डरके आगे.. जीत है!
साहसी क्रीडाप्रकारांचा ‘चॅलेंज कोर्स’ हा
शाळेत, स्टेडियमवर अथवा पार्कमध्ये उभारता येतो. कुठल्याही वयोगटातील
व्यक्ती त्यात सहभागी होऊन चित्तथरारक अनुभव घेऊ शकतात. हे साहसी
क्रीडाप्रकार करताना येणारी धम्माल, गम्मत आणि साहस यातून जो विलक्षण अनुभव
मिळतो, तो चार भिंतींत घेतलेल्या पुस्तकी शिक्षणातून कधीच मिळू शकत नाही!
‘बाई, मी नाऽऽ सुरुवातीला खूप घाबरले होते, पण हा ‘पॅरलल रोप’ पार केल्यावर खूप धम्माल वाटली..’ १० वर्षांची कश्मिरा आपल्या शिक्षिकेला सांगत होती. ‘सर, मला वाटलंच नव्हतं की मी ही एवढी उंच ‘रॉक वॉल’ चढू शकेन! पण मी चढलो,’ १२ वर्षांचा समित अभिमानाने फुललेल्या चेहऱ्याने सांगत होता.. या दोघांचेही बोलणे बेतले होते ते साहसी क्रीडाप्रकारांविषयीच्या त्यांच्या प्रशिक्षणादरम्यानच्या अनुभवावर..
डोंबिवली येथील विद्यानिकेतन या शाळेत हा ‘चॅलेंज कोर्स’ उभा करण्यात आला आहे. असा कोर्स उभारणारी देशातील ही पहिलीच शाळा आहे. ‘अहो, मी उंचीला फार घाबरायचे, पण या कोर्समधील साहसी खेळांची आव्हाने पूर्ण केल्यानंतर माझी भीती साफ पळून गेली.’ चाळिशीच्या एक शिक्षिका आपल्या अनुभवाबद्दल सांगत होत्या. ‘‘मुलांना शिकवायच्या आधी आम्ही सर्व शिक्षकांनीही या ‘चॅलेंज कोर्स’चा थरारक अनुभव घेतला. सुरुवातीला या वयात आपण इतके साहस करू शकू का, याविषयी मनात साशंकता होती. पण जसजसे आम्ही वेगवेगळ्या स्तरांवरील साहसी खेळांना सामोरे जायला लागलो, तसतसा आमचा आत्मविश्वास वाढायला लागला. ‘कॉब वेब’ सुरुवातीला फारच सोपे वाटले, पण संघभावना जागृत करणारा हा साहसी खेळाचा प्रकार फारच छान आणि युनिक आहे! तो खेळताना बरंच काही शिकायला मिळतं..’’ आणखी एक तिशीची शिक्षिका सांगत होती..
एका विद्यार्थ्यांच्या आईने या चॅलेंज कोर्सवर सराव केला. ‘इतर खेळांमध्ये दुसऱ्या व्यक्तीशी किंवा संघाशी स्पर्धा असते, हार-जीत असते, जास्त किंवा कमी गुण असतात, या चॅलेंज कोर्समध्ये तसे काही नाही. हं, पण एक अत्यंत वेगळी गोष्ट यामध्ये अनुभवता येते, ती म्हणजे, आपण स्वत:च आपल्याला आव्हान देतो आणि स्वत:ला दिलेले आव्हान पूर्ण करताना आपणच आपल्याला मनोमन अधिक किंवा कमी गुण देऊ शकतो; नव्हे, ते मनोमन दिले जातात. आपोआप आत्मपरीक्षण होते,’ या शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘बर्मा ब्रिज बघितल्यावर आधी मला वाटलं की, हे काय डोंबाऱ्याच्या खेळासारखे! पण, जेव्हा जमिनीपासून २०-२५ फुटांवर आपण एका बारीक दोरीवर उभे असतो आणि आपल्या हाताच्या पंजांनी आधाराला म्हणून दोन बारीक दोऱ्या पकडलेल्या असतात, अशा वेळी आपला मेंदू आपल्या मनाला वेगळ्याच तऱ्हेने विचार करायला लावतो! मन, शरीर आणि मेंदू हे एका वेगळ्या अवस्थेत पोचतात, त्यामुळे अचूक निर्णय घेण्याची क्षमता खूप वाढते, असे लक्षात आले,’ या शाळेचे क्रीडाशिक्षक सांगत होते..
२००७ साली अमेरिकेत ‘चॅलेंज कोर्स टेक्नॉलॉजी’ या विषयावरील एक परिसंवादात मी सहभागी झालो होतो. तेव्हापासून मनात इच्छा होती की, आपल्याकडील एखाद्या शाळेत असा अभ्यासक्रम उभा करावा आणि विद्यानिकेतनच्या पंडित सरांनी ही कल्पना शाळेत प्रत्यक्षात आणली.
अत्यंत सुरक्षित वातावरणात अनेक साहसी खेळांचे प्रकार एकत्रितरीत्या जिथे उभारले जातात त्याला ‘चॅलेंज कोर्स’ असे म्हणतात. ब्रोकन ब्रिज, हॉरिझाँटल लॅडर, बर्मा ब्रिज, रॉक वॉल, रेडर ब्रिज, पॅरलल रोप्स, टायर ट्रॅव्हर्स अशा प्रकारचे साहसी खेळ वैयक्तिक कौशल्य वाढविण्याकरता असतात, तर ऑस्ट्रेलियन वॉक, टायर मॅजिक, कॉब वेब, वूझी अशा प्रकारचे साहसी खेळ हे सांघिक भावना वाढविण्यासाठी उपयोगी पडतात. ‘चॅलेंज कोर्स’ शहरामध्ये शाळेत, स्टेडियमवर अथवा पार्कमध्ये उभे केले जाऊ शकतात. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती या चॅलेंज कोर्सचा चित्तथरारक अनुभव घेऊ शकतात. धम्माल, गम्मत आणि साहस या गोष्टींमधून एक वेगळ्याच प्रकारचे प्रशिक्षण मिळविता येते की, जे क्लासरूममध्ये कधीच उपलब्ध होत नाही!’

No comments:
Post a Comment