू करू शकतात.
१०. क्वॉलिटी आणि प्रोजेक्ट एमजीएमटी : दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा तपासण्यासाठी क्वॉलिटी काऊन्सिल ऑफ इंडियाने एनएबीएच (नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स)च्या माध्यमातून पद्धती विकसित केली आहे. दर्जेदार व्यावसायिकांची गरज हॉस्पिटलचे अ‍ॅक्रिडिटेशन करण्याकरिता भासते. तसेच या क्षेत्राची गरज व्यवसाय विकास आणि प्रकल्प व्यवस्थापन याकरिताही लागते.
११. वेलनेस : आरोग्याप्रती लोकांमध्ये जागरूकता वाढत असून, यामुळे लोक आपला आहार आणि शारीरिक व्यायाम याबाबत अधिक जागरूक बनू लागले आहेत. या व्यावसायिकांसमोर अनेक कन्सल्टन्सीसंबंधी संधी उपलब्ध आहेत.
x आहारतज्ज्ञ : हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम किंवा तीन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. होम सायन्समध्ये पदवी घेतल्यानंतर डाएटेटिक्सचा अभ्यासक्रम करता येतो.
x फिजिओथेरपिस्ट : बॅचलर इन फिजिओथेरपी हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. पदवीप्राप्त व्यावसायिक आपली स्वत:ची कन्सल्टन्सी सुरू करू शकतात आणि अनेक रुग्णालये, क्लिनिकमध्येही तासानुसार उत्पन्न मिळू शकते.
निदान आणि उपचारानंतर प्रिव्हेन्टिव्ह केअर विभागात करिअरकरिता विविध संधी उपलब्ध असून, त्या सध्या प्राथमिक अवस्थेत आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने विचार करता फिटनेस सेंटर, हेल्थ स्पा हेही करिअरचे अन्य पर्याय बनू शकतात. आरोग्य क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर विस्तारत आहे आणि भारतीय युवावर्गाने या उपलब्ध संधीचा पुरेपूर लाभ घेण्याची गरज आहे.
7:30 PM

करिअरचे नियोजन आणि आत्मविश्लेषण

अनेक तरुणांची तक्रार असते, की खूप काही करायचं होतं, नेमकं करिअरदेखील ठरवलं होतं, परंतु माहीत नाही कशामुळे, अखेर यश मात्र मिळालं नाही. शेवटी खूप प्रयत्नांनंतर ठरवलेली दिशा सोडून दुसरा मार्ग स्वीकारावा लागला. आपण करायला जातो एक आणि घडतं मात्र भलतंच. किंवा समोर येऊन ठेपतं ते अपेक्षेपेक्षा काही वेगळंच असतं. अशा प्रसंगांना सामोरे जाणारे एक नाही असंख्य तरुण आहेत. कशामुळे? तर कधीही समोर बोट दाखवताना एकच बोट समोर जातं, मात्र तीन बोटं आपल्याकडे असतात. एकच बोट समोरच्या करिअरच्या दिशेकडे नाचवून यश संपादन करता येत नाही, तर सोबत असलेल्या तीन बोटांचाही विचार करावा लागतो. म्हणजेच स्वत:चं विश्लेषण यशस्वी करिअर करण्यासाठी परखडपणे स्वत:ला ओळखणं महत्त्वाचं असतं. यासाठी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातील बरेवाईट बारकावे आधीच हेरून ठेवणं गरजेचं आहे. अनेकदा आपण आपलीच टिमकी वाजवायचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारच्या कृतीमुळे फाजील आत्मविश्वासात रमायला होत आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातील दोष दुर्लक्षिले जातात आणि चांगुलपणात काही भर पडत नाही. यासाठी करिअर ठरवताना स्वत:ला पूर्णपणे ओळखता आलं पाहिजे. स्वत:चं विश्लेषण करता यायला हवं. एखाद्या व्यक्तीला गुणवत्तेचा अंतिम टप्पा गाठायचा असेल तर त्यासाठी आत्मविश्लेषण पद्धती निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
करिअरचे नियोजन करताना आत्मविश्लेषण या पद्धतीचा निश्चितच उपयोग होतो. यात व्यक्तीची बलस्थानं, त्याच्यातील उणिवा, संधी आणि धोके या सर्वाचा विचार करण्यात आला आहे. या सगळ्याचा विचार केल्याने तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थानं, तुमच्यातील सकारात्मकता समजते. उणिवा लक्षात येताच त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करता येतात. शिवाय समोर येणाऱ्या संधीचा सतत आढावा घेत राहणं आणि करिअरच्या मार्गानं वाटचाल करताना जाणवणारे धोके हे सारं लक्षात घेणंही आवश्यक ठरतं. बदलत्या जगात तुम्ही नेमके कुठे आहात, याची यामुळे जाणीव होते. आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांचे निर्णय घेताना याचा उपयोग होतो.
संबंधित विश्लेषणाचा दोन अंगांनी विचार करायला हवा. तो आपल्या अंतर्गत गुणांशी संबंधित आणि दुसरा आहे तो बाहय़ जगाशी संबंधित. बलस्थानं आणि उणिवा हा अंतर्गत गुणांचा भाग झाला तर संधी आणि धोके यांचा थेट बाहय़ जगाशी संबंध असतो, असे म्हणता येईल.
