आपल्या देशातील आरोग्य क्षेत्रातील बाजारपेठ जी दोन वर्षांपूर्वी ६० अब्ज
अमेरिकी डॉलर इतकी होती, ती २०२५ सालापर्यंत १५ टक्क्य़ांनी वाढून ४८० अब्ज
अमेरिकी डॉलर इतकी होईल, असा अंदाज अलीकडेच एका पाहणी अहवालात वर्तवण्यात
आला आहे. दर पाच वर्षांनी दुपटीने वाढणारे आरोग्य हे दुसऱ्या क्रमांकाचे
रोजगारनिर्मिती क्षेत्र आहे.
लोकसंख्यावाढ, रोगांचा वाढता दबाव, चलन फुगवटा, विमा संरक्षण यांसारख्या
विविध घटकांमुळे या क्षेत्रात करिअरविषयक मोठय़ा संधी उपलब्ध आहेत.
या संधींचा लाभ घेण्याच्या दृष्टीने विविध विद्याशाखेतील वैद्यकीय शिक्षण अनिवार्य ठरते. या क्षेत्रात करिअरकरिता असलेल्या विविध संधी पुढीलप्रमाणे आहेत.
१. वैद्यक क्षेत्रातील पदवी शिक्षण - एमबीबीएस : ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्याची इच्छा आहे ते एमबीबीएसचा पर्याय निवडू शकतात. त्याकरिता त्यांना बारावीनंतर त्या राज्याची प्रवेश चाचणी उत्तीर्ण व्हावी लागते. हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून, तो यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर रुग्णालये, डे केअर सेंटर इ.मध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून विविध संधी उपलब्ध होतात. एमबीबीएस पूर्ण केल्यावर ते जनरल फिजिशिअन म्हणून स्वत:ची प्रॅक्टिसही सुरू करू शकतात.
२. पदव्युत्तर अभ्यासक्रम : वैद्यक क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर एखादा विद्यार्थी स्पेशलायझेशन करण्याकरिता पुढे शिकू शकतो. याकरिता दोन वर्षांचा पदविका अथवा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उदा. गायनाकॉलॉजी, ऑर्थोपेडिक्स, पेडिअॅट्रिक्स, पॅथॉलॉजी, नेफ्रोलॉजी इ. करता येते.
३. एमबीबीएसव्यतिरिक्त अन्य अभ्यासक्रम : विद्यार्थी बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी) आणि बीयूएमएस (युनानी) यांसारखे पर्याय निवडू शकतात. याही वैद्यकशास्त्रातील यशस्वी आणि परिणामकारक व विश्वासार्ह पद्धती आहेत. निवासी वैद्यकीय अधिकारी स्वत:ची प्रॅक्टिस करू शकतात किंवा स्पेशलायझेशनकरिता अभ्यास करू शकतात. याकरिता तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करावा लागतो.
४. वैद्यक क्षेत्रातील नॉन-फिजिशिअल अभ्यासक्रम : वर नमूद केल्याव्यतिरिक्त बीडीएस (डेंटल सायन्स), बी. फार्म (फार्मसी) यांसारखे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाला वाव आहे आणि एखादी व्यक्ती स्वत:ची प्रॅक्टीस सुरू करू शकते किंवा एखाद्या इस्पितळात काम करू शकते. बी. फार्म विद्यार्थ्यांना स्वत:चे फार्मसी दुकान सुरू करता येते आणि आपली व्यावसायिक संधी विस्तारता येते.
५. बायो-टेक : या दशकात जैवतंत्रज्ञान हे दुसरे क्षेत्र आश्वासक करिअर पर्याय म्हणून समोर आले आहे. हे शास्त्रीय संशोधनास प्राधान्य देणारे क्षेत्र आहे. कृषी ते उद्योग क्षेत्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये याचा उपयोग होतो. (अन्न, औषधे, रसायने, वस्त्रोद्योग इ.)
६. क्लिनिकल संशोधन : या शाखेमध्ये औषधांची सुरक्षितता आणि परिणामकारकता अभ्यासली जाते. या क्षेत्रात एखादी व्यक्ती/ पदविका अभ्यासक्रम पूर्ण करू शकते आणि आपले करिअर क्लिनिकल रिसर्च संस्थेमध्ये उभारू शकते.
