Sunday, August 26, 2012

रोजगार संधी

कॉर्पोरेशन बँकेत कृषी अधिकाऱ्यांच्या १७५ जागा : उमेदवारांनी कृषी वा फलोत्पादन विषयातील पदवी कमीत कमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा- ३० वर्षे. अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० ऑगस्ट २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली कॉर्पोरेशन बँकेची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या www.corpbank.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकी पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०१२.

वायुदलात खेळाडूंसाठी संधी : उमेदवारांनी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी विद्यापीठ वा राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांत अव्वल स्थान प्राप्त केलेले असावे. वयोमर्यादा २१ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० ऑगस्ट २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची खेळाडूविषयक जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे अर्ज सेक्रेटरी, एअरफोर्स स्पोर्टस् कंट्रोल बोर्ड, द्वारा ४१२, एअरफोर्स स्टेशन, रेस कोर्स, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१२.

बँक नोट प्रेस, देवास येथे कुशल कामगारांच्या २१९ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून पिंट्रिंग, प्लेटमेकिंग, ऑफसेट, लेटर प्रेस, इलेक्ट्रोलेटिंग इ. विषयातील पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा- ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० ऑगस्ट २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली बँक नोट प्रेस- देवासची जाहिरात पाहावी अथवाhttp//specialtest.in/bnp2kt2  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

इंडियन ऑइल- गुजरात रिफायनरीमध्ये ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंटच्या १०१ जागा : अर्जदारांनी रसायनशास्त्रासह बीएस्सी अथवा केमिकल, पेट्रोकेमिकल, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदविका चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २६ जुलै २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ऑइलची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज चीफ ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजर, गुजरात रिफायनरी, इंडियन ऑइल, कॉर्पोरेशन, पोस्ट ऑफिस जवाहरनगर, जि. वडोदरा (गुजरात) ३९१३२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१२.

सशस्त्र सीमा बलात महिला परिचारिकांच्या ४८ जागा : अर्जदार महिला १२वी उत्तीर्ण असाव्यात, त्यांनी नर्सिगमधील पदविका उत्तीर्ण केल्यावर त्यांची नर्सिग काऊन्सिलमध्ये नोंदणी झालेली असावी व त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा- ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २६ जुलै २०१२ च्या अंकातील सीमा सुरक्षा बलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज दि डीआयजी (मेडिकल), कंपोझिट हॉस्पिटल, एसएसबी तेजपूर पोस्ट ऑफिस, सलोनिबारी, जि. सोनितपूर (असम) ७८४१०४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०१२.

ओएनजीसीमध्ये प्रशिक्षार्थीच्या ८८९ जागा : अर्जदारांनी जिऑलॉजी, जिओफिजिक, रसायनशास्त्र, प्रॉडक्शन, ड्रिलिंग, सिमेंटिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रमेंटेशन, सिव्हिल, ट्रान्स्पोर्ट, फायनान्स, एचआर, मटेरियल्स मॅनेजमेंट, मेडिकल वा सिक्युरिटी विषयातील पदवी वा पदव्युत्तर पात्रता अथवा सीए/आयसीडब्ल्यू ६० टक्के अथवा चांगल्या गुणांकांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० ऑगस्ट २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली ‘ओएनजीसी’ची जाहिरात पाहावी अथवा ओएनजीसीच्या www.ongcindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१२.

संसदेत हिंदी साहाय्यकांच्या २९ जागा : अर्जदारांनी इंग्रजीसह पदवी व हिंदीतील पदव्युत्तर पदवी, हिंदीसह पदवी व इंग्रजीतील पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी- इंग्रजी- हिंदी भाषांतरविषयक पदविका पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे. अर्जाचा नमुना व इतर तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय संसदेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज दि जॉइंट रिक्रुटमेंट सेल, रूम नं. ५२१, पार्लमेंट हाऊस अ‍ॅनेक्स, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१२.

No comments:

Post a Comment