बलस्थानं- प्रत्येक व्यक्तीत विशिष्ट क्षेत्राशी संबंधित चांगल्या गुणांचं वरदान असतं. या विश्लेषणाद्वारे व्यक्तिमत्त्वाच्या तळापर्यंत पोचून नितळ पाण्याचा झरा शोधून काढावा लागतो. एक कोणतातरी चांगला गुण व त्याच्याशी संबंधित करिअर असं न ठेवता सातत्यानं विविध कौशल्यांचा शोध व त्याला अनुसरून करिअरच्या दिशेची निवड हे प्रत्यक्षात शक्य झालं पाहिजे. माझ्यातली बलस्थानं कोणती? किती मर्यादेपर्यंत आहेत? याचा एकदा मागोवा घेतला की, करिअर निश्चिती हा टप्पा सुलभ होतो.
उणिवा- अनेकदा आपण म्हणतो मला अमूक एक गोष्ट येत नाही, आणि तितक्याच सहजतेनं ती गोष्ट बाजूलाही सारतो. आपल्यातल्या उणिवा आपल्याला सहज शोधता येतात. परंतु नुसतं शोधून थांबता कामा नये तर तटस्थ राहून त्याकडे पाहता आलं पाहिजे. शिवाय लक्षात आलेल्या उणिवांवर मात करण्याचा निर्धार सर्वात महत्त्वाचा ठरतो. करिअरची दिशा निश्चित करताना व त्या दिशेनं वाटचाल कोणत्या उणिवा हा वेग कमी करू शकतील याचा बारकाईनं विचार केला तर त्या उणिवांवर मात करण्याचा विशेष प्रयत्न भविष्यात तुमचा करिअरचा मार्ग निर्वेध करू शकतो.
संधी- प्रत्येक प्रसंग, भेटलेली नवी व्यक्ती, पाहिलेलं ठिकाण, वाचलेलं पुस्तक आणि प्रत्यक्ष क्षण हा एका अर्थानं आपल्या विकासासाठीची एक संधीच असते. गरज असते हे ओळखून पटकन संधीचं सोनं करण्याची. डोळे झाकून रडतखडत कसंतरी काम करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, भविष्यात नेमकं काय पाऊल उचलायची गरज आहे याची उत्तरं जागृतावस्थेतच मिळू शकतात आणि यालाच संधी म्हणतात. संधी सांगून येत नाही. आलेल्या संधीला ओळखता आलं पाहिजे. लगेचच त्याची अंमलबजावणी करता आली तर वेगानं वाटचाल करता येते.
धोका अथवा जोखीम- धोक्याशिवाय भविष्य साकारणं शक्य नाही. प्रत्येक परिस्थितीत एखादा विशिष्ट असा धोका असू शकतो. करिअरची दिशा निश्चित करताना त्याचे फायदे नुसते पाहून चालत नाही तर पुढे जाऊन कोणत्या धोक्यांना सामोरं जावं लागणार आहे, याचाही विचार आधीच करता आला पाहिजे. एखादी अनपेक्षित घटना घडते ती कौशल्यानं कशी हाताळता, याचाही साकल्याने विचार पूर्वीच करावा. नाहीतर एअरहोस्टेसचं करिअर करायचं आहे, परंतु विमानात बसायची खूप भीती वाटते किंवा पोलीस होण्याची इच्छा आहे, परंतु अटीतटीचा प्रसंग समोर येऊन ठाकला तर मग मी हे करिअर सोडून देईन, असं म्हणणाराही तरुणवर्ग आहे. परंतु, अशा म्हणण्याला काहीच अर्थ नाही. संभाव्य धोक्यांचा आधीच विचार करणं आणि त्यावर उपाययोजना आखून ठेवणं ही काळाची गरज आहे.
आत्मविश्लेषणातून अनेकविध चांगल्या बाबी ज्या मला आजपर्यंत दिसल्या नाहीत त्या दिसू शकतात. उणिवा कोणत्या आहेत आणि त्यावर मात कशी करता येईल याचं साकल्यानं नियोजन करता येतं. शिवाय निवडत असलेल्या क्षेत्रात भविष्यात किती संधी आहेत व कोणत्या धोक्यांना सामोरं जावं लागेल याचं संपूर्ण चित्र डोळय़ांसमोर स्पष्ट होतं. तुम्ही आज कोठे आहात, कोणत्या गुणांच्या आधारे भविष्यात कुठे जायचं आहे यासंबंधीचा अचूक निर्णय अशा प्रकारच्या विश्लेषणाद्वारे घेता येतो, म्हणून यशस्वी करिअरसाठी यासंबंधातील वर्तमानातील कृती निश्चितच मदत करते.
7:27 PM

बँकेच्या परीक्षांचा मोसम

येत्या दोन महिन्यांत विविध बँकपरीक्षा होणार आहेत. या परीक्षांमधील लिपिक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि तयारीसंबंधीचे मार्गदर्शन-
स्पर्धापरीक्षा ही केवळ उत्तम नोकरी मिळावी यासाठी नसते, तर चांगला उमेदवार संस्थेत (सरकारी, खासगी, बँकिंग व इतर) सामावून घेण्यासाठीही असते. प्रत्येक कंपनीला/ बँकेला आपला कर्मचारीवर्ग उत्तम असावा, असे वाटत असते. या स्पर्धेमुळेच नोकरीच्या शोधात असणाऱ्या व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नोकरीच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होत आहेत. बँकभरतीमध्ये होणाऱ्या परीक्षांचा लाभ उमेदवारांना चांगली नोकरी मिळविण्यासाठी निश्चितच होतो, म्हणूनच या परीक्षांना सामोरे जाताना उमेदवारांनी स्वत:ला तयार करायला हवे.