७. नर्सिग केअर : ज्या लोकांना नर्सिग क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांनी नर्सिगमध्ये पदवी मिळवणे (बीएससी नर्सिग) किंवा जीएनएम (जनरल नर्सिग आणि मिडवाईफरी) अभ्यासक्रम किंवा एएनएम (ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ) पूर्ण करणे गरजेचे असते.
८. एमबीए / एमएचए : ज्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट रुग्णालयाच्या व्यवस्थान विद्याशाखेत प्रवेश करायचा आहे, त्यांनी हेल्थकेअरमध्ये एमबीए करणे किंवा एमएचए (मास्टर्स इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन) करणे गरजेचे आहे. त्याखेरीज आरोग्य क्षेत्रातील एचआर, वित्त, माहिती-तंत्रज्ञान, मटेरिअल मॅनेजमेंट इ. विभागांसाठी या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.
९. तंत्रज्ञ : आधी एखाद्या व्यक्तीचा अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार बहुसंख्य कामगारांना कामावर ठेवले जाई; मात्र अलीकडे कामाच्या अनुभवासोबतच पदवीप्राप्त व्यावसायिकांना प्रमाणपत्र नसलेल्यांपेक्षा अधिक महत्त्व आले आहे. आगामी विचार करता परफ्युशनिस्ट, पीएफटी तंत्रज्ञ, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, कॅथ लॅब तंत्रज्ञ, सीएसएसडी (सेंट्रल स्टेराईल सप्लाय डिपार्टमेंट) तंत्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, रेडिओलॉजी तंत्रज्ञ आणि ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ इ. प्रमाणपत्रधारक व्यावसायिक नेमण्यावर अधिक भर दिलेला दिसून येत असून, आपण स्वत: विकसित केलेल्या अनुभवाच्या आधारे ते वाटचाल करतात.
बारावीनंतरही एक किंवा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम किंवा पदवी (तीन-चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम) करता येतो. परफ्युशनिस्ट कोर्स हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम असून तो पदवीनंतर करता येतो. याची गरज प्रामुख्याने ऑन-पम्प कार्डिअॅक सर्जरी करताना भासत असून पॅथॉलॉजी तंत्रज्ञ बनण्यासाठी बारावीनंतर एक/दोन वर्षांची पदविका किंवा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमधून करावा लागतो आणि हे तंत्रज्ञ पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करू शकतात. पदवीप्राप्त वैद्यकीय अधिकारी- पॅथॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली तो-ती स्वत:ची क्लिनिकल लॅबॉरेटरी सुरू करू शकतात.
१०. क्वॉलिटी आणि प्रोजेक्ट एमजीएमटी : दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा तपासण्यासाठी क्वॉलिटी काऊन्सिल ऑफ इंडियाने एनएबीएच (नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स)च्या माध्यमातून पद्धती विकसित केली आहे. दर्जेदार व्यावसायिकांची गरज हॉस्पिटलचे अॅक्रिडिटेशन करण्याकरिता भासते. तसेच या क्षेत्राची गरज व्यवसाय विकास आणि प्रकल्प व्यवस्थापन याकरिताही लागते.
११. वेलनेस : आरोग्याप्रती लोकांमध्ये जागरूकता वाढत असून, यामुळे लोक आपला आहार आणि शारीरिक व्यायाम याबाबत अधिक जागरूक बनू लागले आहेत. या व्यावसायिकांसमोर अनेक कन्सल्टन्सीसंबंधी संधी उपलब्ध आहेत.
x आहारतज्ज्ञ : हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम किंवा तीन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. होम सायन्समध्ये पदवी घेतल्यानंतर डाएटेटिक्सचा अभ्यासक्रम करता येतो.
x फिजिओथेरपिस्ट : बॅचलर इन फिजिओथेरपी हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. पदवीप्राप्त व्यावसायिक आपली स्वत:ची कन्सल्टन्सी सुरू करू शकतात आणि अनेक रुग्णालये, क्लिनिकमध्येही तासानुसार उत्पन्न मिळू शकते.
निदान आणि उपचारानंतर प्रिव्हेन्टिव्ह केअर विभागात करिअरकरिता विविध संधी उपलब्ध असून, त्या सध्या प्राथमिक अवस्थेत आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने विचार करता फिटनेस सेंटर, हेल्थ स्पा हेही करिअरचे अन्य पर्याय बनू शकतात. आरोग्य क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर विस्तारत आहे आणि भारतीय युवावर्गाने या उपलब्ध संधीचा पुरेपूर लाभ घेण्याची गरज आहे.

No comments:
Post a Comment