आजही बँकेतील नोकरीचे महत्त्व आणि प्रतिष्ठा अबाधित आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या काळात नोकर-कपात चालू असताना बँकिंग क्षेत्रात मात्र सातत्याने नोकर भरती होताना आपण पाहतो. स्थैर्यता, सुरक्षितता या गोष्टींचा विचार करता बँकेतील नोकरीला झुकते माप मिळते. बँकिंग क्षेत्रात खासगी, सरकारी व सहकारी बँका असे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
बँकेतील लिपिकपदावरील भरती प्रक्रिया आज आपण समजून घेऊ. १९ राष्ट्रीयीकृत बँकांसाठी
वर्षांतून दोनदा एकच सामायिक लेखी परीक्षा (CWE-common written exam) घेतली जाते. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणपत्रिका  मिळते व त्या आधारे या १९ बँकांमध्ये होणाऱ्या भरतीप्रक्रियेसाठी तो अर्ज करू शकतो. ही गुणपत्रिका एक वर्ष कालमर्यादा ठेवून विद्यार्थ्यांना देण्यात येते. या १९ राष्ट्रीयीकृत बँकांच्या भरतीप्रक्रियेमध्ये स्टेट बँक, रिझव्‍‌र्ह बँक व नाबार्ड यांचा समावेश नाही, तर सहकारी व खासगी बँकांचाही नाही. या बँका आपल्याला हवा असणारा कर्मचारीवर्ग वेगवेगळी परीक्षा घेऊन भरती करतात. यासाठीची पात्रता ही वेगवेगळी असते.
१९ राष्ट्रीयीकृत बँकांसाठी होणारी सामायिक लेखी परीक्षा ही ‘आयबीपीएस’ या संस्थेमार्फत होत असल्याने ही परीक्षा ‘आयबीपीएस’ या नावाने ओळखली जाते. वर्षांतून दोनदा म्हणजेच जून व नोव्हेंबर/ डिसेंबरमध्ये ही परीक्षा घेण्यात येते. जूनसाठीच्या परीक्षेचे अर्ज हे साधारणपणे फेब्रुवारी तर नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेचे अर्ज हे ऑगस्टमध्ये फक्त ऑनलाइन भरता येतात.
परीक्षेचा अभ्यासक्रम
आयबीपीएस मार्फत होणाऱ्या १९ राष्ट्रीयीकृत बँकांच्या परीक्षेसाठी क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ुड, इंग्रजी, टेस्ट ऑफ रिझिनग (तर्कशक्ती), सामान्यज्ञान (विशेषत: बँकिंग संदर्भातील) व संगणक ज्ञान हे पाच विषय असून प्रत्येकी ५० गुणांसाठी प्रत्येकी ५० प्रश्न विचारले जातात.
अशाप्रकारे एकूण २५० प्रश्नांसाठी १५० मिनिटांचा कालावधी देण्यात येतो. लेखी परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत (म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा करणे.) अवलंबविण्यात येते. स्टेट बँकेच्या परीक्षेत मार्केटिंग हा एक अधिक विषय असतो. अन्यथा सर्व अभ्यासक्रम इतर सर्व बँकांसाठी (खासगी, सहकारी, स्टेट बँक, रिझव्‍‌र्ह बँक, नाबार्ड) सारखा असतो.
क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ुड : या घटकात संख्या व संख्याप्रणाली गुणोत्तर-प्रमाण, भागीदारी, लसावि व मसावि, सरळरूप द्या, नफा- तोटा, शतमान-शेकडेवारी, काळ-काम व वेग, अंतर-वेग व वेळ, मिश्रणावरील उदाहरणे, आगगाडीवरील उदाहरणे, बोट व प्रवाहावरील उदाहरणे, सरासरी अशा उपघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
टेस्ट ऑफ रिझनिंग : या घटकात शाब्दिक व अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी असे दोन घटक पडतात. अशाब्दिक घटकात आकृतीशी निगडित प्रश्न विचारले जातात. उदा. आकृतींची मालिका पूर्ण करणे, आकृतीशी जुळणारी आकृती पर्यायातून निवडणे, समानसंबंध असणारी आकृती शोधणे.
शाब्दिक बुद्धिमापन चाचणी : या घटकात मालिका पूर्ण करणे, आकृतीतील गाळलेल्या जागी योग्य संख्या/चिन्ह/वर्ण पर्यायातून निवडणे, नाते-संबंध, दिशाविषयक प्रश्न, घडय़ाळ व कालमापनावरील प्रश्न इ. प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
इंग्रजी : यात प्रामुख्याने व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात. यात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, preposition, काळ व त्याची रूपे, उताऱ्यावरील प्रश्न, चुकीचा शब्द/ स्पेलिंग शोधणे, वाक्यातील चूक शोधणे अशा घटकांचा यात समावेश केलेला असतो.
सामान्य ज्ञान : यात बँकिंग क्षेत्राशी संबंधित सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. उदा. SLR म्हणजे काय? सध्याचा
रेपो रेट किती आहे? याकरिता आर्थिक घडामोडी संदर्भातील वाचन आवश्यक आहे.
संगणक ज्ञान : आता जवळपास सर्वच बँका या संगणकीकृत झाल्याने, बँकेत नोकरी करणाऱ्या उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी संगणक ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात.
अशा प्रकारे या परीक्षांचा अभ्यासक्रम आखण्यात आला असून योग्य प्रकारे तयारी करणाऱ्या उमेदवारांना या परीक्षांमधून बँकेत नोकरी मिळविणे अवघड जात नाही. परीक्षा जाहीर झाल्यानंतर अभ्यास करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच या परीक्षांचा अभ्यास करावा. जेणे करून परीक्षा सोपी वाटेल (अभ्यास कधीच वाया जात नाही) व त्यामुळेच यश मिळण्याची शक्यता दुणावेल.
7:24 PM

नेमकं अडतंय कुठे?

मुळात नीट अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, हेच अनेकदा मुलांना समजलेलं नसतं आणि मग आपल्या परीने प्रयत्न करूनही उत्तम मार्क्‍स मिळत नाहीत. त्यामुळे मूल, पालक आणि शिक्षक असे सगळेच हताश होतात. अशा वेळी मुलाच्या शिकण्यात नेमके कोणते अडसर येताहेत आणि ते नेमकं अडतंय कुठे, हे तपासून पाहणं फार महत्त्वाचं ठरतं.
एखादा विषय मुलाला जमत नाही, त्याला त्या विषयात मार्क्‍स मिळत नाहीत, असं लक्षात आलं की त्याला सहसा काही ठराविक सल्ले मिळतात-
‘‘आता अभ्यासाला लाग, इकडे तिकडे भटकणं, टीव्ही पाहणं बास झालं,
पुढच्या वेळेस तुला आणखी मेहनत करायला हवी.’’,
‘‘आता तरी जरा गंभीर व्हा आणि लागा कामाला!’’
‘‘आता तरी जरा नीट अभ्यास कर!’’
बऱ्याचदा मूल त्याच्या बाजूने प्रयत्न करतंही. पण नीट अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, हे बऱ्याचदा त्याला समजलेलंच नसतं. मूल मग बहुतेक वेळा पाठांतराचा आश्रय घेतं आणि प्रश्नोत्तरं पाठ करू लागतं. काही वेळा त्यातून मार्क्‍स मिळूनही जातात, पण अनेकदा हा मार्ग काही चालत नाही. मुळातच विषय समजलेला नसतो, त्यामुळे त्याच प्रकारच्या चुका पुन्हा पुन्हा होत राहतात.
यातून मूल, पालक आणि शिक्षक अशा सगळ्याच आघाडय़ांना हताश वाटत राहतं. नेमकं काय करावं, हे कळत नाही आणि ते त्यामुळे आलेल्या काळजी, चिडचिड आणि हताशपणातून मोठय़ांचे हे असे उद्गार येतात. यातून मूल नाउमेद होण्यापलीकडे फारसं काही साध्य होत नाही. अशा वेळी त्याच्या शिकण्यात नेमके कोणते अडसर येताहेत आणि ते नेमकं अडतंय कुठे हे तपासून पाहणं फार महत्त्वाचं असतं. स्वत: नाउमेद झालेलं मूल बऱ्याचदा स्वत:चं नेमकं कुठे चुकतं आहे, याचा अदमास घेण्याच्या मन:स्थितीत नसतं. त्यामुळे अशा वेळी मोठय़ांची मदत मोलाचं काम करू शकते. एखादी गोष्ट जमत नाही, म्हणजे एकुणातच जमत नाही, की त्यातले काही भाग जमताहेत, काही जमत नाहीत, याचं भान मुलांबरोबर वावरणाऱ्या मोठय़ांना असणं फार आवश्यक असतं.
आपण एक उदाहरण पाहू. एखादी व्यक्ती मुंबईपासून निघून पुण्यापर्यंत पोहोचायची आहे. ठराविक वेळात ती तिथे नाही पोहोचली, तर आपण काय करतो? जमलं तर तिच्याशी संपर्क साधतो, ती कुठपर्यंत पोहोचली आहे, हे पाहतो. प्रवासात काही अडचण, अडथळा आला नाही ना हे पाहतो. एक्स्प्रेस वे संपून ती व्यक्ती हिंजवडीच्या सिग्नलपाशी ट्रॅफिक जॅममध्ये बराच वेळ अडकली असेल तर इथे वेळ जाऊ शकतो, याची खूणगाठ बांधतो. पुढच्या वेळी या सगळ्याचा विचार करून प्रवासासाठी किती वेळ लागू शकेल याचा वेगळा अंदाज करतो.
अभ्यासाच्या बाबतीतही हेच करायचं. मूल पोहोचायच्या ठिकाणापर्यंत आलं नसेल (अभ्यासाच्या बाबतीत ‘पोहोचायचं ठिकाण’ म्हणजे अपेक्षित उत्तर) तर ते कुठपर्यंत पोहोचलं आहे, याचा अंदाज घ्यायचा. यासाठी मुळात या अभ्यासाच्या प्रवासातले टप्पे ओळखता येणं खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक विषय जमायला वेगवेगळी कौशल्यं लागतात, त्यामुळे अडायच्या जागा वेगवेगळ्या असू शकतात. ‘‘अ अभ्यासाचा’’मध्ये आपण साधारण सातवी-आठवीपर्यंतच्या मुलांना (मुलाचं वय ११ -१२ पर्यंत) अभ्यासात कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे पाहणार आहोत. आजच्या लेखात आपण भाषा विषयाशी संबंधित अडथळे कुठे आणि कसे येऊ शकतात, हे पाहूया.
लेखन, वाचन आणि भाषेचा वापर करून विचार मांडता येणं, ही मूलभूत भाषा कौशल्यं आहेत. खरं तर सगळ्याच विषयांच्या अभ्यासासाठी ही लागतात. लेखन, वाचन कच्चं असेल तर एकंदर शाळेचा अभ्यासच कठीण जातो. अनेकदा मुलांची पहिली दुसरी पार पडली की, त्यांना नीट लिहिता-वाचता येतं, असं गृहीत धरलं जातं. पण अनेकदा या महत्त्वाच्या गोष्टींकडे खूप दुर्लक्ष झालेलं असतं आणि त्याचे परिणाम मुलांना कायमच भोगावे लागतात. त्यामुळे याबाबतीत लहान वयातच काय करता येईल, हे आपण स्वतंत्र लेखात पाहू. आज आपण दीघरेत्तरी (वर्णनात्मक-डिस्क्रिप्टिव्ह) प्रश्नांच्या बाबतीत काय होऊ शकतं हे पाहूया. हा मुलांच्या वाटेतला मोठा अडसर असतो. भाषा वापरून विचार मांडता येतात का, याचा मोठा कस या प्रश्नांमध्ये लागतो. त्यात शिक्षण मातृभाषेत होत नसेल तर हा अडसर आणखीनच गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
दीघरेत्तरी प्रश्न लिहायची सुरुवात तशी चौथीपासून होते, म्हणून चौथीच्या इतिहासाचं उदाहरण पाहू. शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना खूप आवडतो. ऑडिटरी, व्हिज्युअल आणि केनेस्थेटिक अशा तिन्ही लर्निग स्टाइलच्या मुलांना गोष्टरूपात तो सांगताही येतो. पावनखिंडीत काय झालं, या प्रश्नाचं उत्तर बहुतेकांना जमतं. पण पावनखिंड इतिहासात अमर का झाली? असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा मुलं गोंधळून जातात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. सुरुवात कशी करायची हेच कळत नाही, म्हणून उत्तर लिहिणं अवघड जातं.
ऑडिटरी मंडळी सगळे संदर्भ छान धाडधाड सांगून मोकळी होतात, पण त्यांच्या लिहिताना चुका होऊ शकतात. व्हिज्युअल मुलांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग असतो, पण तो या प्रश्नाशी जोडून कसा घ्यायचा हे कळत नाही, म्हणून त्यांना लिहिणं अवघड जातं. केनेस्थेटिक मुलांना लढाई कळलेली असते, पण त्याचं नीट वर्णन करून सांगता
येत नाही. अशा वेळी मुलाला हे अवघड जातं आहे, हे पालक किंवा शिक्षक म्हणून स्वीकारता येणं,
ही पहिली महत्त्वाची बाब. त्यानंतर आपण त्यांना कशी मदत करू शकतो? आपण त्यांना काही
प्रश्न विचारू शकतो. अर्थात मुलांबरोबर नेहमीच ध्यानात ठेवायची गोष्ट म्हणजे सोपी, सुटसुटीत भाषा वापरणं आणि लांबलचक पल्लेदार वाक्यं टाळणं. उदाहरणार्थ:
०    पन्हाळगड ते विशाळगड हा प्रवास कसा होता?
०    वाटेत त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या?
०    कमी सैन्य जवळ असतानाही खिंड लढवायचं बाजीप्रभूंनी का ठरवलं?
०    अमर होणं म्हणजे काय?
०    बाजीप्रभूंच्या कोणत्या गुणामुळे आपण त्यांची आजही आठवण काढतो?
या प्रश्नांची उत्तरं सुरुवातीला कदाचित अगदी नेमकेपणे मुलांना देता येणार नाहीत. ज्यांना भाषा सहजगत्या जमत नाही, अशांना बऱ्याचदा एक मदतीचा हात लागतो. नेमक्या उत्तराच्या अट्टहासातून तो मिळत नाही. उत्तरं मिळवण्यापेक्षाही भाषेशी जवळीक साधण्यासाठी आपण हे करतो आहोत, याचं भान पालक किंवा शिक्षकाला असणं हा यातला कळीचा मुद्दा आहे. याच्या पुढचा टप्पा म्हणजे याच पाठावर वेगवेगळ्या प्रकारे कोणते प्रश्न तयार करता येतील, हे मुलांनाच विचारणं.
मूल अडत असेल तर उत्तर तयार करताना महत्त्वाचे शब्द लिहून ठेवणे (फळ्यावर किंवा वहीत), ते समोर ठेवून वाक्य तयार करायला प्रोत्साहन देणे या गोष्टींनी खूप फरक पडतो. या प्रकारात शिक्षक किंवा पालकाचं काम थोडं वाढतं. पण कोणीतरी आपल्या अडचणी समजून मदत करतं आहे, याने मुलांना फार दिलासा वाटतो. केवळ पाठांतर टाळायचं असेल तर आणि पुढे जायचा प्रयत्न मुलांनी आपणहून करायला हवा असेल, तर ही सकारात्मकता फार जरुरी असते.
सततच्या सरावाने मुलांना हळूहळू या गोष्टी जमू लागल्या की, मग त्यासाठी पालक किंवा शिक्षकांना फार वेळ द्यावा लागत नाही. पण     या सगळ्यासाठी हाताशी वेळ असणं आवश्यक असतं. म्हणून जितक्या लवकर अशा प्रकारे अभ्यास सुरू होईल तितका तो शांतपणे करता येईल. म्हणून लहान वर्गापासून तो सुरू होणं केव्हाही श्रेयस्कर.
अशीच अडचण मुलांना कवितेचा भावार्थ समजून घेताना येते. मुलांना कवितेचा शब्दश: अर्थ कळतो, पण त्यापलीकडे कवीला काय सुचवायचं आहे, हे सांगणं कठीण जातं. अशा वेळी कवितेत फार उदाहरणं, दाखले दिले, तर केनेस्थेटिक आणि व्हिज्युअल मुलांचा फोकस ढळू शकतो. म्हणून केवळ एकमार्गी (शिक्षक किंवा पालकाकडून केलं जाणारं) स्पष्टीकरण टाळून मुलांना बोलतं करणं आवश्यक असतं. सातवीच्या मराठीच्या पुस्तकात ‘बिनभिंतीची शाळा’ नावाची कविता आहे. यात कवी ग. दि. माडगूळकरांनी निसर्ग ही कशी बिनभिंतीची शाळा आहे, याचं सुरेख वर्णन केलं आहे. या कवितेच्या संदर्भात  ‘बिनभिंतीची शाळा’ आणि ‘भिंतीची शाळा’ यातला फरक सांगा’, हा प्रश्न मुलांना जरा कठीण जातो. अशा वेळी छोटे छोटे प्रश्न विचारणे आणि त्यांच्या उत्तराशी संबंधित शब्द काढून घेणे हे आलंच. ‘हिंडू ओढे, धुंडू ओहळ, झाडावरचे काढू मोहळ, चिडत्या डसत्या मधमाश्यांशी जरा सामना करू..’ अशा ओळींमधून कोणतं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं? इथे नुसतं मधमाश्या म्हटलं असतं तर कोणतं चित्र समोर आलं असतं? ‘चिडत्या डसत्या’ या शब्दांमुळे आणखी काही वेगळं चित्र समोर उभं राहतं का? अशा व्हिज्युअल क्लूजमुळे खूप फरक पडू शकतो. मग ‘चिडत्या डसत्या हे शब्द कवीने का वापरले असावेत, याचा अंदाज करता येतो का?’ या प्रश्नाचं उत्तर हातात गवसायला वेळ लागत नाही.
भाषाविषयक अडचणींचा मोठा टप्पा म्हणजे निबंध लेखनाचा. मुलांना बहुतेक वेळा निबंध लिहायचा कंटाळा असतो. त्यात निबंधाचे वेगवेगळे विषय, ते लिहिण्याची पद्धत वेगळी. त्यामुळे नेमकं काय लिहायचं आहे, हे त्यांना सुरुवातीलाच सांगणं जरुरीचं. निबंधाचा विषय मुलांच्या स्वत:च्या अनुभवविश्वाशी जोडून घेता आलं की, अगदीच अपरिचित विषयावर लिहायचा ताणही येत नाही. केनेस्थेटिक आणि व्हिज्युअल मुलं प्राणीजगतात खूप रमतात. त्यामुळे माझा आवडता प्राणी या विषयावर सांगण्यासारखं त्यांच्याकडे खूप असतं. या संदर्भात नेहमीच्या पद्धतीने मुद्दे न देता, जास्त विस्तृत, त्यांच्या वैयक्तिक अनुभवांशी जोडता येतील असे प्रश्न विचारून त्यांना बोलतं करता येतं. उदा.
०    आवडत्या प्राण्याबरोबर वावरायची संधी मिळाली आहे का?
०    कशी? तेव्हा काय झालं?
०    आवडत्या प्राण्याच्या संदर्भात पुढे जाऊन काय करायला आवडेल?
ही सगळी माहिती कोणत्या क्रमाने सांगितली, तर छान वाटेल यावर त्यांना मदत लागू शकते. हेही हळूहळू सरावाने जमणारे तंत्र आहे. आता सातवीच्याच पुस्तकात ‘शेकरू’ या प्राण्याचा उल्लेख आहे. हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. आता शेकरावर काही माहिती लिहायची झाली तर ती सरसकट पुस्तकातून उतरवून काढता येईल किंवा त्यावर काही वेगळा विचारही करता येईल. यात सर्वात मोठी अडचण म्हणजे मुलांनी शेकरू प्रत्यक्ष पाहिलं असण्याची शक्यता जरा कमीच. पुस्तकात त्याचं रेखाचित्र आहे. पण जमलं तर फोटोग्राफ्स दाखवण्याने आणखी स्पष्ट कल्पना येऊ शकते. काही प्रश्न मुलांपुढे ठेवले तर त्यातून काय साधता येईल पाहूया.
०    शेकरांची संख्या कमी का झाली असावी?
०    शेकरू वाचवण्यासाठी काय करावं लागेल?
०    भीमाशंकर सोडून इतरत्र कुठे तो दिसतो का?
०    शेकरू आपल्याला घरी पाळता येईल का?
०    त्याला प्राणिसंग्रहालयात ठेवता येईल का?
०    महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून शेकराची निवड का झाली असावी?
खरं तर या प्रश्नांची उत्तरं म्हणजे शेकरू या विषयावरचा छोटा निबंधच आहे. असे प्रयत्न वर्गातून झाले तर अनेक मुलांना एकाच वेळी त्याचा फायदा होऊ शकतो. यासाठी शिक्षकाला थोडी जास्तीची तयारी करावी लागते, थोडा अधिक वेळ द्यावा लागतो. मात्र सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनाचे (कण्टिन्युअस अ‍ॅण्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन) निकष हेच तर आहेत. मूल वेगळा विचार कसा करतं? एकेक पायरी पुढे कसं जातं आहे? समजून घेण्याची प्रक्रिया कशी होते आहे, त्यात सुधार होतो आहे का? आधीचे मिळालेले ज्ञान आणि शिकलेल्या नवीन गोष्टी जोडून घेता येत आहेत का? या सगळ्याची उत्तरं शिक्षकाला इथे आपसूकच मिळून जातील.
लर्निग स्टाइल्स आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी लक्षात घेतल्या तर मुलांवर आळशी, टंगळमंगळ करणारा असे शिक्के मारलं जाणं आपोआप टळतंच, पण शिकवणाऱ्यालाही नवे रस्ते सापडत जातात. हा अनुभव शिकणाऱ्यासाठी आणि शिकवणाऱ्यासाठीही अतिशय समाधान देणारा असतो.

Wednesday, August 15, 2012

12:32 AM

Bridging the education gap by leveraging technology The DNA-Indus Learning 2012 Survey identifies the top distance learning institutes in India that have leveraged methodology, technology, faculty and infrastructure to provide the best experience

Bridging the education gap by leveraging technology
The DNA-Indus Learning 2012 Survey identifies the top distance learning institutes in India that have leveraged methodology, technology, faculty and infrastructure to provide the best experience

You may have read the phrase, ‘keep safe distance’ on many vehicles while driving along the highway. However, when it comes to the information superhighway, the question arises, whether too much distance is advisable or not?
The reality is that these days many students try to earn while they learn, so distance education helps them tremendously. Similarly, when it comes to higher education courses like management, nobody likes to lose out on work experience. Therefore, distance education courses in such fields facilitate the process of enhancing skills to a considerable extent, without compromising on work schedules.
Each institution has a different way of conducting these courses, but they basically fall into two categories. Synchronous learning technology is a mode of delivery where all participants are ‘present’ at the same time. It resembles traditional classroom teaching methods despite the participants being located remotely. It requires a timetable to be organized. Web conferencing, videoconferencing, educational television, Instructional television are examples of synchronous technology, as are direct-broadcast satellite (DBS), internet radio, live streaming, telephone, and web-based VoIP.
The asynchronous learning mode of delivery is where participants access course materials on their own schedule and so is more flexible. Students are not required to be together at the same time. Mail correspondence, which is the oldest form of distance education, is an asynchronous delivery technology and others include message board forums, e-mail, video and audio recordings, print materials, voicemail and fax.
The two methods can be combined in the delivery of one course. For example, some courses use periodic sessions of weekend classroom teaching to supplement the remote teaching.
Distance education can assist in meeting the demand for education and training demand from the general populace and businesses, especially because it offers the possibility of a flexibility to accommodate the many time-constraints imposed by personal responsibilities and commitments.
There are many students that are unable to go to a traditional school setting because they cannot get around easily or a low immune system and get sick from other students. Distance education can help in these cases because the students will not have to leave their home or be around other people. It makes it possible for these students to still learn and to be able to get a good education.
The trend of opting for professional courses in addition to the basic graduation is quite visible and here too, distance learning is playing a key role. In addition to study materials in the form of books, students get audio-video CDs, plus access to an on-line system where they are provided a host of web-based facilities. Virtual classrooms enable them to interact with the professors online and even measure their own progress after each topic through real time tests with instant feedback.
Distance learning courses enable students to explore the scope for careers in a variety of fields without affecting their basic graduation. However, when it comes to this concept, it is important to compare institutions on relevant parameters and consider the extent to which each one will help your career before making a choice.
To simplify the process and provide reliable ratings of leading distance learning institutions, DNA and Indus Learning Solutions Pvt. Ltd. recently conducted a survey.
The objective of the research was to rank the Top distance learning institutes of India based on the perception of student, faculties, alumni and HR consultants. The evaluation was done on specific parameters like Course Curriculum, Faculty & Resources, Placement, Library & Infrastructure, Potential to Network and Learning Experience.
The preferred distance learning institutes were listed on each parameter, followed by the evaluation of each business school on each parameter.
A survey was thereafter conducted for the selected institutes with structured interviews of 300 respondents across the six cities of Delhi, Mumbai, Chennai, Pune, Chandigarh and Bangalore. Convenience sampling was used to ensure that the ratings for all business schools were taken. A weighted average was then calculated across different parameters for selection of the top business schools in India.
Target Respondents included students of the age group 18-30 years. These comprised potential students who were willing to get admitted in any distance learning institutes, had passed 12th standard and passed within the last 1 year, those presently studying in any distance learning institutes and alumni students who had passed from any distance learning institutes within the last one year. Faculties who responded had to be a teaching faculty of any distance learning institutes whereas the HR professionals had to be directly involved in campus recruitments.
The survey clearly revealed that comparing distance learning institutes on specific parameters would definitely help aspiring students to make the right choice.
12:23 AM

The DNA-Indus Learning 2012 Survey identifies the Top 20 B-Schools in India that have managed to optimally balance the essential academia-industry imperatives

Institutes managing best of both worlds
The DNA-Indus Learning 2012 Survey identifies the Top 20 B-Schools in India that have managed to optimally balance the essential academia-industry imperatives

B-Schools are a Mecca for management aspirants. It is here that they seek to realise their dreams of being a part of the teams that control big business operations. Therefore, the parameters are quite clearly set and that too upfront. As a result, these days the quest for management education comes with a rider; Industry-Relevant.
It is no longer enough to just have a huge campus, a well-stocked library and a reputation stretching decades into the past. The question that students and their parents are increasingly asking, is just how well does the B-School prepare aspirants for the real business world?
The fact is that when they take admission, most management aspirants have no clue of what will be expected from them in the corporate corridors after they complete their education. The amount of focus and hard work involved, initiative and skill sets required to gain the fat salaries or impressive titles are aspects that a B-School needs to convey and explain.
The basic task of selecting an institution to set the foundation for a management career can be quite confusing if one is not having a clear set of parameters in place to follow. Making the right or wrong choice can mean the difference between getting your career off to a flying start and losing the race even before it begins.
The only point is whether a student or parent understands the parameters to rank B-Schools and their ramifications? The obvious answer would be they do not. For instance, how much significance would one attach to aspects like the experience and expertise of the faculty? Would a student understand how important it is to distinguish between in-house faculty and visiting faculty? Or comprehend the difference between ‘industry exposure’ and ‘industry experience?’ Grasp the hidden implications of campus placement interviews vis-a-vis placement counselling sessions?
Therefore, the search for B-Schools where students are encouraged to question, debate and interact with their peers and professors for inputs for their projects, hold brainstorming sessions before tackling assignments, where professors are available to help students select appropriate tasks, diagnose problems, provide challenges, offer feedback and assist them in their collaborative efforts is a difficult one to conduct alone.
Aspirants have to acquire skills that are required to grow managerially ranging from communication etiquette, team handling, public speaking, presentation skills and most importantly the knowledge in financial concepts which is so very important when you are in a leadership role.
The students need to be given exposure to real life scenarios, case studies and taken for industry visits to ensure they are ready to perform right from day one so that it reduces training cost and supports timely delivery. The B-School should strike the right balance between academic delivery of the highest quality and industry interface.
The bottom line is that the corporate world looks for graduates who are ‘industry-ready’ when they join their organisations so B-Schools have to keep that in mind. However, as pointed out earlier, this is no easy task.
With the aim of facilitating the process and enabling management aspirants to not just understand the parameters on which they need to rate B-Schools, but also provide a systematically conducted, comprehensive rating, DNA and Indus Learning Solutions Pvt. Ltd. recently conducted a survey to identify such B-Schools in India.
The objective of the research was to rank the Top 20 B-Schools within the country based on the perception of student, faculties, alumni and HR consultants. The evaluation of business schools was done on specific parameters like curriculum, intellectual impact, international exposure, CSR initiatives, placement, industry interaction, infrastructure and potential to network. The preferred business schools were listed on each parameter, followed by the evaluation of each business school on each parameter, leading to the final list of Top 20 business schools in India.
For this, a survey was conducted for the selected institutes with structured interviews of 300 respondents across the six cities of Delhi, Mumbai, Chennai, Pune, Chandigarh and Bangalore. Convenience sampling was used to ensure that the ratings for all business schools were taken. A weighted average was then calculated across different parameters for selection of the top business schools in India.
Target respondents included students of the age group 18-30 years. These comprised potential students who were willing to get admitted in any business school, had passed 12th standard and passed within the last 1 year, those presently studying in any business school and alumni students who had passed from any business school within the last one year. Faculties who responded had to be a teaching faculty of any business school whereas the HR professionals had to be directly involved in campus recruitments. Snowball sampling process was used to ensure that the ratings for all business schools are taken.
The survey findings provided rankings in the following categories: Overall Ranking, Most admired institution - Course Curriculum, Most admired institution - Intellectual Impact, Most admired institution - International exposure, Most admired institution- CSR initiative, Most admired institution - Placement, Most admired institution - Industry Interaction, Most admired institution – Infrastructure and Most admired institution - Potential to network.
These are the key factors that epitomise an ideal institute for imparting management education and stand aspirants in good stead, all through their careers. After all, a B-School that combines relevant and updated courses with exposure to the corporate world ensures that its students are ready to deliver from day one, making them an attractive proposition at the campus hiring stage. The same attributes that make a student attractive for hiring today, will be driving career growth tomorrow.